Bavishi Fertility Institute

तुमच्या प्रजनन क्षमतेच्या उपचाराची संपूर्ण सुरक्षा.

“प्रथम सुरक्षा” आणि “सर्वांसाठी सुरक्षितता” हे आमचे ब्रीदवाक्य आहे.

बाविशी फर्टिलिटी क्लिनिकच्या प्रत्येक केंद्रांमध्ये आमच्या रूग्णांना व अगदी न जन्मलेल्यांनाही महत्तम सुरक्षा पुरवली जाते.

सुरक्षितता तुमच्या जनुकांची

आमची सुरक्षा प्रणाली संपूर्ण एआरटी उपचारादरम्यान रुग्णांच्या पहिल्या भेटीपासून गर्भ हस्तांतरणापर्यंतच्या सर्व नमुन्यांची अचूक ट्रॅकिंग आणि सुरक्षित ओळख सुनिश्चित करते.

आमच्या इन विट्रो फर्टिलायझेशन प्रयोगशाळेच्या प्रक्रियांमध्ये आम्ही चुकनही काही शिल्लक राहू देत नाही. आमच्या निर्दोष ओळख प्रणालीचे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या निर्णायक प्रक्रियांवर कठोर नियंत्रण असते. आम्ही आयव्हीएफ ग्रेड वॉटर किंवा फ्रॉस्ट रेझिस्टंट लेबल्सचा अचूक लेबलिंगसाठी वापर करतो.

आम्ही निर्णायक प्रक्रियांवर दुहेरी निरक्षण ठेवू शकतो आणि यासाठी आम्ही आमच्या आयव्हीएफ प्रयोगशाळेतील कार्यकारी व्यावसायिकांच्या टीमचे आभारी आहोत. हे दुहेरी निरीक्षण महत्वाचे आहे, कारण यामुळे उपचारादरम्यान पुरुष जनजपेशी, स्त्री जनजपेशी किंवा भ्रुण हाताळणीचा समावेश असलेल्या प्रत्येक निर्णायक टप्प्याची दुहेरी देखरेख शक्य होते. उपचाराच्या वेळी काहीही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून हे सर्व टप्पे नेहमी दोन व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जातात. यांपैकी एक म्हणजे टेक्निशियन, जो ती प्रक्रिया पार पडतो आणि दुसरी व्यक्ती ती, जी त्या प्रक्रियेदरम्यान सर्व गोष्टींची देखरेख करते.

ही दुहेरी तपासणी बर्‍याच पातळ्यांवर केली जाते: शुक्राणूंचे अतिशीतन, शुक्राणूंची क्षमतावृद्धी, ऑओसाइट रिकव्हरी, इनसेमिशन, मायक्रो-इंजेक्शन, गर्भ हस्तांतरण, क्रायोप्रिझर्वेशन इ. दुहेरी तपासणी म्हणजे अचूक सुरक्षेची हमी देणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेला दोषमुक्त करण्याची हमी आहे.

संसर्ग संक्रमणाविरूद्ध सुरक्षित

शरीरातील द्र्व्यांतून संक्रमित होणार्‍या संभाव्य संसर्गांचा तपास करण्यासाठी उपचार घेणाऱ्या सर्व जोडप्यांना एका अनिवार्य चाचणीतून जावे लागते.  

संभाव्य संक्रमित नमुने संग्रहीत करण्यासाठी व गोठवण्याकरिता बीएफआयमध्ये स्वतंत्र कंटेनर आणि टाकींचा वापर होतो.

तुमच्या मन आणि शरीरासाठी सुरक्षित उपचार

रुग्णांना आयव्हीएफच्या दरम्यान त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि संभाव्य दुष्परिणामांबद्दल नेहमीच चिंता असते. तुम्हाला नेहमी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही फायर अलार्म, सीसीटीव्ही, सुरक्षा कर्मचारी आणि इतर सहाय्यक सेवांचा वापर करतो.

वैद्यकीय सुरक्षा

तुम्हाला जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आम्ही आवश्यक मानकांपेक्षा जास्त दर्जाच्या ओटी, एनेस्थेसिया आणि इतर सर्व उपकरणे वापरतो.

ओव्हरियन हायपर स्टिमुलेशन सिंड्रोम ओएचएसएस मुक्त क्लिनिक

होय, बीएफआय ओएचएसएस मुक्त क्लिनिक आहे!

आयव्हीएफमध्ये काही गुंतागुंती असू शकतात. त्यांपैकी सर्वांत लक्षणीय म्हणजे ओव्हरियन हायपर स्टिमुलेशन सिंड्रोम – ओएचएसएस. कित्येक वर्षांच्या अनुभव आणि नाविन्यपूर्ण गोष्टींमुळे बीएफआय ओएचएसएस मुक्त झाले आहे. बीएफआयमधील आयव्हीएफ प्रक्रिया अगदी आरामदायी आहे. आम्ही ओएचएसएसचा आधीच अंदाज घेऊन, त्यास प्रभावीपणे प्रतिबंधित करतो आणि तुमच्या उपचाराच्या प्रवासाची सुरक्षितता सुनिश्चित करतो.

आयुष्यातील इतर सर्व गोष्टींप्रमाणेच टंचाईदेखील अतिरेका एवढीच वाईट असते. म्हणून दोघांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे असते. अंडाशयांचा उत्तेजनास मिळणारा प्रतिसाद याहून वेगळा नाही. ओएचएसएस म्हणजे आईव्हीएफ उपचारातील ड्रग्सद्वारे अंडाशयांचा ओव्हरियन स्टिमुलेशनला मिळणारा अतिशयोक्तीपूर्ण प्रतिसाद आहे. हे ड्रग्स म्हणजे गोनॅडोट्रॉपिन्स, एफएसएच (फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन) आणि एलएच (ल्यूटिनायझिंग हार्मोन) आहेत, जे उपचारांच्या जास्त कार्यक्षमतेसाठी ओव्हुलेशनला उत्तेजित करतात. सामान्यत: हे इंजेक्टेबल असतात. (रिकॅगॉन गोनल-एफ, एलोनवा, फॉस्टीमॉन, मेनोपूर, पेर्गोव्हेरिस, फॉलिग्राफ, ईमा एचएमजी, प्यूरग्राफ).

बीएफआयचे मान्यताप्राप्त प्रोटोकॉल्स आणि ओएचएसएसच्या प्रतिबंधासाठी बीएफआयचे निकष”

हे निकष आम्हाला उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात. जसे की, उत्तेजनाचे प्रारंभ करण्यापासून अंडी निर्माण करण्यापर्यंत, अंडाशयाची निवड कधी करावी आणि नवीन भ्रूण हस्तांतरण करावे की सर्व भ्रूण गोठवावे, अशा बाबतींत संबंधित निकष आमचे मार्गदर्शन करतात. आमच्या सर्व केंद्रांमध्ये या सर्व निकषांचे एकसमान पालन केले जाते. त्यामुळेच आम्ही अभिमानाने म्हणू शकतो, की गेल्या 10हून  अधिक वर्षात आम्ही गंभीर ओएचएसएसची एकही घटना अनुभवलेली नाही.

सुरक्षा प्रोटोकॉल्सची एनएबीएच मानके

नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल ही रुग्णालयांचे प्रमाणिकरण करणारी सर्वोच्च संस्था आहे. या मंडळाने रूग्णांच्या सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा, प्रोटोकॉल्स आणि मानक प्रक्रिया पद्धती (एसओपी) आदींविषयी कठोर निकष निर्धारित केले आहेत. आमचे केंद्र एनएबीएच मान्यताप्राप्त आहेत किंवा मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत.

वर्धित सुरक्षा आणि चांगल्या निकालांसाठी आम्ही वैश्विक पातळीवर स्तुत्य ठरलेल्या सोनोग्राफी मशीन, एंडोस्कोपी आणि आयव्हीएफ प्रयोगशाळांची उपकरणे वापरतो.

दूषितीकरणाची शक्यता कमी करण्यासाठी सर्व ओटी आणि प्रयोगशाळांचे नियमित निर्जंतुकीकरण केले जाते. निर्णायक ठिकाणे जीवाणूंपासून दुषित होऊ नयेत म्हणून त्यांचे नियमितपणे परीक्षण केले जाते.

सर्व उपकरणांची एनएबीएचच्या नियमांनुसार नियमित एएमसी तपासणी केली जाते.

भ्रुणांसाठी सुरक्षित वातावरण

बाविशी फर्टिलिटी क्लिनिक विशेषकरून, सहाय्यक प्रजनन प्रक्रियांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कंट्रोल्स आणि प्रोटोकॉल्सची अंमलबजावणी करते.

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटच्या आयव्हीएफ प्रयोगशाळेतील हवेची गुणवत्ता

आयव्हीएफ प्रयोगशाळांमधील कार्यात्मक प्रक्रियांसाठी लागणारे नियमन, तापमान नियंत्रण, आर्द्रता, अंडी, शुक्राणू आणि भ्रूण यांच्या वाढीत व्यत्यय आणू शकतील अशा कोणत्याही दूषिततेपासून मुक्त परिस्थिती आदींच्या संदर्भात हवेच्या गुणवत्तेचे असलेले महत्त्व आम्ही जाणतो. आमच्या आयव्हीएफ लॅबमध्ये उत्तम अशा 1000 शुद्ध हवा प्रणाली आहेत, ज्या युरोपियन मानकांपेक्षा दहापट अधिक स्वच्छ हवा पुरवतात.

लॅमिनार फ्लो हूड्स : नमुनात्मक सुरक्षा

आमच्या आयव्हीएफ प्रयोगशाळेत सर्व नमुन्यांची लॅमिनार फ्लो हूड्समध्ये, म्हणजे फॅन हूडमध्ये प्रक्रिया केली जाते.

त्यांच्या वरच्या भागात एचईपीए फिल्टर बसवले आहेत, जे हवा फिल्टर करून परीक्षण नमुन्यांना व कर्मचा-यांना दूषित होण्यापासून रोखतात. हवेत उपलब्ध असलेले एखादे बाह्यकण नमुन्याच्या संपर्कात येऊन त्यास दुषित करू नये, म्हणून हवा सतत क्षैतिज दिशेने पसरवली जाते.

एम्ब्रियो कल्चरची देखरेख

गर्भांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी आम्ही नवीनतम पिढीचे ट्रायगॅस इनक्यूबेटर्स  वापरतो. आमचे हे इनक्यूबेटर्स स्मार्ट अलार्म सिस्टमने युक्त आहेत. ही प्रणाली कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने निर्णायक घटक, जसे तापमान आणि कार्बन डायऑक्साईडसारख्या विविध वायूंच्या पातळीची देखरेख करते. जर कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकारचे विचलन या घटकांत आढळले, तर त्याविषयी भ्रुणशास्त्र टीमला त्वरित सूचित केले जाते.

दुहेरी तपासणी

आम्ही काही प्रक्रियांची दुहेरी तपासणी करू शकतो आणि यासाठी आम्ही आमच्या आयव्हीएफ प्रयोगशाळेतील कार्यकारी व्यावसायिकांच्या मोठ्या टीमचे आभारी आहोत. आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण यामुळे अनुक्रमे पुरुष व स्त्री जनजपेशी आणि भ्रुणांची हाताळणी, अशा दोन्ही प्रक्रियांमधील प्रत्येक निर्णयात्मक टप्प्याची दुहेरी तपासणी आम्ही सुनिश्चित करू शकतो.

सँपल्स एका कव्हरस्लिपमधून दुसरीकडे पास करण्याचा समावेश असलेली प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रक्रिया दोन लोकांच्या उपस्थितीतच पूर्ण केली जाते. यांपैकी एक टेक्निशियन असतो, जो ती प्रक्रिया पार पाडतो आणि दुसरी व्यक्ती ती असते, जी उपचाराच्या वेळी काहीही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून प्रक्रियेदरम्यान सर्व गोष्टींची देखरेख करते.

ही दुहेरी तपासणी बर्‍याच पातळींवर केली जाते : शुक्राणूंचे अतिशीतन, शुक्राणूंची क्षमतावृद्धी ऑओसाइट रिकव्हरी, इनसेमिशन, मायक्रो-इंजेक्शन, गर्भ हस्तांतरण, क्रायोप्रिझर्वेशन इत्यादी. अचूक सुरक्षेची हमी देणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेला दोषमुक्त करण्याची ही हमी आहे.

सुरक्षा अलार्मसह तापमान नियंत्रण

सर्व नमुन्यांचे तापमान सामान्य मानवी तापमानाच्या पातळीवर म्हणजे, ३७ डिग्री सेल्सियसवर राखण्यासाठी तापमान नियंत्रण आवश्यक आहे. तापमान कायम राखण्यासाठी आमच्या प्रयोगशाळेत बाह्य गजर प्रणालीची सुविधा उपलब्ध आहे. म्हणूनच, जर सामान्य तापमानात काही विचलन आढळले, तर कोणतीही संभाव्य समस्या टाळण्यासाठी ही प्रणाली रेडिओ अलार्म वाजवेल.

आयव्हीएफजलद गर्भधारणा साधण्याचा सोपा मार्ग

या (आयव्हीएफ) तंत्राला बर्‍याच प्रमाणात लोकप्रियता मिळाली असून, बरेच लोक याची निवड करतात. बऱ्याच लोकांच्या मते हे तंत्र सुरक्षित आहे आणि यावरूनची याच्या लोकप्रियतेची महती कळते.

जे लोक आयव्हीएफचा पर्याय निवडू इच्छितात त्यांना आई आणि बाळाच्या सुरक्षिततेची चिंता वाटते. औषधोपचाराचे दुष्परिणाम, गर्भधारणेतील अडचणी, बाळाचे आरोग्य, बाळातील काही अनुवांशिक अथवा इतर रोग, आणि शैक्षणिक कामगिरी, सामाजिकीकरण व बाळाची भविष्यातील जननक्षमता यांसंदर्भातील बाळाची दीर्घकालीन जडणघडण इत्यादी बाबतींत त्यांना चिंता वाटत असते.

औषधींचे साईड इफेक्ट्स आणि कॅन्सरचा भविष्यातील धोका याविषयी रुग्ण अतिशय चिंताग्रस्त असतात. चांगली  गोष्ट ही आहे, की औषधीचे कोणतेही दीर्घकालीन दुष्परिणाम नसतात. उपलब्ध माहितीचा आढावा घेतल्यावर आपल्याला कळते, की या प्रक्रियेमुळे कर्करोगाचा धोका वाढत नाही. याउलट आज कर्करोगाचे अधिकाधिक रुग्ण आपली फर्टिलिटी आधीच संवर्धित करू इच्छितात. असे असण्याचे कारण म्हणजे, एकतर त्यांच्याकडे मर्यादित काळासाठीचीच गर्भधारण क्षमता उपलब्ध असेल किंवा ते घेणार असलेल्या कर्करोगाच्या उपचारादरम्यानच्या औषधोपचारांमुळे त्यांच्या प्रजननक्षमतेवर भविष्यात परिणाम पडण्याची शक्यता असेल. एकूणच, नवीन तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑओसाइट व्हिट्रीफिकेशनच्या (भविष्यातील वापरासाठी अंडी गोठविण्याची अलीकडील पद्धत) नवीन शोधाबद्दल आम्ही आभारी आहोत.

तुमच्या गुपितांची सुरक्षागोपनीयता

  • तुमच्या सर्व वैद्यकीय बाबी गोपनीय ठेवल्या जातात. पती-पत्नीने संमती दिल्याशिवाय तुमच्या कोणत्याही नातेवाईकांशी वैद्यकीय गोष्टींबद्दल चर्चा केली जात नाही.
  • सर्व समुपदेशन वैयक्तिक कक्षात अत्यंत गोपनीयतेने केले जातील.

पॅंडेमिक सुरक्षित उपचार

पॅंडेमिक काळात बीएफआयने अतिरिक्त सुरक्षा उपाय स्वीकारले आहेत.

  • सर्व कर्मचारी तपासणीच्या वेळी एन९५ मास्क, फेशशिल्ड आणि हातमोजे घालून असतात.
  • रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांना एन९५ मास्क व फेशशिल्ड वापरणे अनिवार्य आहे.
  • आमच्या सर्व केंद्रांतील कर्मचार्‍यांना लसी घेतली आहे.
  • सर्व प्रक्रियांसाठी रुग्ण आणि डॉक्टर पीपीई वापरतात.
  • फ्रंटलाईन कार्माचाऱ्यांची आवश्यक तितक्या वेळा कोरोना व्हायरससाठी चाचणी केली जाते. 
  • क्लिनिकमध्ये रूग्णांची एकमेकांशी भेट टाळण्यासाठी दोन समुपदेशनातील वेळेचे अंतर वाढवण्यात आले आहे. 
  • वैयक्तिक निगा राखण्याचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
  • व्हर्च्युअल सल्लामसलतसाठी ऑनलाइन समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.
  • रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी हे उपाय आवश्यक आहेत.

साथीच्या आजारामुळे तुम्ही तुमच्या प्रजनन उपचारास उशीर करण्याचा विचार करीत असाल, तर आधी तुम्ही ही वेळ गमावल्यास भविष्यात उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण कमी होऊ शकतात की नाही याबाबत तज्ज्ञांकडून समजून घ्या. 

सुरक्षित आणि पूर्णतः संरक्षित आयव्हीएफ प्रयोगशाळा

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटच्या आयव्हीएफ प्रयोगशाळेत प्रत्येक प्रक्रिया रुग्णांच्या अनुकूल असते. केवळ हाताळणीच्या वेळीच भ्रूण इनक्यूबेटरमधून बाहेर काढले जाते आणि एका रुग्णाच्या वर्कबेंचवर नेले जाते. रुग्णाचे नाव आणि ओळखीशी संबंधित तपशिलाची तपासणी करण्यासाठी दुहेरी तपासणी प्रणालीचा उपयोग केला जातो.

प्रोटोकॉल ई-एसईटी वैकल्पिक एकल गर्भ हस्तांतरण.

दुहेरी गर्भधारणेचा निर्णय घेणे ही जोडप्याची निवड असते; दुहेरी आनंदाच्या बातमीने बरेच रुग्ण आनंदी असतात, परंतु बर्‍याच जणांना दोन बाळांचे आणि तेही एकावेळी संगोपन करणे आव्हानात्मक असते.

चांगली बातमी अशी, की या बाबतीत निवड तुमची असते.

बीएफआय सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर – ईएसईटी प्रोटोकॉलचा पर्याय उपलब्ध करवते. एकाधिक गर्भधारणेची शक्यता आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या परिणामास निरस्त करण्यासाठी हे प्रोटोकॉल स्वीकारण्यात आले आहे. प्रजोत्पादक उपचारांमध्ये दुहेरी गर्भधारणेचे सध्याचे प्रमाण 20% आहे. ईएसईटी पद्धतीत केवळ उत्कृष्ट गर्भ स्थानांतरित केले जाते. ह्या ईएसईटी प्रोटोकॉलमुळे प्रति गर्भामागे रोपण करण्याची शक्यता वाढते, तसेच एकाधिक गर्भधारणेशी संबंधित गरोदरपणा व बाळंतपणातील गुंतागुंतींची शक्यता कमी करते.

वंध्यत्व उपचारांमध्ये यशस्वीरित्या सुरक्षित वाढ

पुनरुत्पादक औषधांच्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि बीएफआयचे या क्षेत्रातील विस्तृत अनुभव यांमुळे बाविशी फर्टिलिटी क्लिनिकच्या सहाय्यक प्रजनन उपचारांच्या यशाचे आलेख वर्षानुवर्षे व सुरक्षितपणे वाढतच जात आहे.

आताच आमचा सल्ला घ्या.

वंध्यत्वाच्या अंधाकाराला तुमचे भविष्य निर्धारित करु देऊ नका. बाविशी आयव्हीएफमध्ये आजच सुरक्षित उपचाराचा पर्याय निवडा.

आमचे स्थान