Bavishi Fertility Institute

एंडोमेट्रियॉसिस

गर्भाशयाच्या अंतःस्तराला एंडोमेट्रियम म्हणतात. हे अंतःस्तर दर महिन्यात विकसित होते आणि मासिक पाळी दरम्यान अंशतः गळते. अंतःस्तराच्या पेशी गर्भाशयाच्या बाहेर विकसित झाल्यास त्यास  एंडोमेट्रियॉसिस म्हणतात. ह्या पेशी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर येतात आणि मासिक पाळीत बाहेर टाकल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी क्षोभ निर्माण होते, उदराच्या अवयवांमध्ये आसंजक तयार होते आणि रक्तासारखे द्रव संकलित होऊन इतर लक्षणे निर्माण होतात.

एंडोमेट्रिओटिक घावाचे आकार छोट्या डागाच्या आकारापासून अंडाशयातील अनेक चॉकलेटसारख्या पुटीकांच्या आकारापर्यंत मोठे असू शकते. एंडोमेट्रियॉसिस अंडाशय, मूत्राशयासारख्या जवळच्या अवयवांना किंवा फुफ्फुसांसारख्या दूरच्या अवयवांना प्रभावित करू शकते.

लक्षणे

वेददायक मासीक पाळी (डिस्मेनोरिया) – मासिक पाळी दरम्यान वेदना, डिस्परेनिआ – लैंगिक संभोग दरम्यान वेदना आणि वंध्यत्व ही एंडोमेट्रियॉसिसची सामान्य लक्षणे आहेत. पेल्विक भागात तीव्र वेदना होण्याचे एंडोमेट्रियॉसिस हे एक सामान्य कारण आहे.

एंडोमेट्रियॉसिसद्वारे अंडाशय आणि नलिकांमध्ये आसंजन (ते एकत्र चिकटतात) तयार होते. यामुळे, अंडाशयाद्वारे ट्यूबमधून अंडी काढण्याची प्रक्रिया प्रभावित होते. एंडोमेट्रियॉसिसमध्ये वंध्यत्व होण्याचे हे एक कारण आहे.

एंडोमेट्रियॉसिस हा एक वाढत जाणारा आजार आहे आणि एंडोमेट्रियोटिक जखमांचे आकार आणि लक्षणे कालांतराने अधिक गंभीर रूप धारण करू शकतात.

एंडोमेट्रियॉसिस का होतो?

एंडोमेट्रियॉसिस होण्याचे नेमके कारण योग्यरित्या ज्ञात करता येत नाही.

एंडोमेट्रियॉसिसच्या वेगवेगळ्या सिद्धांतांत मासिक पाळीच्या काळात मासिक रक्ताचे प्रतिगामी वहन, स्वयंप्रतिकार यंत्रणा आणि कौटुंबिक प्रवृत्ती ह्या बाबी समाविष्ट असतात.

निदान

सोनोग्राफी 

सोनोग्राफीद्वारे एंडोमेट्रियॉसिसच्या काही प्रकारांचे निदान होऊ शकते. अंडाशयातील सर्वात सामान्य घाव म्हणजे एक पुटी असते, जी तिच्या द्रव रंगामुळे चॉकलेट पुटी म्हणून ओळखली जाते. सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना गर्भाशय आणि अंडाशय कमी मुक्ततेने हालचाल करत असल्याचे दिसू शकतात. तज्ञ डॉक्टर एंडोमेट्रियॉसिसचे लवकर निदान करू शकतात आणि रोगाच्या व्याप्तीचे अधिक तंतोतंत मूल्यांकन करू शकतात.

लॅपरोस्कोपी

उदरात ठेवलेल्या एन्डोस्कोपद्वारे पेल्विक अवयवाचे निरीक्षण करणे म्हणजे लॅपरोस्कोपी होय. ही एक शल्यक्रिया आहे, जिथे एंडोस्कोप संलग्न कॅमेराद्वारे नाभीच्या जवळ छोट्या छिद्रातून आतमध्ये टाकला जातो. आपण गर्भाशय, नलिका, अंडाशय इत्यादींचे निरीक्षण करू शकतो. लॅपरोस्कोपीद्वारे आपण या अवयवांची बायोप्सी घेऊ शकतो. तीव्रता आणि प्रसाराच्या आधारावर एंडोमेट्रियॉसिसला 4 वर्गांमध्ये विभागले जाऊ शकते : किमान, सौम्य, मध्यम आणि तीव्र.

लॅपरोस्कोपी केवळ निदानासाठीच नाही, तर रोगाच्या उपचारांसाठी देखील उपयोगी आहे.

एक सर्जन कॉटोरिझेशनद्वारे एंडोमेट्रिओटिकचे घाव विरघळवू शकतो. (विद्युत प्रवाह लागू करणे) सर्जन चॉकलेट पुटीसारखे एंडोमेट्रिओटिक घाव काढून टाकू शकतो. अवयवांमधील आसंजन संपवता येऊ शकते. ट्यूबल पेटंसी तपासली जाऊ शकते. लॅपरोस्कोपीबद्दल अधिक वाचा

कधीकधी सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या इतर तपासण्याही उपयुक्त ठरतात.

उपचार

लक्षणांच्या स्वरूप आणि व्याप्तीवर,  मूल प्राप्तीची इच्छा आणि डिंबग्रंथी साठ्याच्या क्षमतेवर उपचाराची प्रक्रिया अवलंबून असते.

गर्भधारणा आणि स्तनपान करून एंडोमेट्रियॉसिस मोठ्या प्रमाणात कमी केले जाऊ शकते, कारण या परिस्थिती मासिक पाळीला तात्पुरते थांबवतात.

गर्भवती होण्याची योजना आखणाऱ्या महिलांमध्ये

जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल, तर तुम्ही तुमच्या गर्भधारणेची योजना आधीच आखली पाहिजे.

एंडोमेट्रियॉसिसचे काही परिणाम झालेही, तर ते परिणाम गर्भधारणा आणि मुलाच्या विकासावर कमीतकमी असतात;  जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल, तर एंडोमेट्रियॉसिस काढून टाकणे केवळ तेव्हाच सुचवले जाते, जेव्हा तुम्हाला नैसर्गिकरित्या गर्भवती होण्यास त्रास होत असेल.

लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया हा शस्त्रक्रियेचा सर्वोत्तम प्रकार आहे, कारण यामुळे तुम्हाला रोगाच्या व्याप्तीचे स्पष्ट स्वरूप सांगितले जाते. गंभीर स्वरूपाच्या एंडोमेट्रियॉसिस शस्त्रक्रिया करण्यासाठी उच्च स्तरीय कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतो.

एंडोमेट्रियॉसिसची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. म्हणून, शस्त्रक्रियेनंतर तुम्ही सर्वोत्तम परिणामासाठी शक्य तितक्या लवकर गर्भधारणेची योजना आखली पाहिजे.

पुटीसह काही सामान्य डिम्बग्रंथि ऊती काढून टाकल्यामुळे आणि शल्यक्रियेसाठी विद्युतधारा वापरल्याने कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया अंडाशयाचे नुकसान करू शकते. अशाप्रकारे, शस्त्रक्रियेपूर्वी अंड्यांचे मुल्यांकन अत्यावश्यक आहे. जर अंड्यांची संख्या कमी असेल, तर आयव्हीएफ हा एक चांगला उपचार पर्याय असू शकतो. आयव्हीएफपूर्वी एंडोमेट्रियॉसिस काढण्याची आवश्यकता नाही, कारण यामुळे आयव्हीएफच्या यशाच्या दरावर परिणाम होत नाही. आयव्हीएफ बद्दल अधिक वाचा

गर्भवती होण्याची योजना नसणाऱ्या महिलांमध्ये

जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत नसाल किंवा तुमचे कुटुंब पूर्ण झाले असेल, तर  एंडोमेट्रियॉसिसच्या प्रमाणाच्या आधारावर वैद्यकीय किंवा शल्यचिकित्सा करण्याची शिफारस केली जाते.

वैद्यकीय उपचार

वेदनाशामक: वेदनेपासून मुक्त होण्यासाठी अ‍ॅस्पिरिन, इबुप्रोफेन किंवा मेफेनॅमिक अॅसिडसारख्या साध्या वेदनशामकांच्या सेवनास प्राधान्य दिले जाते.

जीएनआरएच अ‍ॅनालॉग्स: ते गोनाडोट्रोपिनच्या स्त्रवण्याला रोखतात आणि अंडाशयातून इस्ट्रोजेन स्त्रवणे थांबते. जीएनआरएच अ‍ॅनालॉग्समुळे कृत्रिम रजोनिवृत्ती होईल. एकदा तुम्ही औषध घेणे बंद केल्यास, मासिक पाळी सामान्यत: पुनर्संचयित होते. जीएनआरएच अ‍ॅनालॉग्सचे उष्ण फ्लश, योनीचा कोरडेपणा, हाडे कमकुवत होणे यांसारखे अनावश्यक साइड इफेक्ट्स आहेत. औषधोपचार थांबल्यानंतर या इंजेक्शनचे बरेचसे दुष्परिणाम पूर्णपणे कमी करता येण्यासारखे आहेत. हाडांच्या सामर्थ्यासाठी  कॅल्शियम आणि अ‍ॅड-बॅक थेरपीच्या इतर प्रकारांची शिफारस केली जाऊ शकते.

डायनेजस्ट: हे एक कृत्रिम प्रोजेस्टेरॉन आहे, ज्यात तुलनेने चांगली सुरक्षा मिळते. हे जीएनआरएच अ‍ॅनालॉग्स इतकेच प्रभावी असल्याचे बऱ्याच अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

शस्त्रक्रिया: पारंपारिकपणे, ही शस्त्रक्रिया गर्भधारणेची योजना आखणार्‍या महिलांसाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसारखीच असते. गंभीर प्रकरणांमध्ये गर्भाशय किंवा अंडाशय काढून टाकणे आवश्यक असू शकते.

एडेनोमायोसिस

एडेनोमायोसिस हा एंडोमेट्रियॉसिस सारखा एक आजार आहे. यामध्ये गर्भाशयाच्या स्नायूच्या थरात एंडोमेट्रियल ऊती विकसित होते. मासिक पाळीचे रक्त या स्नायूच्या थरातून बाहेर निघू शकत नाही. यामुळे हा थर फुगतो आणि जाड होतो.

वेदनादायक मासिक चक्र आणि मासिक पाळीचा जोरदार रक्तप्रवाह ही या आजाराची लक्षणे आहेत. एडेनोमायोसिसमुळे भ्रूण रोपण होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि वंध्यत्व व गर्भपात होऊ शकते.

एडेनोमायोसिस प्रसरण पावू शकतो आणि त्यामुळे गर्भाशयाच्या संपूर्ण भागावर प्रभाव पडू शकतो आणि अर्बुद (एडेनोमा) तयार होतो.

यावरील वैद्यकीय उपचार एंडोमेट्रियॉसिससारखेच आहे. अर्बुदांना शल्यक्रियेद्वारे काढून टाकले जाऊ शकते. तथापि, बहुतेक प्रकरणांमध्ये गर्भाशयाला जपून ठेवणार्‍या शस्त्रक्रिया फार चांगले परिणाम देत नाहीत. गंभीर स्वरुपात गर्भाशय काढण्याचीशी आवश्यकता असू शकते.

उत्कृष्ट परिणाम मिळावेत म्हणून एडेनोमायोसिसच्या उपचारांसाठी आम्ही विशेष वंध्यत्व आयव्हीएफ प्रोटोकॉल विकसित केले आहेत.

 

बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटचा फायदा

आमचे अनुभवी डॉक्टर एंडोमेट्रियॉसिसचे आधीच निदान करु शकतात. रोगाचे आणि अंडाशयातील अंड्यांचे प्रमाण तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचार निर्धारित करण्यात आम्हाला मदत करतात. रोगाच संपूर्ण नायनाट करण्यासाठी आमच्याकडे अद्वितीय शल्यचिकित्सक कौशल्य आहे. आमच्या विशेष प्रोटोकॉलमुळे आम्हाला गंभीर एडेनोमायोसिस आणि एंडोमेट्रियॉसिस असलेल्या रूग्णांमध्येही आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करण्यात मदत झाली आहे.

आमचे स्थान