BFI

स्मार्ट

स्मार्ट उपचार आणि नियमित काळजीने ध्येयप्राप्ती होते.

मूल होणे आणि कुटुंबाची सुरुवात करणे हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो, आणि यासाठी गरज असते वैयक्तिकृत अशा स्मार्ट रणनीतीची.  

 रुग्णाच्या परिस्थितीला व वंध्यत्वरील उपचाराच्या पर्यायांच्या फायद्या व तोट्यांना सखोलपणे समजणे आणि ह्या सर्वांना एकत्रित करून अंतिम  ध्येय गाठणे! – हे स्मार्ट नाही का? या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनाचा अवलंब करून बाविशी फर्टिलिटी क्लिनिकने हजारो शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर

बाविशी फर्टिलिटी क्लिनिकमध्ये एकाच छताखाली सर्व आवश्यक तंत्रज्ञान आणि तंत्र उपलब्ध आहेत. तरीही, सर्व रुग्णांमध्ये ह्या सगळ्या तंत्रांचा वापर केल्याने यश प्राप्तीच्या तुलनेत उपचाराचीच किंमत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.  

त्यामुळे, तुमच्या वैयक्तिक प्रकरणात तुम्ही अतिरिक्त खर्च केलेल्या पैसास उपयुक्त ठरतील असे उपचार पर्याय आणि इंजेक्शन्स आम्ही काळजीपूर्वक सूचित करतो. 

स्मार्ट देखरेख

सर्व वैद्यकीय आणि आयव्हीएफ प्रयोगशाळांतील मुख्य कार्यात्मक निर्देशकांची (केपीआय) स्मार्ट देखरेख – उपचार निवडण्यामध्ये ‘आकडेवारी’ एक निर्णायक घटक ठरते. म्हणूनच, रुग्णाच्या हितासाठी म्हणून रुग्णाच्या प्रत्येक गोष्टीची योग्य देखरेख व्हायला हवी, हे आम्ही सुनिश्चित करतो.  

आव्हीएफ प्रयोगशाळा आणि वैद्यकीय बाबींकरिता आम्ही अनेक मुख्य कार्यात्मक निर्देशकांची (केपीआय) देखरेख करतो. जसे की, फर्टीलायझेशन रेट, भ्रुण निर्मिती दर, भ्रुण गुणवत्ता निर्देशांक इ. यामुळे गर्भधारणेच्या परिणामांवर लक्षणीय परिणाम होण्याआधीच काही समस्या असल्याच ती सापडण्यास आम्हाला मदत होते.

स्मार्ट उपचार

उपचाराची अचूक आणि स्मार्ट निवड करणे ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. 

आयव्हीएफच्या प्रत्येक छोट्यात छोट्या तपशीलांचे परीक्षण केल्याने तुमच्या आयव्हीएफच्या यशाचा सुरुवातीलाच व भ्रूण हस्तांतरणाच्या वेळी अचूक अंदाज लावण्याची अद्वितीय क्षमता आम्हाला मिळते. आयव्हीएफच्या यशाचा हा अंदाज गर्भाची गुणवत्ता आणि संख्येवर आधारित असतो. या माहितीमुळे आम्हाला उपचारांमध्ये बदल करण्यात मदत होऊ शकते आणि परिणामी,  उपचाराच्या परिणामांची शक्यता अधिकाधिक वाढवता येते.

नवीनतम तंत्रांचा स्मार्ट वापर

बिग डेटा, क्लाउड कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या पारंपारिक वैद्यकीय प्रणालीला पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. बाविशी क्लिनिक अशा बाबतींत कोणत्याही प्रकारे मागे राहत नाही. बीएफआयने माहिती तंत्रज्ञानाची नवीन पिढी, जसे की इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) उपयोजित केली आहे.

उपचारांच्या पर्यायांची सहज निवड

आमच्याकडे अत्यंत स्वयंचलित आणि इष्टतम वातावरण आहे. जोडप्यांना स्मार्ट उपचाराचे पर्याय निवडण्यात मदत करण्यासाठी आयओटी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे हे आमच्या स्मार्ट फर्टिलिटी क्लिनिकचे मुख्य हेतू आहे. बाविशी फर्टिलिटी क्लिनिकचे संघटीत कार्यकारी मंडळ रूग्णांना कमी त्रुटींसह स्वस्त-प्रभावी पद्धतीने उल्लेखनीय उपचार पुरवण्याची वैद्यकीय कर्मचार्‍यांना परवानगी देते.

स्मार्ट उपचार

आम्ही उपचाराचे पर्याय उपलब्ध करवतो आणि रुग्ण त्या पर्यायांमधून एक पर्याय निवडतात. अपेक्षित परिणाम मिळावेत याची खात्री म्हणून त्यांच्या या निवडीची पुनर्आठवण, पुनर्मूल्यांकन व परीक्षण केले जाते. आमच्या केंद्रांपासून दूर राहणा-या रुग्णांसाठी आम्ही उपचारांची अशी योजना तयार करतो, की जेणेकरून बहुतेक उपचार तुम्ही तुमच्या स्थानिक गावात किंवा शहरात घेऊ शकाल आणि तुम्हाला केवळ प्रक्रिया समजून घेण्यासाठी आम्हाला भेट द्यावी लागेल. अशाप्रकारे अगदी स्मार्टपणे तुमचा वेळ वाचवला जातो! 

आमचा अनुभव आम्हाला तुमच्या उपचारांमध्ये लवचिकता बाळगण्यास सक्षम करतो. तुमचे स्वप्न साकार करण्याच्या निर्णयाला तुम्ही उपस्थित राहणे गरजेचे असलेल्या एखाद्या छोट्या कार्यक्रमामुळे किंवा एखाद्या छोट्या कार्यालयीन बैठकीमुळे लांबू देऊ नका. 

टाइमलाईन व भेटीची सुयोग्य रूपरेषा

आमच्या रूग्णांची वेळ आमच्या वेळेपेक्षा कमी महत्त्वाची नाही.  नाही. रुग्णाच्या इतिहासाचे संकलन करून, रुग्णाच्या समस्यांचे अहवाल आणि सूचना अगोदरच एकत्रित करुन आमची टीम  तुमच्या वेळेला योग्य मूल्य देण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करत असते. फक्त एवढेच नाही, तर समुपदेशनाच्या वेळी डॉक्टर व रुग्णामध्ये होणाऱ्या संवादाची संपूर्ण नोंदही घेतली जाते. यामुळे भविष्यातील प्रक्रियेच्या नियोजनासाठी आणि रुग्णांच्या भेटींसाठी योग्य नियोजन करण्यात मदत होते.

काटकसर करण्याजोग्या किंमतीचे पॅकेजेस

बाविशी फर्टिलिटी क्लिनिक कोणत्याही प्रजनन उपचाराच्या पर्यायांसाठी इष्टतम किंमतीवर सर्वोत्तम उपचार प्रदान करते. बीएफआय उच्च गुणवत्तेची उत्पादने वापरत असली, तरीही किंमतीच्या बाबतीत ती स्पर्धात्मक आहे. आमच्या प्रमाणातील अर्थव्यवस्थेचे आम्ही आभार मानतो. आम्हाला मापातील किंमतीचा फायदाही मिळतो आणि आम्ही त्याचा इष्टतम उपयोगही करतो. आमच्या सर्व केंद्रांवर उपलब्ध असलेल्या अनुभवी मनुष्यबळ संसाधनांचा आम्ही पुरेपूर वापर करतो. 

आमच्याकडे प्रत्येक खिशासाठी स्मार्ट पॅकेजचे पर्याय उपलब्ध आहेत.

सोबतच, गरोदरपणात तुम्हाला जास्तीत जास्त संधी देण्यासाठी आम्ही कमी किंमतीत मल्टीपल सायकल्सचे पॅकेजही ऑफर करतो.

आमच्या थ्री-सायकल पॅकेजसह तुमचे यश तिप्पट करा किंवा आमच्या सुरक्षा कवच पॅकेजसह संपूर्ण शांतता मिळवा.

सुरक्षा कवच पॅकेज

सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल जर तुम्ही खात्री बाळगू इच्छित असाल, आयव्हीएफच्या अपयशाची ठरण्याची किंवा तुमचे आयव्हीएफ अयशस्वी झाल्याबद्दल जर तुम्ही काळजीत असाल, तर अशावेळी सुरक्षा कवच पॅकेज स्मार्ट पर्याय आहे. जिवंत बाळ जन्मास  येण्याच्या शक्यता वाढवण्यासाठी हे अद्वितीय पॅकेज अनेक सायकल्स प्रदान करते.

बाविशी फर्टिलिटी क्लिनिकशिवाय इतर कुणीही ऑफर नाही अशा, या विशेष पॅकेजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्हाला भेट द्या.

कुठूनही कधीही पैसे द्या!

तुमची आरामदायकता आमची सर्वांत मोठी प्राधान्यता आहे. भारत डिजिटल पेमेंट करतो, म्हणून बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटसुद्धा तुमच्या सुविधेसाठी सुरक्षित व स्मार्ट पेमेंट पर्याय पुरवते. आमचे रुग्ण ऑनलाइन पेमेंटच्या पर्यायास कुठेही आणि हव्या त्या पद्धतीने पेमेंट करू शकतात.

तुमचे बजेट नियोजन सुलभ करण्यासाठी आमच्याकडे 0% व्याज दरात सुलभ ईएमआय उपलब्ध आहे.

रुग्ण-केंद्रित रुग्णालय संरचना

जिथे रुग्णाला लाभ होणार नाही, अशी कोणतीही अतिरिक्त संरचना आमच्याकडे नाही. रिसेप्शन, बिलिंग, वॉर्ड्स, नर्सिंग स्टेशन, फार्मसी, लॅब आणि कॅन्टीन यांसारखे विभाग ‘रुग्ण केंद्रीत’ आहेत. यामुळे कोणत्याही रुग्णाला रूग्णालयाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जावे लागणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे.

स्मार्ट निदान

आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘आधी निदान आणि नंतर उपचार’ असा नियम आहे. निदान हे उपचार प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग आहे. आमच्या तज्ञांकडील एक साधा अल्ट्रासाऊंड तुम्ही बर्‍याच वर्षांपासून शोधत असलेल्या समस्येचे निदान करण्यात मदत करतो. वंध्यत्वाच्या कारणाचे निदान करण्यासाठी व योग्य चाचणीची शिफारस करण्यासाठी टप्याटप्यांची प्रक्रिया असते.

तुम्हाला कराव्या लागणाऱ्या चाचण्या आणि त्या चाचण्यांमागील कारणे डॉक्टर तुम्हाला सांगतील. आपल्याला सांगेल. वंध्यत्वाच्या कारणाच्या आधारावर डॉक्टर तुम्हाला सर्वात योग्य उपचार सुचवतील व तुमचे उपचार यशस्वी होण्याच्या शक्यताही समजावून सांगतील. सोबतच, संबंधित उपचार पुढे कसे विकसित होत जाईल याविषयी व उपचारांच्या पर्यायी उपयांबद्द्लही डॉक्टर तुम्हाला सांगतील.

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.