Bavishi Fertility Institute

डिंबग्रंथि पुनरुज्जीवन

अंडी निर्माण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी डिंबग्रंथींना पुनरुज्जीवित करण्याच्या प्रक्रियेला ‘डिंबग्रंथी पुनर्युवन किंवा डिंबग्रंथी पुनरुज्जीवन’ म्हणतात.

डिंबग्रंथीचे कार्य आयव्हीएफ उपचारात महत्त्वाची भूमिका पार पाडते. डिंबग्रंथीचे कार्य चांगले असले, की अधिक निरोगी अंडी तयार होतात, चांगल्या गुणवत्तेचे भ्रुण निर्माण होण्याच्या शक्यता जास्त असतात, भ्रुण निवडीच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि अतिरिक्त भ्रुणांना गोठवण्याच्या जास्त शक्यता असतात.

दुर्दैवाने, काही महिलांमध्ये त्यांच्या डिंबग्रंथी अपेक्षित कालावधीच्या आधीच कार्य करणे थांबवतात. काही स्त्रिया उशिरा गर्भधारणा करण्याच्या प्रयत्नात असतात, अर्थातच अशावेळी त्यांच्या डिंबग्रंथींची कार्यक्षमता कमी झालेली असते. काही महिलांना रजोनिवृत्तीनंतरही त्यांच्या स्वतःच्या अंड्याद्वारे गर्भ धारण करायचे असते; पण रजोनिवृत्तीच्या वेळी डिंबग्रंथी आधीच अंडी निर्माण करणे थांबवून असतात.

अतिशय कमी एएमएच व वाढणारे एफएसएच असलेले रुग्ण आणि आयव्हीएफला कमी प्रतिसाद देणारे रुग्ण डिंबग्रंथी पुनरुज्जीवनासाठीचे योग्य उमेदवार आहेत.

सामान्यतः प्रत्येक उपचार चक्रात जास्तीत जास्त अंडी प्राप्त व्हाव्यात यासाठी तीव्र उत्तेजन प्रोटोकॉलचा वापर केला जातो. परंतु, यासाठी औषधांच्या अत्याधिक मात्रा द्याव्या लागतात, जास्त खर्च येतो आणि तरीही अंड्यांचे उत्पादन मात्र अपेक्षेने कमीच असते.

यासाठी सर्वांत मोठा तार्किक उपाय आहे, डिंबग्रंथींची कार्यक्षमता वाढवणे. बरोबर ना?

पीआरपी – प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी

रक्तपट्टिकांमध्ये सायटोकाईन्स आणि वाढीला प्रोत्साहित करणारे इतर घटक विपुल प्रमाणात असतात. रक्तपट्टिकांना सक्रीय आणि समृद्ध केल्याने त्या अधिक कार्यक्षम बनतात. संहत, सक्रिय व समृद्ध पीआरपीचे डिंबग्रंथींमध्ये अंतःक्षेपण केल्याने त्यांची अंडी निर्माण करण्याची क्षमता अजून वाढते.

ज्या जोडप्यांमध्ये गर्भधारणेच्या अतिशय कमी शक्यता असतात, त्या जोडप्यांनाही नैसर्गिक गर्भधारणा करण्यासाठी बीएफआयने मदत केली आहे.

नैसर्गिक किंवा बाह्य प्रेरणेच्या संदर्भात डिंबग्रंथी अधिक प्रतिसादात्मक असाव्यात अशी अपेक्षा आपण करू शकतो.

कार्यपद्धती

  • ही पद्धत अतिशय साधी आणि सुरक्षित आहे. 
  • रुग्णाकडून रक्त संकलित केले जाते. 
  • पट्टिका वेगळ्या करण्यासाठी आमच्या स्वतःच्या प्रयोगशाळेत त्या रक्तावर प्रक्रिया केली जाते.

रक्त पट्टीकेच्या नमुन्याला अधिक समृद्ध करण्यासाठी त्यावर विशेष प्रक्रिया केली जाते आणि त्यास अधिक प्रभावी केले जाते.

एका अतिशय पातळ सुईच्या मदतीने व अल्ट्रासाऊंडच्या मार्गदर्शनाखाली पीआरपी दोन्ही डिंबग्रंथीमध्ये टाकले जाते.

फायदे

पीआरपी रुग्णाच्या स्वतःच्या रक्तापासून तयार केले जाते, त्यामुळे रुग्णाच्या शरीरात कोणत्याही बाह्य औषध अथवा पदार्थाचा शिरकाव होत नाही. ही अतिशय साधी आणि तुलनेने कमी खर्चिक पद्धती आहे. या प्रक्रियेचे परिणाम फक्त एकाच उपचार सायकलपर्यंत नव्हे, तर दीर्घकाळ टिकतात.

नुकसान आणि मर्यादा

  • ही एकदम रामबाण प्रक्रिया नाही. तिचे परिणाम वेगवेगळ्या रुग्णांनुसार वेगवेगळे असतात. 
  • ते कायमस्वरूपी उपचार नाही.
  • या प्रक्रियेच्या फायद्यांचा प्रभाव काळानुसार कमी होत जातो.

स्टेम सेल थेरपी

मूळ पेशी (स्टेम सेल्स) ह्या रुग्णाच्या स्वतःच्या पेशी असतात, ज्यांच्यात स्वतःला शरीराच्या विविध पेशींमध्ये रुपांतरीत करण्याची क्षमता असते.

फायदे

सर्वसाधारणपणे, मूळ पेशी ह्या रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातून प्राप्त होतात, त्यामुळे इथे संसर्गाचे संक्रमण होण्याचा धोका नसतो. तुलनेने ही प्रक्रिया अतिशय सुरक्षित आहे. अनेक प्रकरणांमध्ये प्रभावी आहे.

नुकसान आणि मर्यादा

मूळ पेशी प्राप्त करण्याची प्रक्रिया अधिक आक्रमक प्रक्रिया आहे. ती पीआरपीपेक्षा जास्त महाग आहे. पीआरपीसारख्या सोप्या पर्यायांच्या तुलनेत तिचे चांगले परिणाम आहेत की नाही हे सिद्ध झालेले नाही. परिणाम वेगवेगळे आहेत; कदाचित सर्वच उपचारित रूग्णांमध्ये सुधारणा दिसू शकणार नाही.

कार्यपद्धती

बहुतेक प्रक्रियांमध्ये अस्थिमज्जापासून तयार झालेल्या मूळ पेशींचा वापर केला जातो. ह्या पेशी नितंबाच्या हाडातून गोळा केल्या जातात. तयार केलेल्या मूळ पेशी डिंबग्रंथीत टाकल्या जातात.

औषधोपचार

अ‍ॅन्ड्रोजन पर्याय

अंडी विकासाचे चक्र अंदाजे 3 महिन्यांसाचे असते. पहिल्या दोन महिन्यांतील अंड्यांचा विकास अँड्रोजेनच्या नियंत्रणाखाली आहे. प्रामुख्याने अ‍ॅन्ड्रोजेनला पुरुष संप्रेरके मानले जातात, परंतु मादीच्या अंडीच्या विकासामध्ये देखील त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. अशाप्रकारच्या विविध औषधे किंवा पौष्टिक पूरक पदार्थांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा वैद्यकीय अभ्यासाची रचना चांगली असते, तेव्हा वरीलपैकी कोणतेही पर्याय चांगले परिणाम दर्शवत नाही. अशा प्रकारचे एक औषध म्हणजे, त्वचेवर लावले जाणारे टेस्टोस्टेरॉन जेल. परंतु, यासाठी वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता आहे. डीएचईए हे सर्वाधिक लोकप्रिय पर्याय आहे.

डीएचईए (हायड्रोईपिएन्ड्रोस्टेरॉन)

डीएचईए हे अनेक पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. एड्रेनल ग्रंथीदेखील डीएचईएचे स्राव करतात. अंडाशयात एंड्रोजनची पातळी वाढण्याच्या उद्देशाने म्हणून 3 ते 6 महिन्यांपर्यंत डीएचईए दिले जाते. या  उपचारानंतर  अंडाशयात अंड्यांची संख्या वाढणे अपेक्षित असते. आमचे असे सांगणे आहे, की याद्वारे झालेच तर अत्यल्प लाभ होते; तरीही डीएचईएच्या उपचारात तुम्ही उशीर करू नये, कारण उशीर केल्याने फायद्यापेक्षा होण्यापेक्षा नुकसान अधिक होऊ शकते.

पूरक पोषणाहार

अ‍ॅन्टी-एजिंग-एंटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले विविध खाद्यपदार्थ आणि पूरक आहार वापरले जातात. यांमध्ये कोएन्झाइम क्यू10 (यूब्यूकिनॉन), ड जीवनसत्व, फोलिक आम्ल इत्यादी सामान्य पूरक आहार आहेत.

वैद्यकीय उपचारांचा लाभ होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी कमी आहे.

मुख्य गैरसोय म्हणजे, सुधारणेच्या प्रतीक्षेत वेळ वाया जाणे. यामुळे डिम्बग्रंथि साठा आणि जननक्षमता कमी होऊ शकते.

आमच्या मते, तत्काळ आयव्हीएफसह गर्भाशयाच्या पुनरुज्जीवनच्या विविध पद्धतींचे वापर करणे हेच सर्वोत्तम धोरण आहे. कोणतीही वेळ वाया घालवू नका.

निष्कर्ष

डिम्बग्रंथिची क्रिया किंवा अंडी उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी निश्चित असे रामबाण उपचार नाही. त्यात सुधारणा करण्याच्या कोणत्याही प्रयत्नास मर्यादित यश मिळते. कोणाला फायदा होईल आणि कोणाला नाही होईल, याचा नेहमीच अंदाज लावणे शक्य नसते. तरुण रूग्णांमध्ये सुधारण्याची थोडीशी  चांगली शक्यता असू शकते.

उपचारासाठी विलंब झाल्यामुळे उपचारासाठी खर्च केलेला वेळ विरुद्ध नुकसान, ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अंतिम निर्णय रूग्ण आणि उपचार करणार्‍या डॉक्टरांनी घ्यावा.

आमचे स्थान