Bavishi Fertility Institute

लेझरच्या सहाय्याने उबवण

कोंबडीचे पिल्लू जेव्हा बाहेर येते, तेव्हा त्याला बाहेरील आवरण तोडावे लागते. या प्रक्रियेला ‘उबवण’ किंवा ‘उत्कवचन’असे म्हणतात. मानवी भ्रुण त्यांच्या विकासाच्या संपूर्ण प्रवासात जनन पथात – अर्थात स्त्रीबीजवाहक नलिका व गर्भाशयात बाह्य पारदर्शी अंडावरणाद्वारे (झोना पेल्युसिडा) संरक्षित असतात. जेव्हा भ्रुणाचे रोपण करायचे असते, तेव्हा भ्रुणाने ह्या बाह्य आवरणाला तोडून बाहेर पडायचे असते आणि गर्भाशय अंतःस्तराशी (एन्डोमेट्रीयम) थेट जुळायचे असते. या प्रक्रियेलाच ‘भ्रुण उबवण’ म्हणतात. ही रोपणाच्या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाची पायरी आहे. ज्या भ्रुणाचे यशस्वीपणे उबवण झालेले असते, त्याचेच यशस्वी रोपण करता येते.

भ्रुण उबवण ही एक अतिशय जटील क्रिया असून, या प्रक्रियेची सुरुवात भ्रुण आणि एन्डोमेट्रीयम यांच्या दरम्यान असलेल्या ‘एन्डोमेट्रीयम एम्ब्रियो क्रॉस टॉक’ नावाच्या एकाधिक संकेतांनी होते. उबवण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी भ्रुणाला मोठ्या प्रमाणात उर्जा वापरावी लागते.

कधीकधी उबवण प्रक्रिया अयशस्वी ठरते. वयस्कर ररुग्ण व फ्रोजन भ्रुणांच्या संदर्भात अशी जोखीम जास्त असते.

जेव्हा उबवण प्रक्रिया विविध तंत्रांच्या साहाय्याने पार पाडली जाते, तेव्हा तिलासहाय्यक उबवणीअसे म्हणतात. अतिशय प्रगत, सुरक्षित आणि स्वीकृत तंत्र म्हणून नव्या समर्पक अशा लेझर तंत्राचा वापर उबवणसाठी केला जातो. झोना पेल्युसिडाला कापण्यासाठी किंवा पातळ करण्यासाठी लेझरचा वापर केला जातो आणि म्हणून या प्रक्रियेला ‘लेझरच्या सहाय्याने उबवण’ (एलएएच – लेझर असिस्टेड हॅचिंग) असे म्हणतात.

एलएएच कसे केले जाते?

laser-assisted-hatching

देशभरातील अव्वल अशा आमच्या भ्रूणशास्त्रज्ञांद्वारे आंतरराष्ट्रीय मानक व व्यापक अनुभवाच्या आधारावर केली जाणारी लेझरयुक्त उबवण प्रक्रिया अगदी तंतोतंत व सुरक्षित आहे.

  • एएच भ्रूण हस्तांतरणाच्या दिवशीच केले जाते.
  • फक्त एलएएचसाठी निर्माण करण्यात आलेल्या एफडीएद्वारे मान्यताप्राप्त लेझरद्वारेच झोना पेल्युसिडामध्ये एक अतिशय छोटे भोक पाडले जाते.
  • कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक संगणकीय प्रक्रिया अगदी तंतोतंतपणे केली जाऊ शकते.
  • कोणत्याही संभाव्य दुष्परिणामांना टाळण्यासाठी म्हणून कमीत कमी ऊर्जा वापरली जाते.
  • भ्रूणाच्या आतमधील भ्रूण पेशी/जनुकीय पदार्थापासून दूर असलेल्या झोना पेल्युसिडाच्या भागाची निवड केली जाते.
  • जे भ्रूण हस्तांतरित करायचे असते, त्यावर आयव्हीएफ प्रयोगशाळेत प्रक्रिया केली जाते. महिलेच्या स्वतःच्या शरीरावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही – स्त्रीला स्वतःहून काहीही त्रास सहन करावा लागत नाही.
  • त्यानंतर प्रक्रिया केलेले भ्रूण गर्भाशयात हस्तांतरित केले जाते. ही प्रक्रिया साधारण आयव्हीएफमधील भ्रूण हस्तांतरणासारखीच असते.

एएचपासून कुणाला फायदा होऊ शकतो?

  • आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या कोणत्याही रुग्णाला एएचच्या फायद्यांचा लाभ घेता येतो आणि यामुळे संबंधित उपचाराद्वारे गर्भधारणेची शक्यता वाढवता येते.
  • विशेषकरून जेव्हा झोना पेल्युसिड जास्त कठीण आणि जाड असेल, तेव्हा एएच अधिक लाभदायक ठरते.
  • स्त्री जोडीदाराचे अधिक वय
  • इन-व्हिट्रो कल्चरमुळे झोना जाड होण्याची अपेक्षा असणे
  • हायअल्युरोनिडेझद्वारे स्त्रीबीजांड बाहेर पडणे
  • विरघळलेले भ्रूण
  • जाड झोना पेल्युसिडा
  • जेव्हा पूर्वीची आयव्हीएफ सायकल अयशस्वी होते
  • रोपणपूर्व जनुकीय तपासणीसाठी (पीजीटी) भ्रूणातून ब्लास्टोमरची बायोप्सी काढण्याआधी एएच आवश्यक असते.

एलएएचचे फायदे

  • यामुळे भ्रूणाला रोपणासाठी झोनाला तोडण्यास यांत्रिकी मदत प्राप्त होते.
  • हे भ्रूणाचे गर्भाशयाच्या अंतःस्तराशी होणाऱ्या सुरुवातीच्या संपर्काची खात्री देते.
  • तांत्रिक आणि रासायनिक फायद्यांमुळे रोपण व गर्भधारणेचे दर वाढण्यास मदत होऊ शकते.

एलएएचचे नुकसान

  • खर्चीक उपकरणांची गरज
  • उच्च कौशल्य व अनुभवी तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता
  • अतिरिक्त खर्च
  • भ्रूण खराब होणे किंवा एकयुग्मनजी यमले (मोनोझायगोटीक ट्विन्स) होण्याच्या असामान्य शक्यता

बाविशीतील फायदे

बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूट तिच्या रुग्णांना अनन्य कौशल्य व अनुभवासह एलएएचची सुविधा प्रदान करते. या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी तसेच अतिशय कमी अतिरिक्त खर्चात उपचाराच्या यशाचे दर सुधारण्यासाठी आम्ही आमच्या रुग्णांचे स्वागत करतो!!

आमचे स्थान