BFI

आयव्हीएफ म्हणजे काय?

इन व्हिट्रो फर्टीलायझेशन – आयव्हीएफ एक सहाय्यक प्रजनन तंत्र आहे, ज्याअंतर्गत एका अंड्याचे शुक्राणूसोबत प्रयोगशाळेत फलन केले जाते. त्यानंतर, आधीच तयार झालेले भ्रुण स्त्रीच्या गर्भाशयात ठेवले जाते.

आयव्हीएफ हे इन व्हिट्रो (शरीराच्या बाहेर) फर्टीलायझेशनचे (एका स्त्रीबीजांडाचे एका पुरुषाच्या शुक्राणूद्वारे फलन) संक्षिप्त रूप आहे; सुरुवातीला ही प्रक्रिया परीक्षण नळीमध्ये पार पाडण्यात आली होती. म्हणून, या ही प्रक्रिया ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या नावाने लोकप्रिय आहे.

ज्यामध्ये पद्धतीत स्त्रीबीजांडांना स्त्रीच्या शरीराच्या बाहेर काढून प्रयोगशाळेत त्यांचे फलन व वाढ केली जाते आणि नंतर प्राप्त झालेले भ्रुण स्त्रीच्या गर्भाशयात टाकले जातात, असा कोणत्याही उपचारासाठी ‘आयव्हीएफ’ हे एक सर्वसामान्य नाव आहे. ज्याअर्थी अंडी व भ्रुण शरीराच्या बाहेर असतात, त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर करून या उपचाराच्या यशस्वी होण्याच्या शक्यता वाढवू शकतो. आयव्हीएफ ही एकमेव अशी उपचार पद्धती आहे, जिच्यात रोपणाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या भ्रुणांनाही आपण गर्भाशयात ठेवू शकतो.

आयव्हीएफचे फायदे

 • किती भ्रुण तयार झाले व त्यांची गुणवत्ता कशी आहे, हे आपण माहित करू शकतो.
 • उच्च गुणवत्तेच्या भ्रूणांची निवड आणि हस्तांतरण
 • जर अतिरिक्त भ्रुण असतील, तर भविष्यातील उपयोगासाठी त्यांना गोठवता येते
 • फलन व रोपणाच्या वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर
 • गरज पडल्यास भ्रुणांची जनुकीय तपासणी करता येणे
 • जगभरात आयव्हीएफच्या माध्यमातून ५० लाखांहून अधिक निरोगी मुळे जन्मास आली आहेत आणि ही संख्या जोमाने वाढत आहे.

आयव्हीएफ प्रक्रियेतील टप्पे

आयव्हीएफमध्ये ५ टप्प्यांचा समावेश आहे.

 • उपचारपूर्व मूल्यमापन
 • उत्तेजन
 • स्त्रीबीजांडाची पुनर्प्राप्ती आणि फलन
 • भ्रुण हस्तांतरण
 • गर्भधारणा चाचणी

उपचारपूर्व मूल्यमापन

इष्टतम परिणाम मिळावेत म्हणून उपचारापूर्वी जोडप्याचे सखोल मूल्यमापन करण्यावर बीएफआय विश्वास ठेवते. याअंतर्गत फक्त आवश्यक चाचण्यांचीच शिफारस केली जाते.

रक्त चाचण्या, वीर्य परीक्षणं, वीर्य शीतन, आवश्यकता पडल्यास इतर विशिष्ट चाचणी

मादी जोडीदार

 • जर तुमच्या संदर्भात गरज पडलीच, तर आम्ही आव्हीएफपूर्वी हिस्टेरोस्कोपीचा सल्ला देऊ शकतो.
 • जर गरज पडली, तर विशिष्ट चाचणी अथवा फिटनेस मुल्यमापन

उत्तेजन

बीएफआय प्रत्येक जोडप्याला उच्च दर्जाचे अनुकूल आणि वैयक्तिकृत उत्तेजन प्रोटोकॉल प्रदान करते.

उत्तेजन प्रोटोकॉल्स खालीलप्रमाणे असू शकतात –

 • प्रतिस्पर्धी प्रोटोकॉल (लघु प्रोटोकॉल)
 • डाऊन रेग्युलेशन (दीर्घ प्रोटोकॉल)
 • फ्लेअर प्रोटोकॉल
 • दुहेरी उत्तेजन प्रोटोकॉल
 • किमान उत्तेजन प्रोटोकॉल
 • इतर सानुकुलीत प्रोटोकॉल

मासिक पाळीनंतर उत्तेजनाला सुरुवात होते. परिपक्व स्त्रीबीजांडांची (अंडी) लक्षणीय संख्येत निर्मिती करण्यासाठी गोनॅडोट्रॉपीन संप्रेरकाचे विशिष्ट डोस देऊन उत्तेजन पार पाडले जाते. परिणामी, यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. उत्तेजन इंजेक्शन हे प्रतिदिवशी एक असे अंदाजे ७ ते १२ दिवसांसाठीचे डोस आहेत. अपेक्षित परिणाम मिळावेत म्हणून इंजेक्शन्सच्या वेळी प्रतिसाद व मात्रांच्या सुव्यवस्थेची देखरेख करण्यासाठी उच्च ध्वनीलहरींची नियमित निर्मिती केली जाते.

वेळेआधीच व अनियोजित ओव्ह्युलेशन टाळण्यासाठी आयव्हीएफ सायकल दीर्घ किंवा प्रतिस्पर्धी (लघु) प्रोटोकॉलच्या साहाय्याने केली जाते.

अंडोत्सर्गाची सुरुवात – ट्रिगर 

एकदा डिंबग्रंथि पुटक (ओव्हरीयन फॉलिकल) विशिष्ट संख्या व व्यासापर्यंतचे झाले, की मग अंतिम परिपक्वतेसाठी व अंड्यांना वेगळे करण्यासाठी इंजेक्शन दिले जाते, या प्रक्रियेलाच ‘ट्रिगर’ म्हणतात. ट्रिगरसाठी जीआरएच विरोधी किंवा ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपीन हे ड्रग्स विविध मात्रांमध्ये व संयोजनांमध्ये वापरले जाऊ शकतात.

बीएफआयमध्ये आम्ही प्रत्येक जोडप्यासाठी सोयीस्कर अशा सर्वोत्तम ट्रिगर्सचा वापर करतो. पुटकांची संख्या, संप्रेरक पातळी, डिंबग्रंथिचे आकार, सामान्य आरोग्य, पूर्वीचे प्रतिसाद, ओएचएसएसची जोखीम, औषधे, उत्तेजनासाठी वापरले जाणारे प्रोटोकॉल्स आणि बऱ्याच गोष्टींना आम्ही लक्षात घेतो.

बीएफआयचे ‘ट्रिगर इट राईट’ हे सर्वोत्तम ट्रिगर आहे आणि यामुळे आम्हाला सुरक्षितरित्या उत्तम गुणवत्तेची अंडी चांगल्या संख्येत मिळण्यास मदत होते.

स्त्रीबीजांडाची पुनर्प्राप्ती आणि फलन

ऊसाईट पुनर्प्राप्ती 

स्त्रीबीजांड पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेला फॉलिक्युलर पंक्चर किंवा ओव्ह्युम पिक अपओपीयू म्हणूनही ओळखले जाते. या प्रक्रियेत स्त्रीच्या डिंबग्रंथीतून (ओव्हरी) सर्व बीजांडांना बाहेर काढले जाते व प्राप्त केले जाते. ट्रिगरच्या ३४ ते ३६ तासांनंतर ही प्रक्रिया केली जाते. ही एक छोटीशी सर्जिकल क्रिया आहे, जी फक्त योनीमार्गे केली जाते आणि म्हणून यामध्ये कोणत्याही कापण्याच्या क्रियेचा किंवा टाक्यांचा समावेश नसतो. साधी आणि वेदनारहित असलेली ही छोटीशी प्रक्रिया शस्त्रक्रिया गृहात उपशामकता/लघु संवेदनहीनता यांच्या साहाय्याने सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जाते. २ तासांच्या निरीक्षणानंतर रुग्ण घरी परत जाऊ शकतो.

बीएफआयची फॉलिकल फ्लशिंग टेक्निक जास्तीत जास्त स्त्रीबीजांड प्राप्त होण्यात मदत करते. 

फलनासाठी शुक्राणूची तयारी आणि निवडया दोन्ही बाबा एकाच टप्प्यात घडतील. 

स्त्रीबीजांड प्राप्त करण्याच्या दिवशीच वीर्याचे संकलन केले जाते.

वीर्यातून सर्वांत गतिशील, रूपकात्मकरित्या सामान्य आणि ऑप्टीकली फर्टाईल शुक्राणूंना वेगळे करण्यासाठी बीएफआयची विशेषीकृत शुक्राणू निवड प्रक्रिया वापरली जाते. फलनाला नकरात्मकरित्या प्रभावित करू शकतात अशा वीर्य द्रव्याला आणि इतर पेशींना आम्ही काढून टाकतो.

अंड्यांचे फलन या टप्प्यात होईल. 

रीबीजांड संकलन करण्याच्या दिवशीच आयव्हीएफ प्रयोगशाळेत ऊसाईटचे फलन केले जाते. इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएससाय) प्रक्रियेद्वारे अंड्याचे फलन केले जाते. एका अंड्यात एक शुक्राणू इंजेक्ट करून आयसीएससाय केले जाते.

बीएफआयचेआयसीएससाय फॉर ऑलधोरण जोडप्यांना फलनाच्या कमाल संधी व एकूण फलन अपयशी होण्याच्या किमान संधी प्रदान करते.

एम्ब्रियो कल्चर 

पूर्णतः शरीरासारखे वातावरण प्रदान करणाऱ्याइन्क्युबेटर्समध्ये फलन झालेली अंडी वाढवलीसंवर्धित केली जातात. आमच्या प्रयोगशाळेतील भ्रुणशास्त्रज्ञांद्वारे भ्रुण विकासाची अतिशय काटेकोरपणे व लक्षपूर्वक देखरेख केली जाते. 

बीएफआयकडे आधुनिक पिढीच्या उबवणी (इन्क्युबेटर्स), इष्टतम संवर्धन तंत्र, समृद्ध संवर्धन माध्यम, १००० उत्तम आयव्हीएफ प्रयोगशाळा आणि कुशल, पात्र व अनुभवी भ्रुणशास्त्रज्ञ आहेत.

संवर्ध परिस्थिती भ्रूणाच्या गुणवत्तेला प्रभावित करू शकते, यामुळे आमच्या सर्वोतम अशा १००० प्रयोगशाळा याबाबतीत परिणामकारक ठरू शकतात. एका चांगल्या प्रयोगशाळेत विकसनाच्या ६ व्या दिवसापर्यंत भ्रुण सुरक्षितरीत्या संवर्धित करता येते.

भ्रुण हस्तांतरण 

मासिक पाळीच्या मध्यावधीच्या काही दिवसांनी, म्हणजेच फलनाच्या दोन ते सहा दिवसांच्या आत उत्तम गुणवत्तेचे भ्रुण गर्भाशयात ठेवले जाते. 

विकसनाच्या २ ते ६ दिवसांच्या दरम्यान भ्रुण ग्राहक स्त्रीच्या गर्भाशयात टाकले जाऊ शकते. हे सर्वकाही प्रत्येक रुग्णाची निवड, उपलब्ध भ्रुण आणि भ्रुणशास्त्रज्ञांच्या अभिप्रायावर अवलंबून असते.

एटी ही एक आरामदाय व वेदनारहीत प्रक्रिया आहे, जिच्यात उपशमाची गरज नसते. 

हस्तांतरित भ्रुणांची संख्या 

रुग्णांच्या आवडलेल्या अशाप्रकारची लवचिकता बीएफआय प्रदान करत असते.  रुग्णाच्या जननआरोग्याचा इतिहास, भ्रुणांची संख्या व गुणवत्ता आणि एक किंवा दोन बाळ हवे असण्याची रुग्णाची इच्छा यांच्या आधारावर आम्ही १ ते ३ भ्रुण हस्तांतरित करत असतो.

याबाबत अंतिम निर्णय जोडपे व डॉक्टर यांचा संयुक्त निर्णय असतो.

भ्रुण हस्तांतरणाच्या दिवशी 

बीएफआय भ्रुण विकासाची अतिशय जवळून पाहणी करते आणि त्यानुसार भ्रुण हस्तांतरण करण्यासाठी इष्टतम दिवसाची निवड करते.

एटीनंतरचे अतिरिक्त भ्रुण 

हस्तांतरण प्रक्रियेनंतर जर काही भ्रुण उर्वरित असतील, तर ते यशस्वी व्हिट्रीफिकेशन तंत्राच्या मदतीने गोठवले जाऊ शकतात. 

गोठलेल्या भ्रुणांची (फ्रोझन एम्ब्रियो) जवळपास १००% जिवंतपणाची पातळी बीएफआयने गाठली आहे. हे फ्रोझन एम्ब्रियो ताज्या भ्रुणांइतकेच चांगले परिणाम देऊ शकतात. 

गर्भधारणा चाचणी 

भ्रुण हस्तांतरणाच्या १३ ते १५ दिवसांनंतर बीटा एचसीजी नावाच्या रक्त चाचणीसह गर्भधारणा चाचणी केली जाते.

कोणकोणत्या बाबतींत आयव्हीएफची शिफारस केली जाते? 

 • आधी केलेले थेट उपचार, जसे की आर्टीफिशियल इंसेमिनेशन अपयशी झालेले रुग्ण 
 • नैसर्गिक फलन किंवा कृत्रिम वीर्यसेचनासाठी (आर्टीफिशियल इंसेमिनेशन) आवश्यक असलेल्या नलिकांची अनुपलब्धता किंवा इजा असणाऱ्या स्त्रिया
 • अॅडव्हान्स एंडोमेट्रीऑसीस किंवा चॉकलेट सिस्ट, बॉक्सेस आणि ऊसाईट गुणवत्तेवर विपरीत परिणाम झालेल्या महिला 
 • अंड्यांची संख्या मर्यादित असण्याची स्थिती, जसे की, डिंबग्रंथीचा कमी झालेला साठा, अंड्यांची कमी संख्या, आधीच होणारी रजोनिवृत्ती किंवा अधिक वय 
 • शुक्राणूंची कमी झालेली संख्या किंवा गतिशीलता. असामान्य आकार असलेल्या शुक्राणूंची अधिक टक्केवारी.
 • पुरुषांमधील काही गंभीर प्रकरण, जसे कीशुक्रपेशीहीनता’ (अझोस्पर्मिया). या संदर्भात वृषण बायोप्सीद्वारे शुक्राणू मिळवले जाऊ शकते.
 • अस्पष्ट वंध्यत्वाचा संदर्भात आयव्हीएफ एक उत्तम उपचार पद्धती आहे, कारण अशा प्रकारात फलन झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणत्याही चाचण्या उपलब्ध नाहीत. आयव्हीएफ फक्त फलनच सुनिश्चित करत नाही, तर उत्तम गुणवत्तेच्या भ्रुणाची निवड करण्यातही मदत करते. 

आयव्हीएफचे इतर उपयोग 

रीबीजांड दानाची

रीबीजांड दानाची गरज असणाऱ्या रुग्णांना आयव्हीएफची गरज पडते. रजोनिवृत्ती झालेल्या किंव अतिशय कमी अंडी असणाऱ्या रुग्णांना स्त्रीबीजांड दानाची गरज आहेत. निम्न दर्जाचे भ्रुण व रोपण पुन्हा पुन्हा अयशस्वी होण्याच्या प्रकरणांमध्येही आयव्हीएफ मदतीचे ठरू शकते. 

सरोगसीची

सरोगसीची गरज असणाऱ्या रुग्णांनाही आयव्हीएफची गरज पडते. सरोगसीच्या परिणामांना प्रभावित करणारे मुख्य घटक म्हणजे आयव्हीएफची गुणवत्ता.

जनुकीय क्रमहीनतेचे प्रतिबंधन 

Patients having genetic conditions like thalassemia etc. can prevent transmission from parents to child by PGT technique with IVF. Read more

उपचार कालावधी 

उपचाराच्या तयारी व्यतिरिक्त अंडी निर्मितीपासून इटीच्या प्रत्यक्ष उपचारासाठी १२ ते १७ दिवसांचा कालावधी लागतो.

फोटोत दिलेल्या टाइमलाईननुसार आपण हे कालावधी बदलूही शकतो.

तंत्रज्ञान 

रुग्णांना सर्वोत्तम परिणाम प्रदान करण्याच्या उद्देशाने नवीनतम सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान स्मार्ट व न्यायपूर्वकरित्या वापरण्यात बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट अग्रेसर आहे.

इतर कोणत्याही उपचाराच्या तुलनेत आयव्हीएफचे यशस्वी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अनेक आधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञान आव्हीएला अधिक यशस्वी करतात. 

आमच्याशी संपर्क साधा 

उच्च यश दर, समर्पक टीम, जगप्रसिद्ध संशोधन आणि महत्त्वपूर्ण स्थान यांच्यासह आमचा पुढाकार अतुलनीय आहे आणि यामुळेच जगभरातील लोकांसाठी फर्टिलिटी क्लिनिकच्या निवडीत आम्हाला प्राधान्य दिले जाते. 

आमचे स्थान

  Book an Appointment

  Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.