आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या जोडप्यांना पहिल्या आणि प्रत्येक प्रयत्नात गर्भवती राहण्याच्या खूप चांगल्या शक्यता असतात. अशा जोडप्यासाठी इतर कोणत्याही उपचारांपेक्षा आयव्हीएफ उपचारात यश मिळण्याची शक्यता चांगली असते. तथापि, उपचार अयशस्वी होण्याची शक्यताही नेहमी असते.
आयव्हीएफचे यश रुग्णांच्या घटकांवर तसेच क्लिनिक घटकांवरही अवलंबून असते.
बीएफआयच्या सर्व आयव्हीएफ प्रयोगशाळा भ्रूणाच्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट स्थिती प्रदान करण्यासाठी बनवलेल्या आहेत. आमच्या सर्व आयव्हीएफ प्रयोगशाळा सर्वोत्तम संवर्ध वातावरणासाठी क्लास १००० प्रयोगशाळा आहेत. नवीनतम पिढीतील फलन उपकरणे आणि कल्चर इनक्यूबेटर अंडी, भ्रूण आणि ब्लास्टोसिस्ट यांची उत्तम काळजी घेण्यासाठी मदत करतात. पायाभूत सुविधा
बीएफआयला अतिशय गुंतागुंतीच्या प्रकरणांवर उपचार करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, म्हणजेच यशस्वी उपचाराची आशा सदैव आहे! उपचाराच्या परिणामांमध्ये मोठा फरक अनुभवण्यासाठी आम्ही अंडाशयाच्या उत्तेजनास नेहमीच सानुकूलित, अत्यंत वैयक्तिकृत, विशेषीकृत आणि इष्टतम पद्धतीने संरचित करतो. यामुळेच बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट इतरांपेक्षा वेगळी आहे.
आयव्हीएफ अयशस्वी झालेल्या रूग्णांना 100% सर्वांगीण संरक्षण प्रदान करण्यासाठी आमच्याकडे अद्वितीय असे ‘सुरक्षा कवच पॅकेज’ आहे. या पॅकेजमध्ये मानक म्हणून सर्व प्रगत तंत्र समाविष्ट असून, रुग्णांना त्यांचा लाभ दिला जातो. अधिक जाणून घ्या
आयव्हीएफ अयशस्वी होण्याच्या तपासणी आणि उपचारांबाबत बीएफआयकडे एक पद्धतशीर दृष्टिकोन आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयशस्वी आयव्हीएफ सायकलचे काळजीपूर्वक विश्लेषण. आमची टीम उपचार सायकलला लहान लहान टप्प्यात किंवा तुकड्यांमध्ये विभाजित करते आणि त्याची सखोल चौकशी करते. या विश्लेषणातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांचा आम्ही भविष्यातील उपचारांना सुसंगत आणि सुधारित करण्यासाठी उपयोग करतो.
उपचार सायकलमधून पुनर्प्राप्त झालेल्या ऊसाइट्सची संख्या आणि गुणवत्तेचे विश्लेषण केले जाते. यावरून आम्ही उत्तेजनाचा इष्टतम डोस आणि प्रोटोकॉल निर्धारित करतो. आम्ही तुमच्या बाबतीत लांब प्रोटोकॉल, शॉर्ट प्रोटोकॉल, मायक्रोडोज फ्लेअर प्रोटोकॉल किंवा किमान उत्तेजन आयव्हीएफ सुचवू शकतो. जर ऊसाइट्सची संख्या खूपच कमी असेल, तर तुम्हाला आमच्या स्वीकृत अशा डिम्बग्रंथी पुनरुज्जीवन किंवा ड्युअल स्टिम्युलेशन ‘ड्यूओस्टीम’चा फायदा होऊ शकेल.
सहसा, 70% किंवा अधिक परिपक्व ऊसाइट्सचे भ्रुण गर्भ तयार करण्यासाठी फलन होते. जेव्हा फलन प्रक्रिया योग्यरीत्या झालेली नसते, तेव्हा क्वचित प्रसंगी शुक्राणूंची डीएनए विखंडन चाचणी आणि विशेष अनुवंशिक चाचण्यांची शिफारस केली जाते.
शुक्राणूंची चांगली निवड साध्य करण्यासाठी आम्ही पीआयसीएसआय वापरू शकतो. या तंत्राद्वारे अंड्याच्या बाह्य पृष्ठभागाशी नैसर्गिकरित्या जुळण्यास सक्षम असणाऱ्या शुक्राणूंची निवड केली जाते. यामुळे उत्तम प्रतीचे शुक्राणू निवडण्यात मदत होते. अधिक वाचा.
अंड्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि फलनादरम्यान अंड्याचे नुकसान टाळण्यासाठी, आम्ही स्पिंडल व्हिव आयसीएसआय – पोलराईस्कोप वापरू शकतो. हे तंत्र अंड्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी एक चांगले साधन प्रदान करते आणि आम्हाला अंड्यांमध्ये शुक्राणूंचे इंजेक्शन करण्यासाठी योग्य ठिकाण ओळखण्याची परवानगी देते. अधिक वाचा
गर्भाची गुणवत्ता फलनावर देखील अवलंबून असते. फलन प्रक्रिया सुधारण्यासाठी वापरले जाणारे तंत्र निकृष्ट दर्जाच्या भ्रूणांच्या संदर्भात देखील उपयुक्त असतात.
70% प्रकरणांमध्ये भ्रूणाशी संबंधित घटकांमुळे आणि 30% प्रकरणांमध्ये गर्भाशय व इतर संबंधित घटकांमुळे आयव्हीएफ अयशस्वी होऊ शकते. चांगला दिसणारा प्रत्येक भ्रुण गर्भधारणा करण्यास आणि निरोगी मूल जन्मास घालण्यास सक्षम असतो असे नाही. आयव्हीएफ यशासाठी भ्रूणाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे, त्याची गुणवत्ता सुधारणे आणि हस्तांतरणासाठी सर्वोत्तम भ्रुण निवडणे महत्त्वपूर्ण आहे.
फलनानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसाच्या भ्रुणाला ब्लास्टोसिस्ट म्हणतात. केवळ 30 ते 60% भ्रूण ब्लास्टोसिस्ट टप्प्यावर पोहोचतात. या तंत्रामुळे अधिक चांगल्या भ्रुणांची नैसर्गिक पद्धतीने निवड करण्यात मदत होते.
भ्रुण अवस्थेमध्ये, अगदी उत्तम दिसणार्या भ्रुण किंवा ब्लास्टोसिस्टमध्ये अनुवांशिक विकृती आढळले सामान्य आहे. अनुवांशिकदृष्ट्या अपसामान्य असलेले भ्रुण रोपण करण्यात अपयशी ठरतात किंवा गर्भपातास कारणीभूत ठरतात. पीजीटीद्वारे हस्तांतरणासाठी अनुवांशिकदृष्ट्या सामान्य असलेले भ्रुण निवडणे शक्य होते, यामुळे प्रत्येक हस्तांतरणानुसार गर्भधारणेची संधी वाढते आणि गर्भपाताचा धोका कमी होतो. अधिक वाचा
भ्रुण वाढण्यासाठी चांगल्या जागेची आवश्यकता असते. मातीसुद्धा बियाण्याइतकीच महत्त्वाची असते. भ्रुणरोपणात ज्यांमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो, अशा गर्भाशयाच्या पोकळीतील समस्यांचे आणि एंडोमेट्रियमच्या कोणत्याही समस्येचे निदान करण्यात हिस्टेरोस्कोपी मदत करते. आम्ही एकाच वेळी त्यांतील बऱ्याच समस्या दूर करू शकतो. जरी वरवर पाहता हिस्टिरोस्कोपी सामान्य असली, तरीही रोपण सुधारण्यासाठी म्हणून एंडोमेट्रियम एक्टिवेशन – उत्तेजनाची एक छोटी प्रक्रिया केली जाऊ शकते. अधिक वाचा
एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अॅरे एआरए चाचणी गर्भाच्या हस्तांतरणाच्या वेळी एंडोमेट्रियमच्या जनुकीय अभिव्यक्तिचा अभ्यास करते. ईटी सुसंगत वेळी पूर्ण व्हावे, यासाठी ही चाचणी भ्रुण हस्तांतरणासाठी योग्य वेळ सुनिश्चित करते.. अधिक वाचा
अपेक्षित फायदा होतो की नाही हे बघण्यासाठी हायड्रोसालपिंक्स, फायब्रॉइड्स, एडेनोमायोसिस आणि पेल्व्हिक आसंजन इ. चे मूल्यांकन करणे आणि योग्य पद्धतीने त्यांवर उपचार करणे गरजेचे आहे.
थ्रोम्बोफिलिया हा रक्त जमण्याच्या विकृतींचा एक गट आहे, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो आणि आयव्हीएफच्या यशाचे प्रमाण कमी होऊ शकते. रक्त तपासणीद्वारे त्यांची तपासणी केली जाऊ शकते. जर तपासणीत सकारात्मक लक्षणे असतील, तर आम्ही तुम्हाला काही औषधे किंवा इंजेक्शन देण्याचा सल्ला देऊ.
पती किंवा पत्नीमधील गुणसूत्रांमध्ये असंतुलन असल्याने अनुवांशिकरित्या अपसामान्य भ्रुण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अशा भ्रूणांचे रोपण अयशस्वी होते आणि आयव्हीएफ अयशस्वी होऊ शकते. रक्तचाचणीप्रमाणे गुणसूत्रांची चाचणी केली जाऊ शकते. जर अनुवांशिक विकृती आढळल्यास पीजीटी मदत करू शकते.
आयव्हीएफची पुढील सायकल सुरू करण्यापूर्वी वाट बघण्याची आवश्यकता नाही. आपण पुढच्या महिन्यात किंवा शक्य तितक्या लवकर प्रयत्न केलात किंवा काही महिने थांबलात, तरी निकाल मात्र सारखेच असतात. आमच्या अनुभवानुसार, आयव्हीएफ अपयशी झाल्यानंतर पुढच्या महिन्यात उपचार परत सुरू केल्याने उच्च परिणाम मिळण्याची शक्यता असते. पण अधिक जास्त दिवस प्रतीक्षा केल्यास पुन्हा रक्त तपासणीची गरज पडू शकते आणि कदाचित तुमच्या अंड्यांची संख्याही कमी होऊ शकते.
पुढील सायकल सुरु करण्यापूर्वी आम्ही आमच्या प्रयत्नांत कोणतीही कसर सोडत नाही. एकदा अपयश आले म्हणजे नेहमी अपयशी येईल असे नाही, उलट पुढील सायकल तुम्हाला त्याहूनही चांगली संधी देऊ शकेल. जो लढतो, तोच फक्त जिंकू शकतो; जो मैदान सोडतो, त्याला जिंकण्याची संधी नसते. तयार व्हा; तुमची यशोगाथा फक्त तुम्हीच निर्माण करू शकता.
WhatsApp us