आमच्या आकडेवारीच आमच्याविषयी खुपकाही सांगतात. आतापर्यंत पार पडलेल्या 20000+ पेक्षा जास्त यशस्वी आयव्हीएफ गर्भधारणा आणि संपूर्ण भारत व जगभरातील सर्वाधिक आयव्हीएफ यश दर! प्रत्येक रुग्णाच्या उपचारात शक्य तितके यश मिळविण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडत नाही.
यश ही यादृच्छिकपणे घडणारी बाब नाही; बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटमध्ये मिळणारे यश म्हणजे प्रत्येक रुग्णाला शक्य तितके उत्कृष्ट उपचार मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून घेतलेले शिक्षण, निरिक्षण, उत्तम पद्धती लागू करणे आणि तंत्रज्ञान व संसाधनांचा विवेकी उपयोग होय.
बाळाचे यशस्वी जन्म होताना बघणे आणि ज्या अपेक्षेने जोडपे व त्यांचे कुटुंबीय बीएफआयमध्ये येतात, ते मिळाल्याने त्यांना आनंदी असताना बघणे हेच आमचे यश आहे. आम्हाला आव्हाने आवडतात; दात्याचे अंडे, शुक्राणू किंवा भ्रुण सहजपणे वापरणे, यांसारखे शॉर्टकट आम्हाला आवडत नाही.
आयव्हीएफ उपचारांच्या १०० पेक्षा अधिक वर्षांच्या अनुभवासह बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट इष्टतम यशासाठी सानुकूलित उपचार प्रोटोकॉल्स उपलब्ध असणारे एक बेंचमार्क क्लिनिक आहे.
बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटच्या यशामागील सर्वांत निर्णायक घटक म्हणजे तिची अनुभवी आणि काळजीवाहू टीम. अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयव्हीएफ तज्ज्ञ प्रवर्तक आमच्या टीमचे मार्गदर्शन करतात.
अतिशय कठीण आणि दुर्मिळ प्रकरणांसोबतच हजारो जोडप्यांवर उपचार करण्याचा आमच्या कौशल्याची संपूर्ण टीमला मदत होते.
आमच्या टीमला नवीनतम घडामोडींशी निरंतर अद्ययावत ठेवण्यासाठी भारत आणि परदेशातही प्रशिक्षण दिले जाते. अंतर्गत प्रशिक्षण आणि जगातील अग्रगण्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ज्ञान आणि कौशल्याचे निरंतर उन्नयन सुनिश्चित केले जाते.
आमच्या टीमचे सदस्य प्रामाणिक, खरे आणि समर्पित आहेत. बहुतेक भावनिक पद्धतीच्या असणाऱ्या या उपचारात तुमची मदत करायला आमची टीम सदैव तयार असते.
उपचार आणि जखम भरून काढण्यासाठी विज्ञान नेहमीच समग्र पद्धतीने अस्तित्वात असते. उत्कृष्ट परिणाम मिळावेत म्हणून तुमचे उपचार करण्यापूर्वी आम्ही तुमच्या शरीरास उपचाराच्या अनुकूल बनवतो आणि त्यासाठी एका समग्र दृष्टीकोनाचा अवलंब करतो.
उपचारपूर्व मुल्यांकन, गर्भधारणेच्या संदर्भात तुमच्या शरीर व मनाची तयारी आणि मानसिक तयारीसाठी आधार यांच्यामुळे तुमच्या गर्भधारणेसाठी, रोपणासाठी आणि संपूर्ण उपचार यशस्वी करण्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होते.
आम्हाला माहित आहे, की प्रत्येक जोडप्याला निरोगी बाळ हवे असते. आमचे सर्व प्रोटोकॉल्स उच्च-ऑर्डरच्या एकाधिक गर्भधारणा टाळण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण अशा गर्भधारणांमुळे धोक्याची संभावना अधिक असते. तुम्हाला योग्य निर्णय घेता यावे यासाठी आम्ही तुम्हाला गर्भधारणा मार्गदर्शन आणि आवश्यक समर्थन प्रदान करतो. आई आणि मुलाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्यधिक जोखीम असलेल्या रुग्णांमध्येही आम्ही सावधतेने गर्भधारणेचे निरीक्षण करण्याच्या प्रोटोकॉल्सचे अनुसरण करतो. आमच्या निवडक केंद्रांवर सर्वोत्तम मातृत्व सेवा देखील उपलब्ध आहेत.
प्रत्येक खिशाला परवडतील असे अनेक उपचार पॅकेजचे पर्याय आम्ही ऑफर करतो. आमच्या थ्री-सायकल पॅकेजसह तुम्ही तुमच्या उपचाराच्या यशाच्या शक्यतांमध्ये तिप्पट वाढ करू शकता; किंवा सर्वांगीण संरक्षण प्रदान करणाऱ्या आमच्या “सुरक्षा कवच पॅकेज”चा पर्याय निवडून तुमच्या मनाची संपूर्ण शांतता सुनिश्चित करू शकता.
आमचे ध्येय तुमच्या उद्दीष्टांसह संरेखित आहेत आणि आम्ही तुमच्या फर्टिलिटी उपचाराचा प्रवास सोपा, सुरक्षित, स्मार्ट आणि यशस्वी करतो. तुमच्या यशाचा आनंद जितका तुम्ही साजरा करता, तितकाच आम्हीही साजरा करतो. आमची यशोगाथा म्हणजे दुसरे काही नसून, हजारो यशस्वी जोडप्यांच्या एकाधिक यशोगाथेद्वारे निर्मित पराक्रमाची एक गाथा आहे.
WhatsApp us