BFI

इंट्रा-युटेराइन इन्सेमिनेशन – आययुआय

इंट्रा – आतमध्ये 

युटेराइन – गर्भाशय 

इन्सेमिनेशन – शुक्राणू टाकणे/ठेवणे.

अतिशय निवडक विशिष्टरित्या तयार केलेले शुक्राणू अंडोत्सर्गाच्या (ओव्ह्युलेशन) वेळी गर्भाशयात ठेवण्याच्या प्रक्रियेलाइंट्रायुटेराइन इन्सेमिनेशनम्हणतात

या प्रक्रियेमध्ये शुक्राणू ग्रीवेच्या अडथळ्यांना बाजूला सारत थेट गर्भाशयात ठेवले जाते. याचा अर्थ असा, की गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी अपेक्षित अंडोत्सर्गाच्या वेळी शुक्राणू स्त्रीबीजवाहक नलिकेच्या गर्भाशयाकडे उघडण्याच्या स्थानाजवळ ठेवले जाते. 

उपचारपूर्व मूल्यांकन, प्रकरणांची योग्य निवड, अंडोत्सर्गासाठी चांगली प्रेरणा, योग्य निरीक्षण आणि अंडोत्सर्गाची सुरुवात, शुक्राणूंची योग्य तयारी, अचूक वेळ, उतींना किमान , आयइजा पोहचवत वीर्यसेचन, आययुआयनंतरची औषधे, असे अनेक घटक आययूआयमध्ये इष्टतम यश देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

आययुआयचा फायदा कुणाकुणाला होऊ शकतो?

पुरुषातील वंध्यत्व

 • ओलीगोस्पर्मिया (शुक्राणूंची कमतरता)
 • एस्थेनोस्पर्मिया (शुक्रपेशींची कमी चलता)
 • टेरॅटोस्पर्मिया (अपसामान्य शुक्राणूंची अधिक टक्केवारी)
 • हायपोथर्मिया (वीर्याचे कमी प्रमाण)
 • चिकट वीर्य
 • गोठलेले वीर्य
 • पतीचे शारीरिक दोष
 • प्रतिगामी स्खलन
 • शुक्रपेशीहीनता, जिथे दात्याचा नमुना वापरला जातो
 • लैंगिक संबंधांतील समस्या
 • नोकरीमुळे अनुपस्थित असणारा पती
 • मागणीनुसार कामगिरीची समस्या

स्त्रीमधील वंध्यत्व

 • ग्रीवेच्या श्लेष्मल त्वचेची वाईट अवस्था
 • अपसामान्य पोस्ट कोयटल टेस्ट – पीसीटी
 • ग्रीवावरील रोगप्रतिकारक घटक
 • पत्नीचे शारीरिक दोष
 • खराब अंडोत्सर्ग (ओव्हुलेशन)

अस्पष्ट वंध्यत्व

 • वंध्यत्व उपचारातून गर्भधारणा सुधारण्यासाठी

आययुआय उपचार कसे करतात?

स्त्री जोडीदार

 • योग्य वेळी अनेक अंडी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गोळ्या किंवा इंजेक्शनच्या मदतीने अंडोत्सर्गाला प्रेरित केले जाते.
 • ट्रान्स व्हजायनल सोनोग्राफीद्वारे (टीव्हीएस) पुटकाच्या विकास प्रक्रियेचे परीक्षण केले जाते.
 • जेव्हा पुटके तयार असतात, तेव्हा स्त्रीबीजांडांच्या अंतिम परिपक्वतेसाठी आणि त्यांच्या उत्सर्गासाठी एचसीजी इंजेक्शन दिले जाते.
 • पातळमऊ नळीच्या (कॅन्युला) मदतीने तयार शुक्राणूचा नमुना (स्वच्छ वीर्य) गर्भाशयात टाकला जातो. शुक्राणूंना गर्भाशयात टाकण्याच्या या प्रक्रियेस इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन असे म्हणतात.
 • आययूआय ही एक अतिशय सोपी, साधी आणि वेदनारहित प्रक्रिया आहे. शुक्राणू टाकण्यासाठी काहीच सेकंद लागतात.
 • यानंतर त्या महिलेला 10 मिनिटे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो आणि नंतर ती आपल्या कार्यालयीन काम, प्रवास, घरगुती काम अशा दैनंदिन कामात परत जाऊ शकते.
 • जोडपं त्याच दिवसापासून आणि त्याच सायकलमध्ये त्यांची आवड आणि इच्छेनुसार कोणत्याही वेळी संभोग करू शकतात; यासाठी कोणतेही बंधन किंवा सक्ती नाही.

पुरुष जोडीदार

 • आययुआयच्या दिवशी नवऱ्याचे वीर्य गोळा केले जाते.
 • निर्धारित वीर्यसेचनाच्या १ ते २ तासाआधीही तो आपले वीर्य देऊ शकतो. 
 • तो त्याच्या सोयीनुसार दिवसाच्या सुरुवातीलाही वीर्य देऊ शकतो आणि तयार शुक्राणू नंतर मिसळता येते.
 • रुग्णालयात नियमितपणे वीर्य संकलन केले जाते.
 • वीर्य घरीही गोळा केले जाऊ शकते आणि नंतर रुग्णालयात नेता येते.  कोविड -19 च्या काळात या पद्धतीला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे.  
 • जर गर्भाधान दिवशी पती उपस्थित राहू शकत नाही किंवा मागणी करू शकत नाही आणि नमुना देऊ शकत नाही तर गोठलेल्या वीर्यचा वापर गर्भाधान करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 • शुक्राणूंच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊ शकतील अशा वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियांच्या उपचारांतून पती जर जात असेल, तर तो त्याचे वीर्य गोठवू शकतो. नंतर हे गोठवलेले वीर्य आवश्यकतेनुसार आययूआयसाठी वापरले जाऊ शकते. 
 • क्रायोअॅक्युम्युलेशन – एकाधिक वीर्य नमुने गोठवणे आणि नंतर ते एकाच वेळी वीर्यसेचनासाठी वापरणे. जेव्हा एखाद्या वीर्य नमुन्यात चांगल्या प्रतीच्या शुक्राणूंची उपलब्धता कमी असते, तेव्हा हे उपयुक्त ठरते.
 • गोठलेले वीर्य वापरण्यासाठी पती त्याला सोयीस्कर अशावेळी वीर्य गोठवू शकतो. एकदा वीर्य गोठवल्यानंतर ते कितीही काळ संरक्षित करून ठेवता येते आणि कोणत्याही वेळी, कितीही दिवस, महिने किवा वर्षांनी वारले जाऊ शकते.

 

प्रयोगशाळेतील प्रक्रिया – शुक्राणूंची स्वच्छता – वीर्य स्वच्छता

 • वीर्यमध्ये शुक्राणूंच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच प्रमाणात अवांछित सामग्री असते. केवळ शुक्राणूच गर्भाशयात टाकले जाऊ शकतात. आम्हाला आमच्या प्रयोगशाळेत वीर्य तयार करावे लागते, जेणेकरुन आम्हाला त्यातून प्रत्येक अवांछित पदार्थ काढून टाकता येते आणि गतीशीलता व आकृतिबंधानुसार सर्वोत्तम सामान्य शुक्राणू वीर्य नमुन्यातून वेगळे करता येते. आम्हाला शुक्राणूंची क्षमतावृद्धीही करायची असते, जी फलनासाठी महत्वपूर्ण आहे.

वीर्य मापदंडांच्या आधारे आम्ही वीर्य स्वच्छतेची प्रक्रिया ठरवतो.

तुमच्यावर उपचार करणाऱ्या संस्थेमध्ये इष्टतम परिणाम प्राप्त करून देणारे शुक्राणू तयार करण्याचे सर्व तंत्रज्ञान उपलब्ध असणे गरजेचे आहे.

वीर्यसेचन कसे केले जाते?

वीर्यसेचन (इंसेमीनेशन) – गर्भाशयात शुक्राणू ठेवण्याची प्रक्रिया – खूप सोपे आहे.

 • रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते
 • खाजगी भाग उघडण्यासाठी आरामदायक स्थिती दिली जाते
 • स्वच्छतेची खबरदारी घेतली जाते
 • ग्रीवाला उघडण्यासाठी आणि देखरेखीसाठी योनीमध्ये एक स्वावलंबित उपकरण ठेवले जाते.
 • शुक्राणू गर्भाशयात टाकण्यासाठी एका पातळ कॅन्युला – पाईपची निवड केली जाते.
 • गर्भाशयाचे मुख स्वच्छ केले जाते.
 • गर्भाशय ग्रीवाच्या माध्यमातून कॅन्युला गर्भाशयात ठेवला जातो
 • तयार शुक्राणू हळूहळू गर्भाशयात टाकले जाते.

आययुआयचे फायदे

 • हे सोपे आहे.
 • एआरटी – आयव्हीएफपेक्षा कमी खर्चिक आहे.
 • नैसर्गिक संभोगाच्या तुलनेत गर्भधारणेची चांगली शक्यता

आययुआयचे नुकसान/ मर्यादा

 • लाखो शुक्राणूंची आवश्यकता असते
 • आम्ही फलन बघू शकत नाही 
 • फलनाची खात्री आम्ही देऊ शकत नाही
 • आम्ही भ्रुणाचे गर्भाशयाकडे जाण्याचे आश्वासन देऊ शकत नाही
 • आम्ही गर्भाची गुणवत्ता पाहू शकत नाही
 • इतर हाय-टेक एआरटी – आयव्हीएफच्या तुलनेत यशस्वी होण्याच्या फारच कमी शक्यता.
 • संसर्ग, रक्तस्त्राव होण्याचा असामान्य धोका

बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूट दरवर्षी शेकडो आययुआय उपचार करते. सर्व सुविधा होसच्या माध्यमांतून केल्या जातात. कुशल आणि अनुभवी सल्लागार आणि भ्रूणशास्त्रज्ञ उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण यश मिळविण्यासाठी मदत करतात.

आमचे स्थान

  Book an Appointment

  Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.