Bavishi Fertility Institute

आयसीएसआय उपचार (इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन)

आयसीएसआय हे एक चमत्कारिक प्रभावशाली तंत्र आहे, ज्यामध्ये एका अंड्याचे फलन करण्यासाठी फक्त एकाच शुक्रणूची गरज असते. आयसीएसआयने आयव्हीएफमधील फलन प्रक्रियेलाच बदलून टाकले आहे आणि इतर वेळी अशक्य असणाऱ्या परिस्थितीतही आयव्हीएफ यशस्वी करण्यात योगदान दिले आहे. 

आयसीएसआय हे आयव्हीएफ उपचाराचे भाग असून, त्याचा फलनासाठी वापर केला जातो. म्हणून, आयव्हीएफ आणि आयसीएसआय ह्या दोन भिन्न बाबी नाहीत. 

प्रजननात फलन अतिशय महत्वाची पायरी असते. नसर्गिक फलन प्रक्रियेत फलन यशस्वी होण्यासाठी लाखोंच्या संख्येत शुक्राणूंची गरज पडते. म्हणून, सामान्य परिस्थितीत प्रती एमएल वीर्यात दीड कोटी (१५ मिलियन) शुक्राणूंची संख्या गृहीत धरली जाते. 

पारंपरिक आयव्हीएफमध्ये फलन प्रक्रिया ही एका छोट्या प्रमाणातील वाढ संगोपन माध्यमात (कल्चर मिडियम) काही शेकडो शुक्राणू व एक अंडी ठेवून पार पाडली जाते. त्यानंतर शुक्राणूद्वारे अंड्याचे फलन होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. शुक्राणूद्वारे अंड्याचे फलन होण्याची क्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शुक्राणू किंवा अंड्याची विशिष्ट क्षमता आवश्यक असते. 

कधीकधी परंपरागत आयव्हीएफ प्रक्रियेत आपण फलन अयशस्वी झाल्याचे किंवा वाईट झाल्याचे बघतो. परंपरागत आयव्हीएफमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता यांच्याकडे बहुतेकवेळा दुर्लक्ष केले जाते, आणि म्हणूनच अशावेळी आयसीएसआयची गरज पडते.

आयसीएसआयच्या आगमनानंतर फलनाशी संबंधित अनेक समस्या मोठ्या प्रमाणात सोडवल्या गेल्या आहेत तंत्रज्ञाना आणि स्वतःचे कुशल भ्रुणशास्त्रज्ञ असणाऱ्या सर्व चांगल्या आयव्हीएफ क्लिनिकक्समध्ये आयसीएसआयला प्राधान्य दिले जाते. 

जेव्हा फलनाचा विषय असतो, तेव्हा बीएफआय ‘सर्वांसाठी आयसीएसआय’ धोरण राबवते. आमच्या नवीनतम पिढीतील स्वयंचलित मशीन आम्हाला अगदी मायक्रोंसमध्ये तंतोतत परिणाम दर्शवतात. यामुळे आमच्या अनुभवी व तज्ज्ञ भ्रुणतज्ज्ञांना फलनाचे सर्वोत्तम परिणाम प्रदान करणे शक्य होते.

आयसीएसआयचे विस्तारित रूप

  • इंट्रा आतमध्ये 
  • सायटोप्लाझ्मिक स्त्रीबीजांडाचे पेशीद्रव्य – अंडी 
  • स्पर्म नर जननपेशी
  • इंजेक्शन टाकणे

आयसीएसआय कसे केले जाते?

आयसीएसआयची हाताळणी सुरळीत व्हावी यासाठी शुक्राणूला विशिष्टरित्या तयार केले जाते. छोट्यातल्या छोट्या गोष्टींचे विश्लेषण करण्यासाठी शुक्राणुला विशिष्ट सूक्ष्मदर्शीद्वारे बघितले जाते. आयसीएसआयमध्ये सूक्ष्मदर्शीमध्ये दिसलेल्या शुक्राणूच्या हालचाल व स्वरूपावरून उत्तम शुक्राणू सर्वांत आधी निवडले जाते. मायक्रोमॅन्युपुलेशन तंत्राद्वारे शुक्राणूंना त्यांच्या शेपटीला टिचकी देऊन सक्रीय केले जाते. यामुळे शुक्राणूमध्ये शेवटचा बदल येतो आणि ते अंड्याच्या संपर्कात येते; याला शुक्राणूच्या शिराची प्रतिक्रिया म्हणतात. त्यानंतर विशिष्ट सुईद्वारे एक शुक्राणू अंड्यात टाकले जाते . अशाप्रकारे फलन जवळपास पूर्ण होते. आयसीएसआयमध्ये अंडी खराब होन्याची शक्यता खूप कमी असतात.

ICSI

लाखों नाही, तर एका अंड्याचे फलन करण्यासाठी फक्त एकच शुक्राणू लागतो!

आयसीएसआय कुणासाठी आहे?

आयसीएसआय पारंपारिक आयव्हीएफपेक्षा चांगले फलन घडवून आणते आणि त्यामुळे गर्भधारणा होण्याच्या शक्यताही वाढतात. म्हणून, बावीशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटमधील जवळपास सर्वच आयव्हीएफ सायकल्समध्ये आयसीएसआय सायकल्सचा समावेश असतो. अतिशय कमी फलन क्षमता असणारे शुक्राणूसुद्धा आयसीएसआयमध्ये वापरता येतात.

विशेषतः आयसीएसआयची आवश्यकता असते :

 

ICSI

कमी गुणवत्तेचे शुक्राणू असणाऱ्या पुरुषासाठी

  • शुक्राणूची कमी संहती 
  • कमी विचलनक्षमता 
  • वाईट स्वरूप संरचना 
  • गोठलेले शुक्राणू 
  • अतिशय कमी उपलब्धता 
  • पूर्वीच्या फलनातील अपयश 
  • वृषण किंवा अधिवृषणापासून मिळालेले शुक्राणू 
  • शुक्रपेशीहीनता असलेले रुग्ण 
  • नसबंदी केलेले रुग्ण

अशा स्त्रिया ज्यांना अधिक लाभ होऊ शकतो

  • अतिशय कमी अंडी 
  • कमी गुणवत्तेची अंडी 
  • पारंपरिक आयव्हीएफमुळे पूर्वी अयशस्वी झालेले फलन 
  • अधिक वय

बीएफआयचा फायदा

अस्पष्ट वंध्यत्व असणारे जोडपेही आयसीएसआयचा लाभ घेऊ शकतात आणि फलनाच्या अनपेक्षित अपयशाला टाळू शकतात.

ICSI

आमचे स्थान