कोणत्याही कारणामुळे जेव्हा तुमची प्रजनन क्षमता कमी होण्याची किंवा संपण्याची शक्यता असेल, तेव्हा तुमची अनुवांशिक सामग्री (जननपेशी) भविष्यातील वापरासाठी गोठवल्या जाऊ शकतात. पुरुष त्यांचे शुक्राणू, वीर्य किंवा अंडकोष ऊती गोठवू शकतात. महिला अंडी/ऊसाईट्स अथवा गर्भाशयाच्या ऊती गोठवू शकतात. एक जोडपे भ्रूण/ब्लास्टोसिस्ट गोठवू शकते.
वेगवेगळ्या कारणांमुळे मातृत्वात विलंब करण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्रियांना प्रजनन संवर्धनाची तंत्रे पुनरुत्पादनाचे आधुनिक पर्याय प्रदान करतात.
आजच्या काळात स्त्रियांचे उशिरा आई होण्याचे निर्णय वाढत चालले आहेत, आणि यामुळे यशस्वी गर्भधारणा होण्याच्या शक्यतेवर लक्षणीय परिणाम होतो.
अगदी सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे, जर एखादी स्त्री तरुणपणीच तिची अंडी टिकवून ठेवण्याचा किंवा गोठवण्याचा निर्णय घेत असेल, तर ज्याक्षणी तिला मूल होण्याची इच्छा असते, त्याक्षणी ती त्या गोठवलेल्या अंडी वापरू शकते. अशाप्रकारे, त्यावेळी गर्भधारणेची शक्यताही तेवढीच असेल, जितकी अंडी गोठवण्याच्या वेळी होती. नंतर कोणत्याही वयात स्वत: च्या अंडीसह गर्भधारणा करण्याची संधी तिला प्रजननक्षमता संवर्धनामुळे मिळते.
महिलांकडे एक जैविक घड्याळ असते. वाढत्या वयानुसार स्वतःच्या अंड्यांसह गर्भधारणा करणे कठीण असते. जास्तीत जास्त स्त्रिया अंडी गोठवून ठेवण्याच्या माध्यमातून प्रजनन क्षमता संवर्धित करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना जेव्हा बाळ हवे असेल, तेव्हा त्यांना गर्भधारणा होण्याची अधिक चांगली संधी व मानसिक शांती मिळेल.
वैद्यकीय किंवा शल्यचिकित्सक उपचार घेणाऱ्या स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर या उपचारांचा परिणाम पडू शकतो. अशा उपचारांमध्ये कर्करोगावरील थेरपी, ट्रान्सप्लांट, डिम्बग्रंथिची मोठी शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश असू शकतो. अशा महिला त्यांच्या अंडी किंवा अंडाशयाच्या ऊती गोठवून ठेवू शकतात आणि रोग बरा झाल्यावर भविष्यात त्या गर्भधारणा करू शकतील याची खात्री करून घेऊ शकतात.
आता व्हिट्रीफिकेशन पद्धतीने अंडी गोठवल्या जातात. 2007 नंतर लोकप्रिय झालेल्या या पद्धतीने प्रजनन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. गोठलेल्या अंडी आणि भ्रुणांना 100% जिवंत ठेवणे आता जवळजवळ शक्य आहे. गोठलेल्या अंडी वापरल्याने आयव्हीएफमधील गरोदरपणाचे प्रमाण देखील तितकेच सुधारले आहे.
सामाजिक किंवा करिअरच्या कारणास्तव उशीरा मातृत्व स्वीकारण्याची गरज वाढल्याने हे तंत्र अधिक लोकप्रिय बनले आहे.
कर्करोग किंवा अशाप्रकारच्या आजारांतून होणारा बचाव आणि बरा झाल्यावर उत्तम जीवन जगण्याने या महिलांसाठी एक नवीन मार्ग उघडला गेला आहे.
ही प्रक्रिया अंडी पुनर्प्राप्तीच्या टप्प्यापर्यंत पारंपारिक आयव्हीएफ प्रमाणेच असते. प्रथम चरण म्हणजे, अधिक अंडी तयार करण्यासाठी गोनॅडोट्रोपिन हार्मोन्सद्वारे (एफएसएच आणि किंवा एचएमजी) उत्तेजन देणे. फॉलिकल्स योग्य आकारात पोहोचल्यानंतर ऊसाइट्सची पुनर्प्राप्ती केली जाते. ही सौम्य भूलतंत्र अंतर्गत केली जाणारी एक छोटी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली योनीमार्गे एक सुई टाकून अंड्यांना एस्पायर केले जाते. नंतर या अंड्यांचे परिपक्वतेसाठी मूल्यांकन केले जाते. पारंपारिक आयव्हीएफमध्ये, परिपक्व अंड्यांचे फलन केले जाते, पण येथे परिपक्व अंडी व्हिट्रिफिकेशनद्वारे गोठविली जातात.
वापराच्या वेळी ही अंडी वितळविली जातात (गरम करणे किंवा पुन्हा जिवंत करणे) आणि नियमित आयव्हीएफ-आयसीएसआय उपचारांप्रमाणेच त्यांचे फलन केले जाते.
जेव्हा जीव वाचवणारे उपचार घेणे अत्यावश्यक असते आणि त्यावेळी अंडाशयाला उत्तेजन देऊन अंडी गोठविण्यासाठी पुरेसा वेळ नसतो किंवा अंडाशय काढून टाकावे लागतात, तेव्हा अंडाशयाचा एक लहानसा तुकडा गोठविला जाऊ शकतो. यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेसह विशेषीकृत असा एक ‘स्लो फ्रीजर’ वापरला जातो.
जर नंतर एखाद्यास त्याचा वापर करायचा असेल, तर तेव्हा त्याचे पुन्हा रोपण केले जाऊ शकते.
व्हिट्रीफिकेशन तंत्रातील प्रगतीमुळे आता अंडी अनिश्चित कालावधीसाठी साठवून ठेवता येतात.
एका निरोगी गर्भधारणेसाठी किती अंड्यांची गरज पडू शकते हे निश्चीतपणे सांगता येते नाही. हे स्त्रीच्या वयावरून व व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेवर अवलंबून असते. एका आयव्हीएफ सायकलमध्ये १० ते १५ परिपक्व अंडी प्राप्त होतात. तरीही, ही संख्या वय व अंडाशय साठ्याच्या क्षमतेनुसार बदलू शकते.
मोठ्या पातळीवर प्रकाशित एका अभ्यासानुसार, 35 वर्षांच्या किंवा त्याहून कमी वयात अंडी गोठविलेल्या जवळपास १५०० महिलांकडून प्राप्त निकालांच्या विश्लेषणावरून खालील निष्कर्ष प्राप्त झाले –
१५०० महिलांपैकी ५ अंडी गोठविलेल्या स्त्रियांमध्ये जिवंत बाळाला जन्म देण्याची शक्यता १५%, १० अंडी गोठविलेल्या स्त्रियांमध्ये ६१% आणि १५ किंवा अधिक अंडी गोठविलेल्या स्त्रियांमध्ये ८५% असते.
The preservation of oocytes is so stable that there is no limited time after which they should be used, which allows each woman to decide the exact moment when she decides to use them to get pregnant.
The reproductive prognosis of each patient depends on the quality and number of eggs that are obtained. The preservation of fertility or freezing of eggs does not guarantee a future pregnancy. The exact number required to achieve a live born child is unpredictable. However, it does allow the possibility of trying an in vitro fertilization treatment with the same probabilities that they would have had at the time of vitrification.
गोठलेल्या अंड्यांसह केलेले उपचार आई आणि मुलासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
जर तुम्ही गोठवलेल्या कोणत्याही अंड्यामुळे यशस्वी गर्भधारणा होत नसेल, तर तुम्ही तुमच्या वयानुसार नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकता किंवा आयव्हीएफ उपचारद्वारे नवीन अंडी उत्पादन सुरू करू शकता. जर तुमच्याकडे अंडी नसतील, तर तुम्ही अंडदानाचा पर्याय निवडू शकता. जर तुमच्याकडे जोडीदार नसेल, तर अशावेळी तुम्ही शुक्राणू दात्याच्या मदतीने आयव्हीएफ करू शकता.
‘गोठलेल्या अंड्यापासून भारतातील पहिल्या जिवंत बाळाला जन्म देण्याचा मान बीएफआयकडे आहे. आमच्याकडे अंडे/ऊसाइट्स गोठवण्याचा प्रचंड अनुभव आहे. आमच्यासाठी अंडी गोठविणे ही नेहमीची बाब आहे, अगदी अंडदान कार्यक्रमासाठीसुद्धा आम्ही ही प्रक्रिया करतो. तुमच्या सर्वात मौल्यवान अशा जैविक सामग्रीची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे उत्कृष्ट सेटअप, कुशल भ्रूणशास्त्रज्ञ आणि प्रयोगशाळा आहेत.
तुमच्या प्रजनन क्षमतेला सुरक्षित करण्याच्या शक्यतांना एक्सप्लोर करा. आम्हाला भेटण्यास अजिबात संकोच करू नका!
आमच्या डॉक्टरांपैकी एखाद्याची भेट घेण्यासाठी आजच बुकिंग करा किंवा व्हिडिओवरून सल्ला घ्या.
वैद्यकीय किंवा शल्यचिकित्सात्मक उपचार सुरू करणाऱ्या पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर संबंधित उपचारांचा परिणाम पडू शकतो. या उपचारांमध्ये कर्करोगाचा उपचार, प्रत्यारोपण, टेस्टिस किंवा पिट्यूटरी शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश असू शकतो. भविष्यात हे रोग बरे झाल्यावर गर्भधारणा होऊ शकते, याची खात्री करण्यासाठी संबंधित पुरुष त्यांचे शुक्राणू किंवा टेस्टिक्युलर ऊती गोठवून ठेवू शकतात.
शुक्राणूंची संख्या अतिशय कमी असलेले पुरुष भविष्यातील वापरासाठी म्हणून आपले शुक्राणू गोठवू शकतात, कारण नंतर शुक्राणूंची संख्या अजूनच कमी होऊ शकते. अझोस्पर्मिया- शुक्राणूंची संख्या असलेले पुरुष त्यांच्या अंडकोशातून शुक्राणू प्राप्त करू शकतात. भविष्यातील वापरासाठी ते हे शुक्राणू जपून ठेवू शकतात.
जेव्हा जीव वाचविण्यासाठी उपचार सुरू करण्याची निकड असते आणि शुक्राणूंचे पुरेसे नमुने गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो तेव्हा आपण वृषणातून ऊतकांचा एक छोटा तुकडा गोळा करू शकतो, एकाधिकात विभागून ते गोठवू शकतो.
जेव्हा जीव वाचवणारे उपचार घेणे अत्यावश्यक असते आणि त्यावेळी वीर्याचे पुरेसे नमुने गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, तेव्हा अशावेळी टेस्टीसच्या ऊतीचा एक लहानसा तुकडा संकलित करून, त्यास गोठवले जाऊ शकते.
जेव्हा एखाद्याचा त्यांना वापर करायचा असेल, तेव्हा त्या अंड्यांना ऊब देऊन – वितळवून
टेस्टिसमधून गोळा केलेल्या ताज्या शुक्राणूसारखे वापरता येते.
आधुनिक गोठवण आणि संग्रहण तंत्रज्ञानासह शुक्राणू अनिश्चित कालावधीसाठी साठवून ठेवता येतात.
गोठलेल्या शुक्राणूसह केलेले उपचार आई आणि मुलासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
१९९८ पासून बीएफआय शुक्राणू आणि टेस्टिक्युलर ऊतीला गोठवण्याचे कार्य करत आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ गोठवून ठेवलेल्या शुक्राणूच्या मदतीने जिवंत बाळाला जन्म देण्यास आम्हाला यश आले आहे. तुमच्या सर्वात मौल्यवान अशा जैविक सामग्रीची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे उत्कृष्ट सेटअप, कुशल भ्रूणशास्त्रज्ञ आणि प्रयोगशाळा आहेत.
तुमच्या प्रजनन क्षमतेला सुरक्षित करण्याच्या शक्यतांना एक्सप्लोर करा. आम्हाला भेटण्यास अजिबात संकोच करू नका!
WhatsApp us