BFI

गोपनीयता धोरण

संकेतस्थळाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा पुरवण्यासाठी बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटला तुमच्या माहितीचा योग्य हेतूने वापर करण्याचा अधिकार आहे.

यासाठी वापरकर्त्याची संमती आवश्यक असेल आणि म्हणून त्यांनी हे गोपनीयता धोरण स्वीकारवे.

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट तुमच्या गोपनीयता व वैयक्तिक माहितीला अतिशय काळजीपूर्वक संरक्षित करते. म्हणून, तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते आणि अतिशय काळजीपूर्वक हाताळली जाते.

बीएफआय फर्टिलिटी इन्स्टिट्यूटद्वारे  वापरकर्त्याच्या मागणीनुसार त्यांना हवी ती सेवा आणि माहिती उपलब्ध करवून दिली जाते. संबंधित सेवेची (“सेवा”, आता सुरु होत आहे) उपलब्धता आणि वापराचे नियमन या गोपनीयता धोरणाद्वारे केले जाते.

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटद्वारे संकलित करण्यात आलेली तुमची वैयक्तिक माहिती खालील उद्देशांसाठी वापरली जाऊ शकते : 

(i) वेबसाइटवर प्रदान करण्यात येणाऱ्या सेवांची तरतूद.

(ii) जर त्यांची इच्छा असेल तर, त्यांना पत्र, टेलिफोन, एसएमएस किंवा संवादाच्या इतर समकक्ष माध्यमांद्वारे व्यावसायिक संप्रेषणे आणि/किंवा बातमीपत्रे पाठवणे. जोपर्यंत वापरकर्त्यांनी या उद्देशाने त्यांच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यास सहमती दर्शविली आहे, पर्यंतच या सेवा प्रदान करण्यात येतील.

त्याचप्रमाणे, वापरकर्ते त्यांच्या माहितीच्या प्रोफाइलिंग आणि विभाजनासाठी त्यांची माहिती हाताळण्याची परवानगी देतात.  जसे की आधीच नमूद केले आहे, तुमच्या माहितीवर केली जाणारी ही प्रक्रिया संकेतस्थळावरील ट्रॅफिक आणि त्याचे वापर यांच्याविषयीच्या सांख्यिकीचे विश्लेषण आणि अभ्यासासाठी केली जाऊ शकते. सोबतच, संकेतस्थळावर भेट देणाऱ्या लोकांची रुची कशात आहे जाणून घेण्यासाठी  आणि त्यानुसार त्यांना जाहिरातात्मक माहिती पाठविणे यांसाठीही तुमच्या माहितीवर प्रक्रिया केली जाऊ शकते.

माहितीची सत्यता:

वापरकर्ते हमी देतात, की त्यांनी प्रदान केलेली वैयक्तिक माहिती सत्य आहे आणि त्यामध्ये कोणत्याही सुधारणेसंदर्भात बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटशी संवाद साधण्यास जबाबदार आहेत. जर वापरकर्त्यांनी चुकीची माहिती पुरवली, तर त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्व नोंदणीकृत सेवांना वगळण्याचा अधिकार बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटला आहे. तरीही, जर एखादी परिस्थिती उद्भवलीच, तर कायद्यानुसार होणाऱ्या इतर कारवाईविषयी कोणताही पूर्वग्रह न बाळगता वापरकर्ते त्यांच्या माहितीची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी बीएफआयला प्रतिसाद देतील.

सुरक्षा साधनांच्या वापराद्वारे माहिती संरक्षणाच्या दृष्टीने आपण खातरजमा करावी, अशी शिफारस केली जाते आणि तुमच्या माहितीची चोरी, बदल किंवा गमावल्याबद्दल बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटला जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

तुमच्या माहितीत कोणतेही बदल किंवा अद्यतने झाले असतील, तर या गोपनीयता धोरणात उपलब्ध असलेल्या संपर्काच्या माध्यमांद्वारे बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

मी माझी संमती कशी मागे घेऊ आणि अधिकारांचे वापर कसे करु?

वापरकर्त्यांना १) त्यांची वैयक्तिक माहिती हाताळण्याचा, तसेच २) चुकीच्या माहितीला सुधारण्याची विनंती करण्याचा, योग्य तिथे ३)  माहिती हटविण्याची विनंती करण्याचा, ४) त्यांच्या माहितीवर मर्यादित प्रक्रिया करण्याची विनंती, ५) तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यास विरोध करण्याचा, ६) तुमची माहिती विसरण्याचा अधिकार वापरण्याचा आणि ७) माहितीच्या पोर्टेबिलिटीची विनंती करण्याचा अधिकार आहे. 

हे अधिकार वापरण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय ओळख कागदपत्राची किंवा कायद्यातील अन्य कोणत्याही वैध पत्राची छायांकित प्रत पाठवून बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट त्यांची ओळख सिद्ध केली पाहिजे.

वापरकर्ते हे सर्व अधिकार या गोपनीयता धोरणात प्रदान केलेल्या संप्रेषणाच्या माध्यमांद्वारे वापरू शकतात.

तुमच्या वैयक्तिक माहितीची हाताळणी नियमांनुसार होत नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या अधिकाऱ्यांच्या वापरणे तुम्ही समाधानी नसाल, तर अशावेळी तुम्हाला इतर कोणत्याही प्रशासकीय उपाय किंवा कायदेशीर कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता नियंत्रण प्राधिकरणाकडे आपला दावा दाखल करण्याचा अधिकार असेल. ज्या नियंत्रण प्राधिकरणाकडे तुम्ही दावा सादर केला गेला आहे,  ते दावाकर्त्यास दाव्यासंबंधीची कारवाई आणि परिणामाबद्दल सूचित करेल.

सुरक्षा आणि माहिती संवर्धन:

बाविशी फर्स्टिलिटी इन्स्टिट्यूटसाठी तिच्या रुग्णांच्या व अभ्यागतांच्या गोपनीयतेचे आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट तुमच्या माहितीचा गैरवापर होऊ नये या उद्देशाने संपूर्ण दक्षता घेते. तुमची माहिती फक्त अधिकृत कर्मचार्‍यांद्वारेच हाताळली जाऊ शकते. 

बाविशी फर्स्टिलिटी इन्स्टिट्यूट लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करून वैयक्तिक माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करते. संकेतस्थळाच्या माध्यमातून वापरकर्त्याने पुरवलेल्या माहितीची चोरी, गहाळ, गैरवापर, बदल व अनधिकृत हाताळणी होण्यापासून रोखण्यासाठी बीएफआयने उत्कृष्ट तांत्रिक प्रणाली स्थापित केली आहे. तरीही, कोणताही पूर्वग्रह बाळगता आम्ही तुम्हाला हे सुनिश्चित करू इच्छितो, की इंटरनेट सुरक्षा पर्याय अभेद्य नसतात.

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट लागू असलेल्या कायद्यानुसार वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीविषयी गुप्तता आणि गोपनीयतेचे कर्तव्य पाळण्याची जबाबदारी स्वीकारते. जिथे योग्य आहे, तिथे आंतरराष्ट्रीय प्रक्रियांमध्ये माहितीची सुरक्षित हाताळणी व हस्तांतरणास बीएफआय परवानगी  देते.   

बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटद्वारे सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेळेपर्यंत वैयक्तिक माहिती साठवली जाईल.

गोपनीयता धोरणातील सुधारणा आणि बदल:

या गोपनीयता धोरणात बदल करण्याचा अधिकार बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट स्वतःकडे राखून ठेवते. जेव्हाही या गोपनीयता धोरणात बदल केले जातील, तेव्हा त्याविषयी परिस्थितीनुसार आमच्या संकेतस्थळावर नोटीसाद्वारे किंवा इतर योग्य प्रक्रियेद्वारे कळवले जाईल. 

इतर वेब पेजेसचे दुवे :

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटच्या संकेतस्थळावर त्रयस्थ कंपन्यांच्या आणि आस्थापनांच्या संकेतस्थळांचे दुवे उपलब्ध असू शकतात.

ह्या कंपन्या गोपनीयतेला आणि वैयक्तिक माहितीला कशाप्रकारे हाताळतात याविषयी बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सल्ला देतो, की ह्या वेबपेजेसच्या गोपनीयता  धोरणांना तुम्ही काळजीपूर्वक वाचावे. या संकेतस्थळांद्वारे होणारा वैयक्तिक माहितीचा वापर, हाताळणी आणि संरक्षण याबाबत बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूट संबंध ठेवत नाही. ह्या वेबपेजेसच्या अटी बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटच्या अटींसारख्याच असतील असे नाही.

प्रश्न :

या गोपनीयता धोरणाबाबत किंवा तुमच्या माहितीच्या हाताळणीबाबत जर तुमचे काही प्रश्न असतील, तर कृपया बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटला दिलेल्या पत्त्यावर इमेल करा.

ई-पत्ता : drbavishi@ivfclinic.com

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.