BFI

स्त्री वंध्यत्व

जर असुरक्षित संभोगानंतर ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाची स्त्री महिन्यांत आणि ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची स्त्री वर्षाच्या आत गर्भवती होत नसेल, तर त्यास वंध्यत्व म्हणतात.

जगभरातील सुमारे 15 ते 20% जोडप्यांना वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागतो. 40% प्रकरणांमध्ये वंध्यत्वासाठी महिला जोडीदार जबाबदार असते; दुसऱ्या 40% प्रकरणांमध्ये पुरुष जोडीदार जबाबदार असतो, तर उर्वरित 10-20% प्रकरणांमध्ये दोन्ही जोडीदार जबाबदार असतात. कधीकधी खूप छोटे छोटे कारण सापडू शकत नाही, अशा कारणांमुळे उद्भवणाऱ्या वंध्यत्वासअस्पष्ट वंध्यत्वम्हणतात.

जर पूर्वी स्त्री कधीच गर्भवती झाली नसेल, तर त्यास प्राथमिक वंध्यत्व म्हणतात; आणि जर एका बाळाला दिल्यानंतर किंवा गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणा करण्यास अडचणी येत असतील, तर त्यास दुय्यम वंध्यत्व म्हणतात.

गर्भधारणा होण्यासाठी बऱ्याच गोष्टी घडाव्या लागतात :

परिपक्व अंडे अंडाशयातून बाहेर पडणे (ओव्हुलेशन) आवश्यक आहे. त्यानंतर एका स्त्रीबीजवाहक नलिकेने त्या अंड्याला उचलले पाहिजे.

अंड्याला भेटण्यासाठी त्याचे फलन करण्यासाठी पुरुषाच्या शुक्राणूने गर्भाशयातून स्त्रीबीजवाहक नलिकेपर्यंत प्रवास करणे अत्यावश्यक आहे.

फलन झालेल्या अंड्याने स्त्रीबीजवाहक नलिकेतून प्रवास करून गर्भाशयाच्या अंतःस्तराशी स्वतःला जोडणे (रोपण) आवश्यक आहे.  Know more about natural conception.

स्त्रियांमध्ये वंध्यत्व कशामुळे होते?

तुम्हाला गर्भधारणा होण्यात त्रास होण्याची अनेक कारणे आहेत. इथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे, की तुम्ही प्रजनन क्षमता वर्षांनुसार कमी कमी होत जाते. या प्रजनन क्षमतेचीच गर्भधारणेत महत्त्वाची भूमिका असते.

महिलांमध्ये वंध्यत्व होण्याची सर्वसामान्य कारणे आहेत :

अंड्याच्या निर्मिती आणि ओव्हुलेशन संबंधित समस्या

स्त्रियांमध्ये वंध्यत्वासाठीच्या कारणांपैकी हे एक सर्वात सामान्य कारण आहे.

अनियमित मासिक पाळी, पाळी वेळेच्या आधीच येणे किंवा पाळीच येणे, असे अनुभव स्त्रियांना येतात. अंड्याच्या विकासाला अंडाशयातून पडण्याला कारणीभूत असणाऱ्या संप्रेरकांच्या असंतुलनामुळे अंडोत्सर्जनाच्या (ओव्हुलेशन) प्रक्रियेत व्यत्यय येतो.

ओव्हुलेशनमध्ये अडथळा आणणाऱ्या समस्यांमध्ये समावेश आहे:

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम

ही एक अशी स्थिती आहे, जिथे लक्षणे, अनियमित ओव्हुलेशन, पुरुष संप्रेरकांच्या वाढीमुळे शरीरातील केसांची वाढ (हर्सुटिझम), वजन वाढणे आणि चयापचयाशी गडबड इत्यादी बाबी एकाच वेळी घडून येतात. मूळ समस्या अशी आहे, की अंडाशयात बरेच फॉलिकल्स असतात, परंतु त्यांची वाढ होत नाही आणि ते  परिपक्व होऊन अंड्याची निर्मितीही करत नाहीत. उलट हे फॉलिकल्स सुरुवातीच्या वाढीदरम्यान तिथेच अडकून बसतात आणि त्यामुळे सोनोग्राफीमध्ये अनेक लहान-लहान सिस्ट दिसतात, म्हणूनच या परिस्थितीला पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतात. (अधिक वाचा). (अधिक वाचा)

अंड्यांची कमी संख्या किंवा अंडाशयाचा कमी किंवा कमकुवत साठा

जर तुमच्या अंडाशयात अंडी कमी असतील, तर त्यामुळे गर्भवती होण्यात अडचण येऊ शकते. येते. तुम्हाला माहिती करता येऊ शकेल असे कोणतेही संकेत नसतात, पण असे कदाचित लवकरही घडू शकते. (पुढे वाचा)

थायरॉईड, एड्रेनल किंवा पिट्यूटरी ग्रंथीवर परिणाम करणाऱ्या विकृती ओव्हुलेशनच्या प्रक्रियेत समस्या निर्माण करू करतात.

स्त्रीबीजवाहक नलिका खराब किंवा निकामी होणे

स्त्रीबीजवाहक नलिका हा एक मार्ग आहे, जेथे अंडे आणि शुक्राणू एकत्र होतात, फलन करतात आणि गर्भाच्या रूपात विकसित होतात. ही नलिका रोपण करण्यासाठी भ्रुणांचे गर्भाशयात वहन करते. संक्रमण, नलिकेवर किंवा जवळच्या अवयव, जसे अपेंडिक्सवर पूर्वी केलेली शस्त्रक्रिया, एक्टोपिक गर्भधारणेचा इतिहास , एंडोमेट्रिओसिस इत्यादींमुळे नलिकेचे नुकसान होऊ शकते.

गर्भाशयासंबंधीच्या समस्या

गर्भाशयामध्ये जन्मापासूनच स्वरूप दोष, आकार दोष किंवा अगदी गर्भाशय अनुपस्थित असण्यासारखे विकासाशी संबंधित दोष असू शकतात. गर्भाशयामध्ये फायब्रोइडसारखे ट्यूमर असू शकतात, ज्यांमुळे आकार, संख्या आणि स्थानावर प्रभाव पडू शकतो. गर्भाशयामध्ये कदाचित मागील ऑपरेशन्स, बाह्य आसंजन, एडेनोमायोसिसच्या खुणा देखील असू शकतात, ज्या गर्भाशयाच्या सामान्य कार्यात अडथळा आणू शकतात.

एंडोमेट्रियम संबंधित समस्या

मासिक पाळीतील संप्रेरकांच्या बदलांसह एंडोमेट्रियम वाढते आणि कमी होते. खराब झालेले एंडोमेट्रियम योग्यरित्या वाढू शकत नाही आणि म्हणून भ्रूण स्वीकारण्यासाठी आणि यशस्वी रोपण करण्यासाठी ते चांगले नसते. आधीच्या संसर्गामुळे झालेली जखम, शस्त्रक्रियेवरील आघात, गर्भपात इत्यादीमुळे एंडोमेट्रियमचे नुकसान होऊ शकते. एंडोमेट्रियमच्या पोकळीमध्ये गर्भधारणेत अडथळा आणणारे पॉलीप, बाह्य घटक, फायब्रॉइड्स आदी. असू शकतात.

पुनरुत्पादक मार्गिकेत संसर्ग

संसर्गामुळे संपूर्ण पुनरुत्पादक मार्गिका प्रभावित होऊ शकते आणि तिच्या कार्यावर परिणाम पडू शकतो. क्षयरोग, क्लॅमिडीया इत्यादी. सामान्य संसर्ग आहेत.

एंडोमेट्रिऑसिस

एंडोमेट्रिऑसिसमध्ये श्रोणि, गर्भाशयाची बाह्य भिंत, स्त्रीबीजवाहक नलिका किंवा अंडाशय यांसारख्या अपसामान्य ठिकाणी गर्भाशयाच्या अंतःस्तरासारखी एक ऊती विकसित होते. अंडाशयात ती ऊती एक पुटी (सिस्ट) म्हणूनही विकसित होते, जिला चॉकलेट सिस्टही  म्हणतात.

 

जीवनशैली घटक

लठ्ठपणा, कॅफीनचे सेवन, धूम्रपान, उत्तेजक औषधे, अल्कोहोल, प्रदूषण, तणाव, अनियमित दैनदिन क्रियाकलाप, समागमाचा अभाव इत्यादिंमुळे प्रजनन क्षमता कमी होते.

औषधे

अ‍ॅन्टीडिप्रेससंट्स, ट्राँक्विलाइझर्स, कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स, अंमली पदार्थ आणि कर्करोग प्रतिबंधक औषधे यासारखी काही विशिष्ट औषधे संप्रेरकांना आणि प्रजनन क्षमतेला बदलू शकतात.

दीर्घकालीन वैद्यकीय स्थिती

किडनीचे रोग, यकृताचे रोग, सिकलसेल रोग, एचआयव्ही/एड्स आणि हिपॅटायटीस बी किंवा सी यांसारख्या रोगांचा प्रजननक्षमता, गर्भधारणा आणि बाळंतपणावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडतो.

स्त्रियांमधील वंध्यत्वाचे निदान

आम्ही बाविशी प्रजनन इन्स्टिट्यूटमध्ये निदानासाठी एक चक्र पद्धतीचा अवलंब करतो. एका मासिक पाळीत प्राथमिक निदानापर्यंत पोहचण्यासाठी टप्याटप्याने चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये पुरुष भागीदाराच्या वीर्याची तपासणी, डिम्बग्रंथि साठ्याचे मूल्यांकन, अल्ट्रासाऊंड आणि ओव्हुलेशन ट्रॅकिंग, मूलभूत संप्रेरक आणि इतर रक्त चाचण्यांचा समावेश असतो. Read More

स्त्री वंध्यत्वावरील उपचार

आम्ही प्रथम निदानावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यानंतर तंतोतंत सानुकूलित उपचार प्रोटोकॉलसह एक अत्यंत वैयक्तिकृत आणि विशेष उपचार योजना बनवतो.

उपचाराच्या पर्यायांपैकी काही आहेत:

ओव्हुलेशन इंडक्शन

पीसीओएस किंवा इतर घटकांमुळे विचलित ओव्हुलेशन असलेल्या महिलांना चांगल्या प्रतीची अंडी तयार करण्यासाठी औषधे दिली जातात. सुदैवाने, मुखाद्वारे आणि इंजेक्शनद्वारे दिली जाणारी बरीच औषधे उपलब्ध आहेत. या औषधांमुळे जवळजवळ 100% ओव्हुलेशन साध्य करता येऊ शकते.

लॅपरोस्कोपी – हिस्टेरोस्कोपी

ही एक शल्यक्रिया आहे, ज्यात उदाराच्या भिंतीमधून ओटीपोटाच्या पोकळीत एक दुर्बिणीसारखे प्रकाशित उपकरण (लॅपरोस्कोप) आत टाकले जाते. क्षतिग्रस्त नळ्या, फायब्रॉइड्स इत्यादींसारख्या कोणत्याही संरचनात्मक समस्येसाठी कमीतकमी प्रक्रिया कराव्या लागणाऱ्या लॅपरोस्कोपी – हिस्टेरोस्कोपीद्वारे सर्जिकल सुधारणा करता येते. अधिक वाचा

इंट्रा युटेराईन इंसेमिनेशन – आययूआय

आययूआय ही एक सोपी बाह्यरुग्ण प्रक्रिया आहे, जिच्यात ओव्हुलेशनच्या वेळी धुतलेला आणि तयार वीर्य नमुना गर्भाशयात ठेवला जातो. यामुळे नैसर्गिक संभोगाच्या तुलनेत गर्भवती होण्याच्या दुप्पट शक्यता मिळू शकतात. अधिक वाचा

आयव्हीएफ एआरटी

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन – आयव्हीएफ हे एक उपचार आहे, ज्यामध्ये अंडी शरीरातून काढली जातात आणि आयव्हीएफ प्रयोगशाळेत त्यांचे फलन आणि विकास केले जाते. सर्वोत्कृष्ट भ्रुण निवडले जातात आणि आईच्या गर्भाशयात परत ठेवले जातात. बीएफआयमधील “सोपे आयव्हीएफ” अगदी सोपे, सुरक्षित, स्मार्ट आणि यशस्वी आहे. आमच्यावर विश्वास ठेवून आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या रूग्णांपैकी 98% रुग्णांकडे आज जिवंत-मूल किंवा मुले आहेत. अधिक वाचा

पीआरपी – वंध्यत्व उपचारातील प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी

प्लेटलेट्स ह्या रक्तपेशी असतात, ज्यांच्यात वेगात विभाजित होण्याची अद्वितीय क्षमता असते. त्या सायटोकिन्स आणि वाढीस कारणीभूत असणाऱ्या इतर अनेक घटकांपासून समृद्ध असतात. प्लेटलेट्सचे सक्रियकरण आणि समृद्धी केल्याने त्या कार्यात्मकरित्या अधिक सक्षम बनतात.

औषधाच्या बर्‍याच क्षेत्रांत पीआरपीचा उपयोग एक पुनरुज्जीवित करणारे साधन म्हणून केला जातो. पीआरपी ऊतींच्या वाढीस मदत करते.

डिंबग्रंथि पुनरुज्जीवन

संहत, सक्रिय, समृद्ध पीआरपीचा इंजेक्शन अंडाशयाची अंडी उत्पादन क्षमता वाढवू शकतो. याद्वारे बीएफआयने गर्भधारणेच्या अतिशय कमी शक्यता असणाऱ्या बऱ्याच जोडप्यांमध्येही नैसर्गिक गर्भधारणा साध्य केल्या आहेत. अधिक वाचा

एंडोमेट्रियल पुनरुज्जीवन

संसर्ग, शस्त्रक्रिया किंवा गर्भपातामुळे गर्भाशयाच्या कार्यात्मक थर असलेल्या एंडोमेट्रियमचे तीव्र नुकसान होऊ शकते. यामुळे गर्भाशयाच्या भिंती एकमेकांना  चिकटतात आणि आसंजन तयार होते.

हिस्टिरोस्कोपीद्वारे आसंजन कापून शल्यक्रिया सुधारणा करणे शक्य आहे. तथापि, त्यानंतर चांगले कार्य करण्यासाठी नवीन कार्यकारी एंडोमेट्रियल थर वाढणे आणि कापलेल्या भागाला आच्छादित करणे आवश्यक आहे.

पीआरपी इंजेक्शन एंडोमेट्रियलच्या सामान्य वाढीस आणि गरोदरपण मिळविण्यात मदत व प्रोत्साहित करू शकते.

पीआरपी तयार करण्याची प्रक्रिया

 • ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुरक्षित आहे.
 • रूग्णाकडून रक्त गोळा केले जाते.
 • प्लेटलेट्स वेगळे करण्यासाठी ही प्रक्रिया आमच्या स्वतःच्या प्रयोगशाळेत केली जाते.
 • नमुन्याला अधिक समृद्ध आणि प्रभावी करण्यासाठी त्यावर विशेष प्रक्रिया केली जाते. 
 • तयार पीआरपी अंडाशय किंवा गर्भाशय अशा दोन्हींमध्ये इंजेक्ट ककेले जाते.

फायदे

ते रुग्णांच्या स्वतःच्या रक्ताव्दारे बनवलेले असल्याने रुग्णाच्या शरीरात बाहेरून कोणतीही औषध किंवा सामग्री टाकली जात नाही. ही एक अतिशय सोपी आणि तुलनेने स्वस्त प्रक्रिया आहे. या उपचाराचा प्रभाव केवळ एका उपचार सायकलमध्येच नव्हे, तर बराच काळ टिकतो.

नुकसान आणि मर्यादा

पीआरपी अजूनही एक नवीन प्रक्रिया आहे. पीआरपी उपचारानंतरही कदाचित कोणतीही सुधारणा होऊ शकत नाही.

प्रजननक्षमता संवर्धन – प्रतिबंधात्मक उपाय

महिला वंध्यत्वाचा धोका कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेतः

 • लैंगिक आयुष्य नियमित ठेवा.
 • गर्भपात टाळणे – गर्भधारणेचे नियोजन नसेल तर – गर्भनिरोधक पद्धती वापरा,
 • वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे
 • योग्य आहार
 • सामान्य बॉडी मास इंडेक्स – बीएमआय
 • चांगली विश्रांती
 • स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे प्रतिबंधात्मक तपासणी करणे
 • नजीकच्या भविष्यात गर्भधारणेची योजना आखत नसाल, तर अंडी गोठवून ठेवा

जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल, पाळी लवकर येत असेल, संभोगात अडचण असेल, उदराच्या किंवा श्रोणीच्या शस्त्रक्रियेचा इतिहास, उशीरा लग्न, गर्भधारणेची घाई, गर्भपात, संप्रेरक समस्या, क्षयरोगाचा इतिहास असल्यास लवकरात लवकर मदत घ्या.

आमचे स्थान

  Book an Appointment

  Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.