१०० हून अधिक वर्षांपासूनचे आयव्हीएफ उपचार, हजारों यशस्वी आयव्हीएफ गर्भधारणा, आयव्हीएफ तज्ज्ञांची भारतातील अग्रगण्य टीम यांच्या एकत्रित अनुभवांच्या मदतीने अतिशय गुंतागुंतींच्या आयव्हीएफ उपचारांनाही आम्ही बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटमध्ये सोपे केले आहे.
एकाच वेळी सोप्या उपचारासह जास्तीत जास्त परिणाम प्राप्त करणे, गुंतागुंत कमी करणे आणि पैशाला योग्य मूल्य प्रदान करणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. समजायला, नियोजन करायला, अंमलात आणायला आणि एकूणच पार पाडायला सोपी जावी अशाप्रकारे आम्ही संपूर्ण प्रक्रिया आखतो.
उपचारपूर्व मूल्यांकन तुमच्या वैद्यकीय, सामाजिक आणि कामाच्या आवश्यकतेनुसार अत्यंत सानुकूलित, वैयक्तिकृत, विशेषीकृत व किमान उपचार योजना बनविण्यावर लक्ष केंद्रित करून असते.
उपचार योजना, देखरेख आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी संबंधीच्या निर्णायक प्रक्रियांमध्ये तुम्हाला सहभागी केले जाते.
बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटमधील आयव्हीएफ प्रक्रिया इंजेक्शन्सची आणि रुग्णालयाला द्याव्या लागणाऱ्या भेटींची संख्या कमी करून रुग्णाच्या आरामावर लक्ष केंद्रित करते.
आम्ही तुम्हाला इष्टतम प्रतिसादासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शन्सचे किमान डोसच देतो; शक्य असेल त्यावेळी मुख किंवा योनीमार्गे दिल्या जाणाऱ्या औषधींचा अवलंब केला जातो. रक्त चाचण्या आणि इंजेक्शन देण्याची गरज कमी करण्याचे प्रत्येक प्रयत्न केले जातात.
रुग्णाला त्याच्या गावीच सेल्फ-इंजेक्शन, सोनोग्राफी देखरेख आणि प्रगत नियोजनाचे पर्याय उपलब्ध करवून आम्ही त्यांच्या क्लिनिक भेटी कमी करण्याचा प्रयत्न करतो.
ओव्ह्यूम पिकअप किंवा अंडी संकलन प्रक्रियेत आम्ही रुग्णाला अतिशय हलक्या तीव्रतेची आणि कमी कालावधीची भूल देतो.
या साध्या प्रक्रियेनंतर २ तासांनी रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी दिली जाते.
ओटीची आरामदायी स्थिती, त्यासाठी लागणारा कमीतकमी वेळ आणि लवकर सुट्टी यांद्वारे आम्ही रुग्णाला जास्तीत जास्त आराम देण्याची खात्री करून घेतो.
आम्ही आमच्या अधिकृत ‘झिरो एरर’ एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निकचे अनुसरण करतो.
ही एक साधी, वेदनारहित आणि सोपी प्रक्रिया आहे. या कार्यपद्धतीनंतर तुम्हाला विश्रांती देण्यासाठी, तणावमुक्त आणि सकारात्मक उर्जेने भरण्यासाठी एक विश्रांती सत्र आयोजित केले जाते.
भ्रूण हस्तांतरण झाल्यानंतर तुम्ही रुग्णालयातून बाहेर पडू शकता आणि काही तासांनंतर तुमच्या कामावर परतू शकता.
आम्ही किंवा जगभरात झालेले मोठमोठे संशोधनही कोणत्याच प्रकारच्या विश्रांतीची शिफारस करीत नाहीत.
आम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीला व दिनचर्येला प्रोत्साहित करतो. आवश्यक असणाऱ्या किमान औषधींचाच आम्ही वापर करतो व वेदनादायी इंजेक्शन्सचा वापर करत नाही. तुमच्या स्वतःच्या घरी गर्भधारणेसंबंधी रक्तचाचणी करण्यास आम्ही तुमची मदत करू शकतो.
आमचे ध्येय तुमच्या उद्दीष्टांसह संरेखित आहेत. आम्ही आमचे कौशल्य, अनुभव आणि प्रगत औषधी तंत्रांचा वापर करून तुमचे आयव्हीएफ सोपे करतो. उपचाराचा हा प्रवास संपल्यानंतर तुम्हाला कळेल, की यशस्वी आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रूग्ण इतरांना आमच्याकडे उपचार घेण्याची शिफारस का करतात.
WhatsApp us