फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूमधून होणारी, पण कर्करोग नसललेली ऊतींची अमर्याद वाढ होय. ६० ते ८०% महिलांमध्ये त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात फायब्रॉइड्सचा विकास होतो. फायब्रॉइड्सला मायोमास किंवा लिओमायोमास असेही म्हणतात.
गर्भाशयाचे तीन स्तर असतात :
मध्यभागी असलेल्या स्नायूयुक्त स्तरातून फायब्रॉइड्सची निर्मिती होते. फायब्रॉइड्समध्ये कर्करोग होण्याची शक्यता अतिशय कमी असते. त्यामुळे, ज्या महिलेत फायब्रॉइड्सची लक्षणे दिसत नाहीत, तिला शस्त्रक्रियेऐवजी निरीक्षणाखाली ठेवणे अधिक योग्य ठरते.
फायब्रॉइड्स एक किंवा अनेक असू शकतात. त्यांचे आकार अदृश्य वस्तूच्या आकारापासून तर कलिंगड किंवा त्यापेक्षा मोठ्या वस्तूंएवढे असू शकते.
कित्येक फायब्रॉइड्सची लक्षणेही आढळत नाही आणि निदर्शनास आलीच, तर ती नियमित सोनोग्राफी किंवा तपासणी करतानाच आढळून येतात.
अत्याधिक त्रासदायक व दीर्घकाळ चालणारी मासिक पाळी हे सर्वांत सामान्य लक्षण आहे.
रक्त गेल्याने ऍनिमिया होऊ शकतो आणि त्यामुळे थकवा आल्यावर कमजोरी आणि श्वासोच्छ्वासात अडचण निर्माण होऊ शकते.
मोठ्या फायब्रॉइड्समुळे आजूबाजूच्या भागांवर दाब निर्माण होऊ शकतो आणि यामुळे उदराच्या भागात सतत ताण निर्माण होण्याची, वेळोवेळी लघवी लागण्याची, अपचन किंवा पाठ दुखण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
सहसा, त्रासदायक मासिक पाळीचा संबंध फायब्रॉइड्सशी नसतो, आणि गर्भाशयाशी संबंधित इतर समस्या दूर करता येऊ शकतात.
गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सना त्यांच्या स्थानावरून तीन प्रकारांत विभाजित केले जाते.
फायब्रॉइड्स निर्माण होण्याचे स्पष्ट कारण सांगता येत नाही. इस्ट्रोजेनयुक्त वातावरणात फायब्रॉइड्स चांगल्याप्रकारे वाढतात. प्रजननात्मक वयातसुद्धा फायब्रॉइड्सची वाढ होत असते. रजोनिवृत्तीनंतर त्यांची वाढ थांबते किंवा त्यांचा आकार कमी होतो.
जोखिमेचे सामान्य घटक आहेत :
पुनरुत्पादक औषधींच्या अमेरिकन सोसायटीच्या मते, वंध्यत्व असलेल्या स्त्रियांपैकी ५ ते १०% स्त्रियांवर फायब्रॉइड्सचा परिणाम पडतो.
गर्भाशयात भ्रूणाचे जिथे रोपण होते, त्या गर्भाशय स्तराचा आकार फायब्रॉइड्समुळे कमी होऊ शकतो, किंवा गर्भाशयाच्या स्तराला होणारा रक्त पुरवठा अवरोधित करून फायब्रॉइड्स रोपण प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकतात. पण याचे मूळ कारण मात्र क्वचितच माहित होते.
सर्वसाधारणपणे, आकाराने मोठे किंवा गर्भाशयाच्या स्तराच्या आकारावर परिणाम करणारे फायब्रॉइड्स प्रजनन क्षमतेवर जास्त प्रभाव पाडतात.
वंध्यत्वाला कारणीभूत असलेले फायब्रॉइड्स काढून टाकण्याचा निर्णय फायब्रॉइड्सचे आकार, स्थान आणि वंध्यत्वाशी संबंधित इतर घटकांवर अवलंबून असतो.
फायब्रॉइड्स काढून टाकण्याची गरज आहे किंवा नाही यासाठी आम्ही तुम्हाला फायब्रॉइड्स व्यवस्थापनाचे सर्वोत्तम मार्गदर्शन करतो. आमच्याकडे इष्टतम परिणाम मिळवण्यासाठी अतुलनीय शल्यचिकित्सा अनुभव व सुरक्षा उपलब्ध आहे.
फायब्रॉइड्ससह गर्भवती असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेसंबंधीच्या समस्या उद्भवण्याच्या शक्यता जास्त असतात. सहसा, जर पूर्वी तुम्हाला गर्भधारणेसंबंधी समस्या जाणवल्या नसतील किंवा अतिशय मोठ्या फायब्रॉइड्सचा सामना करावा लागला नसेल, तर मग नव्याने गर्भधारणेची योजना आखण्यापूर्वी फायब्रॉइड्स काढून टाकण्याची शिफारस तुम्हाला केली जात नाही.
फायब्रॉइड्स असलेल्या महिलांना गर्भपातांचा सामना करावा लागत असला, तरी अलीकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे, की केवळ गर्भाशयाच्या फायब्रॉइड्समुळे होणारे गर्भपात अतिशय दुर्मिळ असतात.
फायब्रॉइड्समुळे गर्भधारणेसंबंधीच्या समस्यांव्यतिरिक्त वेळेच्या आधीच प्रसूती होण्याची, सीझरियन सेक्शनची (सीएस डिलिव्हरी) गरज पडण्याची शक्यता वाढू शकते.
अल्ट्रासाऊंड सर्वसाधारणपणे, फायब्रॉइड्सचे निदान करण्यासाठी उदराचे किंवा योनीचे साधे अल्ट्रासाऊंड करणे पुरेसे असते.
एमआरआय कधीकधी फायब्रॉइड्स आणि एडेनोमायोसीस यांच्यात फरक करणे कठीण असते. गर्भाशययात वाढणाऱ्या, पण कर्करोगयुक्त नसलेल्या दुसऱ्या एका भागाला ‘एडेनोमायोसीस’ म्हणतात. एमआरआयमुळे या दोन्हीतील फरक अचूकपणे ओळखता येतो.
औषधे जीएनआरएच अॅगोनिस्ट्स, हार्मोन रीलीझिंग इंट्रायुटेराईन उपकरणे आणि गर्भ निरोधक गोळ्या असे विविध वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. औषध कदाचित सर्वच रूग्णांना उपयुक्त ठरत नाही. वैद्यकीय उपचारांसाठी योग्य असलेल्या सर्वोत्तम रूग्णांची निवड त्याचे वय, फायब्रॉईड्सचा आकार, गर्भाशयाचे कार्य इत्यादींवर अवलंबून असते. आम्ही बावीशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्यासाठी योग्य उपचार निवडण्यात तुमची मदत करू शकतो.
शस्त्रक्रिया फायब्रॉइड्ससाठी, विशेषकरून ज्या स्त्रियांना त्यांची प्रजनन क्षमता संवर्धित करायची आहे, त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मायोमेक्टोमी या पद्धतीत फायब्रॉइड्स काढून टाकले जातात आणि गर्भाशयावर टाके पाडले जातात किंवा पाडले जात नाही.
स्थानानुसार, ही प्रक्रिया सबम्यूकस फायब्रॉइड्स काढण्यासाठी हिस्टेरोस्कोपीद्वारे (योनीतून एक स्कोप आत टाकणे) किंवा लॅपरोस्कोपीद्वारे पार पाडली जाऊ शकते. उदरात एक स्कोप टाकून आणि 5 ते 10 मिमी आकार मोजण्यासाठीचे लहान उपकरण यांद्वारे लॅपरोस्कोपिक प्रक्रिया केली जाते. (लॅपरोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपीबद्दल अधिक वाचा)
हिस्टरेक्टॉमी याचा अर्थ आहे, गर्भाशय काढून टाकणे. ही प्रक्रिया लॅपरोस्कोपीद्वारे किंवा उदर अथवा योनिमार्गाच्या शस्त्रक्रियेद्वारे पार पाडली जाऊ शकते.
जर तुम्ही तुमचे कुटुंब पूर्ण केले असेल, तर मायोमेक्टोमीच्या तुलनेत हा पर्याय चांगला ठरू शकतो. हिस्टेरोस्कोपीचा डिम्बग्रंथिच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो; जर इतर पर्याय व्यवहार्य असतील, तर अशावेळी 40 वर्षे वयापर्यंत हिस्टरेक्टॉमी टाळणे कधीही चांगले.
गर्भाशयाच्या धमनीचे एम्बोलाइजेशन या प्रक्रियेत फायब्रॉइड्स आणि गर्भाशयाला रक्त पुरवठा करणाऱ्या गर्भाशयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये लहान कण (एम्बोलिक एजंट्स) टाकण्यासाठी लवचिक नळीचा वापर केला जातो. ही प्रक्रिया फ्ल्युरोस्कोपीच्या (एक्स-रे) मार्गदर्शनाखाली केली जाते. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश्य फायब्रॉइड्सला रक्तपुरवठा कमी करून, त्यास संकुचित करणे व मारून टाकणे हा असतो. विविध वैद्यकीय कारणांमुळे शस्त्रक्रियेस पात्र नसलेले रुग्ण या पध्दतीचा वापर करू शकतात. यामुळे प्रजनन क्षमता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
एमआरआय मार्गदर्शनाखाली केंद्रीभूत अल्ट्रासाऊंड
तरीही, या उपचाराच्या काही मर्यादा आहेत.
अतिशय अचूक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी आमच्याकडे कमाल सुरक्षितता असलेली आधुनिक एंडोस्कोपी प्रणाली उपलब्ध आहे.
फायब्रॉइड्सच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या विविध गैर-शल्यचिकित्सक पद्धतींचे अनुभवही आमच्याकडे आहे.
WhatsApp us