Bavishi Fertility Institute

सरोगसी

सरोगसी एक उपचार आहे, ज्यात एखादी स्त्री (सरोगेट आई) दुसऱ्या जोडप्यासाठी किंवा स्वतंत्र व्यक्तीसाठी (इच्छित पालकांसाठी) मूल देण्यास सहमत असते. बाळाच्या जन्मानंतर जोडपे त्या बाळाचे पालक होतील.

सरोगसी उपचारात वंध्यत्व असलेल्या स्त्रीची अंडी तिच्या पतीच्या शुक्राणूसह फलित केली जातात आणि त्यातून प्राप्त भ्रुण सरोगेट आईच्या गर्भाशयात हस्तांतरित केले जाते. ज्या जोडप्याचे भ्रूण हस्तांतरित केले जातात, त्यांना इच्छित पालक (आयपी) असे म्हणतात. सरोगेट स्त्रीचा तिच्याकडे हस्तांतरित केलेल्या भ्रुणांशी काहीही आनुवांशिकसंबंध नसतो.

दात्याच्या अंडी आणि शुक्राणूंचा वापर करूनही सरोगसी केली जाऊ शकते, परंतु त्यासाठी कमीतकमी एकतरी इच्छित पालकांची अनुवांशिक सामग्री उपलब्ध असणे आवश्यक आहे.

सरोगेट आई गर्भावस्था धारण करते आणि जन्मानंतर बाळाला इच्छित पालकांकडे सुपूर्द करते.

सरोगेट आई ही कुटूंबातील सदस्य, मित्र किंवा भरपाई स्वीकारणारी किंवा न स्वीकारणारी  स्वयंसेवकही असू शकते.

सरोगसीची गरज कुणाला असते? 

  • गर्भाशयाशी समस्या असणे
    • जन्मापासूनच किंवा शस्त्रक्रियेमुळे गर्भाशयाची अनुपस्थिती
    • बरेच किंवा मोठे फायब्रोइड
    • गंभीर एडेनोमायोसिस
  • एंडोमेट्रियमचे (गर्भाशयाच्या अतःस्तर) नुकसान
  • आईच्या आरोग्याला धोका
    • हृदय किंवा मूत्रपिंडाच्या आजारासारख्या वैद्यकीय परिस्थितीत गर्भधारणा होण्यामुळे महिलांच्या जीवाला असू शकणारा संभाव्य धोका 
  • गर्भधारणेदरम्यान वारंवार गर्भपात किंवा गर्भाचे मूत्यू होणे 
  • आयव्हीएफ वारंवार अयशस्वी होणे 
  • एकटाच पुरुष ज्याला बाळ हवे असेल

बाविशी फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आम्ही तुम्हाला सरोगेट आई शोधण्यापासून आयव्हीएफ उपचार, गर्भधारणा काळजी, सरोगेटची सुपूर्दता, नवजात शिशूची काळजी, जन्म प्रमाणपत्र आणि योग्य कायदेशीर मार्गदर्शन शोधण्यापर्यंतच्या प्रत्येक बाबतीत मदत करू शकतो. आवश्यकता पडल्यास आम्ही दात्यांच्या अंडी आणि शुक्राणुपेशी वापरण्यातही तुमची मदत करतो.

जर तुम्हाला तुमच्या बाळासह परदेशात जाण्याची आवश्यकता पडली, तर आम्ही त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदतही करू शकतो.

यशस्वी सरोगसी. 

कोणत्याही प्रकारच्या आयव्हीएफ उपचारांच्या यशस्वीतेच्या सर्वोत्कृष्ट संधी प्रदान करण्यासाठी बीएफआय हे एक सर्वोत्तम वन स्टॉप सोल्युशन आहे. यशस्वी आयव्हीएफ म्हणजेच यशस्वी सरोगसी.

सरोगेट आईच्या गरोदरपणाची काळजी

आमच्या अनुभवी प्रसुतिशास्त्रज्ञांची टीम, चांगली सोनोग्राफी आणि त्वरित प्रसूतीची सोय यामुळे शक्य तितक्या चांगल्या संभाव्य निकालाची खात्री मिळते. आमच्याकडे जुळ्यांच्या गर्भधारणा व्यवस्थापित करण्याचा दीर्घ अनुभव आहे.

आमच्या अनुभवी गर्भऔषध तज्ज्ञांची टीम सर्वोत्तम संभाव्य परिणामासह गर्भाची देखरेख करू शकते. इष्टतम वेळेत प्रसूती होण्यासाठी ते तुम्हाला कठीण परिस्थितीतही मदत करतील.

नवजात बाळाची काळजी.

आमच्या तज्ज्ञ नववंशशास्त्रज्ञांची टीम बाळाच्या जन्मापासून ते बाळाला पालकांकडे सोपविण्यापर्यंत नवजात काळजी घेते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लहान बाळाला  खाऊ घालणे सोयीस्कर होत नाही, तोपर्यंत संपूर्ण टीम तुमच्यासोबत असेल.

इच्छित पालकांची काळजी. 

बाळाच्या जन्मपूर्वीच्या भेटी आणि सोनोग्राफी दरम्यान तुम्ही स्वतः  उपस्थित राहून सरोगेट आईबरोबर मुक्तपणे संवाद साधू शकता. जर तुम्हाला हे नको असेल, तर शेवटी तो तुमचा निर्णय आहे.

आमची सरोगसी तज्ञांची टीम प्रत्येक मार्गावर तुमचे मार्गदर्शन करेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या नवीन कुटुंबावर लक्ष केंद्रित करू शकाल. काळजी करू नका. असे क्वचितच घडत असते, पण तरीही जर सरोगेट आईशी काही वाद उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तुमच्याकडे योग्य कायदेशीर कागदपत्रे आहेत.

आंतरराष्ट्रीय रूग्णांची सरोगसी

बाविशी फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आम्ही समजतो, की प्रत्येक रुग्णाची परिस्थिती अद्वितीय असते आणि त्यांना वेगवेगळ्या पातळीवर देखरेखीची आणि संवेदनशीलता आवश्यकता असते. आम्ही तुमच्या उपचाराची, सरोगेट आईच्या गरोदरपणाची आणि बाळंतपणाची संपूर्ण काळजी घेतो आणि व्यवस्थापन करतो. सोबतच, तुम्ही नवजात बाळाचे दायित्व स्वीकारेपर्यंत आणि सर्व आवश्यक कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्या बाळाची काळजीही घेतो. समावेश आहे.

तुमच्या देशातील आंतरराष्ट्रीय सरोगसीसंबंधी विशिष्ट कायदे व नियमांपासून तुम्हाला अवगत करवण्यासाठी आमचे तृतीय पक्षाचे पुनरुत्पादक तज्ज्ञ तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध आहेत.

आयव्हीएफ सरोगेट आईच्या सहभागासह कसे कार्य करते?

अनुवांशिक पालक आणि सरोगेट आई एकमेकांना भेटल्यानंतर आणि ते एकत्र काम करण्यास सहमत झाल्यावर एक कायदेशीर करार करतात.

इच्छित पालक आणि सरोगेट आईच्या मासिक पाळीला एकरूप केले जाते.

सरोगेट आईचे उपचार. 

सरोगेट आईला एक इंजेक्शन दिले जाते, जे तिच्या अंड्याचे उत्पादन एका महिन्यासाठी थांबवते. यामुळे हे निश्चित होते, की रोपण केले जाणारे भ्रुण इच्छित आई-वडिलांचेच आहे.

भ्रुण प्रत्यारोपणासाठी गर्भाशय तयार करण्याच्या उद्देशाने सरोगेटसाठी गोळ्या देणे सुरू केले जाते.

जेव्हा इच्छित पालकांचे भ्रुण तयार असतात, तेव्हा ते सरोगेट आईच्या गर्भाशयात हस्तांतरित केले जातात.

इच्छित पालकांचे उपचार.

इच्छित पालकांतील स्त्री जोडीदारामध्ये आयपीआयव्हीएफ इंजेक्शनचा उपचार सुरू केला जातो.

अंड्याला पकडले जाते आणि पुनर्प्राप्त झालेले ऊसाइट्स इच्छित पालकांतील पुरुष जोडीदाराच्या शुक्राणूसह फलन केले जातात.

फलनानंतर भ्रूण सरोगेट आईकडे हस्तांतरित केले जातात.

आयव्हीएफचे परिणाम सुधारण्यासाठी सर्व प्रगत तंत्र जसे की ब्लास्टोसायस्ट संवर्ध, आयसीएसआय इत्यादी. वापरले जाऊ शकतात.

सरोगेट आई कशी निवडायची?

तरुण, निरोगी आणि तपासणीत सामान्य आढळलेल्या सरोगेट मातांची निवड केली जाते. सर्व संभाव्य सरोगेट माता विवाहित असायला हव्या आणि त्यांना कमीतकमी एक जिवंत मूल असावे.

वैद्यकीय आढावा

आम्ही सरोगेटचा वैद्यकीय, कौटुंबिक आणि वैयक्तिक इतिहास तपासतो. आम्ही सरोगेटचे वजन, उंची आणि रक्तदाब सामान्य मर्यादेमध्ये आहे की नाही हेसुद्धा तपासतो.

सरोगेटचे चांगले आरोग्य तपासण्यासाठी डॉक्टर संपूर्ण वैद्यकीय तपासणी करतात. आमचे फर्टिलिटी तज्ज्ञ गर्भाशयात असलेल्या कोणत्याही विकृतीची आणि इतर कोणत्याही पुनरुत्पादक किंवा स्त्रीरोगविषयक स्थितीची तपासणी करण्यासाठी थ्रीडी अल्ट्रासाऊंड करतात.

पूर्ण रक्त संख्या व रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी आणि यकृत, मूत्रपिंड आणि सामान्य आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी पात्र सरोगेटवर चाचण्या  घेण्यात येतात..

एसटीडीच्या संभावना दूर करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.

मानसशास्त्रीय आढावा 

आमची स्वतःची टीम सरोगेटची सखोलपणे वैयक्तिक मुलाखत घेते. सरोगेट आईने संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली आहे आणि तिची याविषयीची क्षमता व एकाग्रता समजून घेण्यासाठी आम्ही तिचे मूल्यांकन करतो. सोबतच, आम्ही तिच्या संपूर्ण कुटूंबालादेखील यामध्ये सामील करतो आणि हे सुनिश्चित करतो, की संपूर्ण कुटुंबासही सरोगसी प्रक्रिया समजली आहे आणि ते सहकार्य करण्यास तयार आहेत. 

सरोगेसीचे फायदे

हे 100% कायदेशीर आहे

अनुवांशिक स्त्रोत 100% इच्छित पालकांकडून असते, आणि सरोगेट आईकडून काहीही नसते.

ही प्रक्रिया सोपी आहे. ज्या जोडप्यांना इतर उपचारांच्या माध्यमातून स्वतःचे मूल होऊ शकत नाही, त्यांनाही या पद्धतीने मूल होऊ शकते.

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटचे फायदे 

सुयोग्य सरोगेट आईच्या निवडीची प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचा आमचा अफाट अनुभव कोणतीही वेळ न दवडता तुम्हाला विश्वासार्ह आणि जबाबदार अशा उत्कृष्ट सरोगेट माता मिळविण्यात मदत करतो.

सर्वोत्कृष्ट आयव्हीएफ यशाचे दरामुळे जलद यश आणि कमी खर्च येण्याची खात्री मिळते.

अत्यंत सोयीस्कर पेमेंट शेड्यूलसह ​​उपचार खर्च खूप वाजवी, पारदर्शक आणि एकसमान आहे. उपचाराचे आर्थिक तपशील आणि पेमेंट करण्याचे टप्पे सुरवातीपासूनच स्पष्ट करण्यात येतात.

आमचा सरोगसी कार्यक्रम अत्यंत नैतिक आहे आणि यामुळे इच्छित पालक आणि सरोगेट आई या दोघांच्या आनंदाची खातरजमा केली जाते.

सरोगसीच्या शोधात आहात? सरोगसीत भारतात अग्रेसर असलेल्या संस्थेवर विश्वास ठेवा.

आमचे स्थान