आम्ही अतिशय हुशार कर्मचाऱ्यांना एकत्रित करून पारंगत केले आहे. जर हिऱ्याला चांगल्या पद्धतीने कापले आणि तकाकी दिली गेली, तर तोसुद्धा अधिक प्रखरतेने चमकतो. आमच्या टीमचे ज्ञान व कौशल्ये वृद्धींगत करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. आमची टीम यशासाठी भुकेली, नाविन्यतेसाठी उपाशी, कार्य करण्यासाठी अभिलाषी व एक पाऊल पुढे जाऊन रुग्णांना सेवा प्रदान करण्यासाठी सदैव तयार असते.
उच्च शिक्षित, अनुभवी व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आयव्हीएफ तज्ज्ञ आमच्या टीमला वैशिष्ट्ये प्रदान करतात. या तज्ज्ञ प्रवर्तकांकडे अतिशय कठीण व दुर्मिळ समस्यांच्या प्रकरणांसह हजारो जोडप्यांवर उपचार करण्याचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवांमुळे संपूर्ण वैद्यकीय व आयव्हीएफ तज्ज्ञ समुपदेशकांच्या टीमला आधार मिळतो, तसेच शिकण्याच्या अनेक संधी इतरांना प्राप्त होतात. आमच्याकडे भारतातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांतून पदव्युत्तर पदवी प्राप्त व उच्च शिक्षित असलेल्या १४ आयव्हीएफ समुपदेशकांची भक्कम टीम आहे. त्यांनी भारतात तसेच विदेशातही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना वंध्यत्व व आयव्हीएफ उपचारांचा अतिशय मुलभूत पातळीपासून सर्वांत प्रगत पातळीपर्यंत, तसेच अतिशय साध्यापासून ते अतिशय क्लिष्ट स्तरावरील अनुभव आहे.
बीएफआयच्या संस्थापक–संचालिका डॉ. फाल्गुनी बावीशी ह्या आयव्हीएफ प्रयोगशाळा विज्ञान व तंत्रज्ञानात अतिशय पारंगत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची योग्य पात्रता असलेली, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची भ्रुणशास्त्र टीम अतिशय उत्तम कार्य करते. सर्व आयव्हीएफ तंत्रज्ञानात व स्थापित किंवा नव्या तंत्रांमध्ये, तसेच वेळापत्रक व्यवस्थापित करण्याच्या मुख्य कामगिरी निर्देशकांमध्ये उत्कृष्टता साधण्यासाठी आमची टीम वचनबद्ध आहे. आयव्हीएफ प्रयोगशाळा ही संपूर्ण आयव्हीएफ कार्यक्रमाची हृद्य व आत्मा आहे. आमचे हे हृद्य फक्त मजबूतच नाही, तर ते शुद्धही आहे.
स्वभावाने कनवाळू असलेली आमची समुपदेशकांची टीम फक्त तुमच्या वैद्यकीय गरजाच समजून घेत नाही, तर तुमच्यातील भय, चिंता, तुमच्या सामाजिक व भावनिक समस्या आणि बऱ्याच बाबी समजून घेते.
तुम्हाला चिंतामुक्त करण्यासाठी व आरामदायी अनुभूती देण्यासाठी आमचे समुपदेशक नेहमी तयार असतात. यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळतो व यश प्राप्तीची अनुभूती होते.
तुमचा आमच्यासोबतचा फर्टिलिटीचा प्रवास सहज, आरामदायी, आनंददायी व यशस्वी करण्यासाठी आमची उत्साही, वचनबद्ध, प्रशिक्षित आणि सदैव तयार असणाऱ्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम सर्वतोपरी प्रयत्नरत असते.
WhatsApp us