प्रत्येक जोडप्याला त्यांचे स्वतःचे अनुवांशिक बाळ असावे असे वाटते. ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आणि इच्छा असते. तरीही, असे प्रत्येकच वेळा घडणे शक्य नसते आणि म्हणून मग जोडप्यांना दात्यांच्या अंड्यांचा, शुक्राणूंचा किंवा भ्रुणांचा आधार घ्यावा लागतो.
बीएफआय दात्यांच्या जनजपेशींना गर्भधारणा यशस्वी करण्यासाठीचा शॉर्टकट पर्याय म्हणून समजत नाही. तर आम्ही जोडप्यांना उपलब्ध असलेले सर्व पर्याय प्रदान करतो आणि जेव्हा काहीही पर्याय शिल्लक नसेल तेव्हाच आम्ही दात्यांच्या सेवा वापरण्याचे त्यांना सुचवतो. दात्यांच्या जनजपेशींचे वापर केल्याने काय नुकसान आणि लाभ होतील यांविषयी आम्ही त्यांचे समुपदेशन करतो आणि अगदी जागरूकतेने निवड करण्याची परवागनी देतो.
दोन्ही जोडप्यांच्या सज्ञान संमतीशिवाय बीएफआय दात्यांच्या जनजपेशींचे वापर करत नाही. अखेरीच, जन्मास येणारे बाळ हे त्या दोघांचे असणार असते.
हे कारण आहेत, की ज्यामुळे जोडप्यांनी फर्टिलिटी क्लिनिकची निवड अतिशय सावधतेने करावी. विशेषकरून, जेव्हा दात्यांच्या अंड्यांच्या अथवा शुक्राणुंच्या वापराची बाब असते, तेव्हा तर अतिशय सावधता बाळगली जावी.
जेव्हा तुम्हाला दात्यांच्या सेवांना वापरायचे असते, तेव्हा ते करणे अतिशय सोपे आणि सरळ असते. या प्रक्रियालाच तृतीय पक्ष एआरटी – आयव्हीएफ असेही म्हणतात. ज्याअर्थी यामध्ये तृतीय पक्षाचा उपयोग होतो, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत एका तिसऱ्या बाजूचाही समावेश होतो. हा एक भावनिक निर्णयही आहे. आम्ही इथे तुमची मदत करायाला आणि अपेक्षित परिणाम द्यायला आहोत. तुम्हाला निरोगी बाळ व्हावे यासाठी मदत करण्यासाठी आम्ही इथे आहोत.
आम्हाला माहित आहे, की जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी दात्याची निवड करता, तेव्हा तुम्ही बाजारातून एखादे उत्पाद खरेदी करत नसता, तर तुम्ही तुमच्या पुढील पिढीला निर्माण करत असता. अनेक वर्षांचे आणि हजारों दात्यांच्या सायकल्सचे अनुभव आमच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या अपेक्षांना, चिंतांना, भीतीला आणि बऱ्याच गोष्टीना समजतो आणि त्यांचा आदर करतो. दात्यांच्या सेवांबद्दल जेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास करता, तेव्हा आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम दात्याची निवड करतो. तुमची उंची, वजन, त्वचेचा रंग, डोळ्यांच्या रंग यांना आम्ही तिच्या/त्याच्याशी काळजीपूर्वक जुळवून बघतो. अगदी एकसमान दिसणारे दोन व्यक्ती नसतातच, पण तरीही जास्तीत जास्त समानता प्राप्त व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतो. जर जोडप्यांना काही विशेष हवे असेल किंवा त्यांची काही विशिष्ट गरज असेल, जसे की, वांशिकता, दिसणे, जात, भौतिक वैशिष्ट्ये, शिक्षण इ., तर त्यासुद्धा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो.
स्त्रीबीजांडदान हे एक सहाय्यक प्रजनन तंत्र आहे, ज्यामध्ये निरोगी आणि तरुण स्त्रीबीजांड दात्याकडून मादी जनजपेशी (अंड) पुरवली जाते. दात्याच्या अंड्याचे रुग्णाच्या पतीच्या शुक्राणूद्वारे फलन करून एक आयव्हीएफ- इन व्हिट्रो फर्टीलायझेशन प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर निर्माण झालेले भ्रुण रुग्णाच्या गर्भाशयात टाकले जाते. रुग्ण स्वतःहून गर्भधारणा करते. गर्भधारणा,प्रसूती आणि स्तनपान आदींचे अनुभव नैसर्गिक गर्भधारणेसारखेच असतात.
वयाचा गर्भाशयावर प्रभा पडत नाही.स जर शरीरयष्टी चांगली असेल, तर एक स्त्री तिच्या कोणत्याही वयात, एव्हाना रजोनिवृत्तीच्या अनेक वर्षानंतरही दात्याच्या अंड्याद्वारे गर्भ धारण करू शकते. परंतु, अधिक वयात असे उपचार सुरु करण्याआधी बऱ्याच गोष्टी विचारत घेणे गरजेचे असते.
यापैकी काही रुग्ण त्यांच्या स्वतःच्या अंड्यांद्वारे गर्भधारणा प्राप्त करू शकतात; यासाठी डिंबग्रंथी पुनरुज्जीवन व दुहेरी उत्तेजन तंत्राची मदत घेता येते. अतिशय मूल्यवान असलेल्या अंड्याची काळजी घेतल्यानेही मोठा फरक जाणवू शकतो. काही विशिष्ट प्रकरणात, स्त्रीबीजांडदान हा एकमेव पर्याय उपयोगी ठरू शकतो.
पिजीएस/पिजीडी, पिजीटी-ए, पिजीटी-एम, पिजीटी-एसआर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रूणाचे गर्भाशयात हस्तांतरण करण्यापूर्वीच अशा अनुवांशिक रोगांचे संक्रमण टाळता येऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, धोका असलेली स्त्रीसुद्धा एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकते. दुर्दैवाने, हे तंत्रज्ञान अतिशय महागडे आहे. ते सर्व नाही, पण बहुतांश रोगांचे निदान करू शकते. म्हणूनच, अशा परिस्थितीत फारच थोड्या स्त्रियांना दात्यांच्या अंड्यांचा पर्याय निवडावा लागतो.
सहसा अंडदान सायकल्स दात्याच्या ताज्या अंड्याद्वारे पार पाडल्या जातात. जर रुग्णाला तातडीची गरज असेल, तर तेव्हा अंड्याच्या पुरवठा व्हावा म्हणून आमच्याकडे गोठवलेल्या अंडीही तयार असतात. त्यासाठी म्हणून भ्रुण/ब्लास्टोसिस्ट ताज्या स्वरूपातच हस्तांतरित केले जाता किंवा गोठवून ठेवले जातात आणि गरज असल्यावर त्वरित हस्तांतरित केले जातात.
दात्यांची निवड करण्यासाठी बीएफआयमध्ये वाट बघावी लागत नाही, कारण आमच्याकडे आधीच दात्यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असते.
प्रथम पायरी म्हणून, सर्वांत आधी साधारण गोळ्यांच्या माध्यमातून दात्याच्या व रुग्णाच्या (स्वीकारक) मासिक पाळीला समकालीत केले जाते.
आयव्हीएफ उपचारासाठी दाता मानक उत्तेजन प्रक्रियेतून जातो; भ्रुणाला स्वीकारण्यासाठी गर्भाशयाला तयार करण्याच्या उद्देशाने स्वीकारक काही गोळ्यांचे सेवन करते.
एकदा गर्भाशय आणि अंडी तयार झाल्या, की मग दात्याकडून अंड संकलन करण्याचे नियोजन केले जाते. दात्याकडून संकलित केलेल्या अंड्यांचे रुग्णाच्या पतीच्या शुक्राणूद्वारे आयसीएसआयचे वापर करून फलन केले जाते.
भ्रुणांची निवड करून रुग्णाच्या गर्भाशयात हस्तांतरण केले जाते. जर आपल्याकडे अतिरिक्त भ्रुण असतील, तर आपण त्यांना गोठवू शकतो आणि जोडप्यांना त्यामुळे पुन्हा भ्रुण हस्तांतरणाची संधी मिळू शकते.
प्रत्येक गरजेनुसार अनुकूलता प्रदान करण्यासाठी या मानक उपचारात विविध सुधारणा करणे शक्य आहे.
बीएफआय प्रत्येकाला परवडणारे, पैशाची योग्य किंमत करणारे व इष्टतम परिणाम देणारे अंडदान उपचाराचे विविध पॅकेज उपलब्ध करवते. दात्याची गुणवत्ता, ब्लास्टोसिस्टच्या संख्यांची व गुणवत्तेची हमी आणि शेवटी यशाच्या शक्यता या दृष्टीने येणाऱ्या खर्चाविषयी जोडप्यांनी समजून घेणे आवश्यक असते.
तरुण जननक्षम दात्याकडून अंडी घेण्यात येत असल्यामुळे गर्भधारणेच्या शक्यता अधिक असतात, गर्भपाताच्या शक्यता कमी असतात आणि बाळामध्ये अनुवांशिक आजार होण्याच्या शक्यताही खूप कमी असतात.
उपचाराची गोपनीयता पाळली जाते. स्त्री मातृत्वाच्या नात्याचा आणि आनंदाचा संपूर्ण लाभ घेते आणि वडील त्याचे शुक्राणू देतो. जर अंड दानासाठी जोडपे मानसिकरित्या तयार असेल, तर पालकत्वाचा आनंद अनुवांशिक स्त्रोतालाही महत्त्व प्रदान करते.
सर्वात मोठी नुकसानकारक बाब म्हणजे स्त्री जनजपेशीचे बाह्य अनुवांशिक स्त्रोत. दात्याच्या उपचारासाठी अतिरिक्त खर्च येऊ शकतो.
आमचा व्यापक अंडदान कार्यक्रम प्रत्येक जोडप्याला त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम दाता मिळवून देण्यात मदत करतो आणि यासाठी कोणतीही वाट बघावी लागत नाही. आमच्याकडे गोठलेल्या अंड्यांच्या साठाही उपलब्ध आहे.
भारतातील अंडदान उपचाराच्या आमच्या व्यापक अनुभवामुळे आम्हाला सर्वोत्तम यश आणि अंतिम समाधान प्रदान करण्यास मदत मिळते. सुरक्षा कवच पॅकेजसह विविध किमतींच्या पॅकेजेसमधून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता.
या आणि पालकत्वाच्या आनंदाला शोधा. बीएफआयमध्ये पालकत्व साधे, सुरक्षित, स्मार्ट आणि यशस्वी आहे.
शुक्राणू दान म्हणजे वीर्यसेचन, आययुआय किंवा आयव्हीएफ आयसीएसआयच्या माध्यमातून गर्भधारणा प्राप्त करण्यासाठी दात्याच्या शुक्राणूचा वापर करणे.
ज्यांच्या वीर्यात शुक्राणू नसतात असे अनेक पुरुषसुद्धा टीईएसए, पीईएसए, टीईएसई, मायक्रो टीईएसई अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या स्वतःच्या शुक्राणूद्वारे स्वतःच्या बाळाला जन्म देऊ शकतात. तरीपण, हे नेहमीच शक्य नसते किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचे खर्च परवडणारे नसते, त्यामुळे यावर पर्याय म्हणून शुक्राणू दानाचा पर्याय निवडता येऊ शकतो.
कमी शुक्राणू – ओलीगोस्पर्मिया असणारे, कमी हालचालीचे शुक्राणू – एस्थेनोस्पर्मीया असणारे, सामान्य शुक्राणूंची संख्या कमी – टेराटोस्पर्मिया असणारे पुरुषही साधारण उपचाराने आपल्या बाळाला जन्म देऊ शकतात. पण असे नेहमीच होते असे नाही. जर वरील परिस्थिती अतिशय गंभीर असल्या किंवा शुक्राणू १००% अविचल असले, डीएनएचे मोठ्या प्रमाणात विखंडन झाले असले, आयव्हीएफ सायकल्समध्ये पुन्हापुन्हा वाईट फलन किंवा भ्रुण तयार होत असले, गंभीर आजारांची लागणा असेल किंवा शुक्राणूची जननक्षमता कमी करणारे औषध घेतले जात असेल, तर अशा प्रसंगी आयव्हीएफ आयसीएसआय आयएमएसआय पीआयसीएसआय हे नवीन तंत्रज्ञान नक्कीच उपयोगी पडू शकते. जर हे पर्याय निवडणे शक्य नसेल किंवा त्यात यश मिळाले नसेल, किंवा या आधुनिक तंत्रज्ञानाचा खर्च परवडण्यासारखा नसेल, तर तुम्ही शुक्राणू दानाचा पर्याय निवडू शकता.
काही पुरुषांमध्ये त्यांच्या शुक्राणूद्वारे काही अनुवांशिक रोग बाळाकडे संक्रमित होण्याचा धोका असतो.
पिजीएस/पिजीडी, पिजीटी-ए, पिजीटी-एम, पिजीटी-एसआर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रूणाचे गर्भाशयात हस्तांतरण करण्यापूर्वी अशा अनुवांशिक रोगांचे संक्रमण टाळता येऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, धोका असलेला पुरुषसुद्धा एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकतो. दुर्दैवाने, हे तंत्रज्ञान अतिशय महागडे आहे. ते सर्व नाही, पण बहुतांश रोगांचे निदान करू शकते. म्हणूनच, अशा परिस्थितीत काही पुरुषांना दात्यांच्या शुक्राणूंचा पर्याय निवडावा लागतो.
शुक्राणूदान सहसा ताज्या किंवा गोठलेल्या वीर्याद्वारे पार पाडले जाते. शुक्राणू दात्याला संबंधांच्या व संपर्काच्या बाहेर ठेवले जाते. शुक्राणू दान योनीमार्गे वीर्यसेचन, गर्भाशयाअंतर्गत वीर्यसेचन-आययुआय करून किंवा आयव्हीएफ+आयसीएसआयद्वारेही करता येते.
बीएफआयमध्ये दात्याच्या उपलब्धतेसाठी वाट बघावी लागत नाही, कारण आमच्याकडे दात्यांच्या गोठवलेल्या शुक्राणूंचे विपुल साठे उपलब्ध असतात. जोडपं ज्या उपचारातून जात आहे, त्यानुसार दात्याच्या शुक्राणूचे उपचार प्रक्रियेदरम्यान वीर्यसेचनासाठी किंवा फलनासाठी वापर केले जाते.
प्रत्येकाच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने म्हणून बीएफआय विविध गुणवत्तेचे शुक्राणू दाते उपलब्ध करवून देते.
उत्तम गुणवत्तेचे वीर्य असलेल्या तरुण जननक्षम दात्याकडून शुक्राणू घेण्यात येतात. त्यामुळे गर्भधारणेच्या शक्यता अधिक असतात. उपचाराची गोपनीयता पाळली जाते. स्त्री मातृत्वाच्या नात्याचा आणि आनंदाचा संपूर्ण लाभ घेते. जर शुक्राणू दानासाठी जोडपे मानसिकरित्या तयार असेल, तर पालकत्वाचा आनंद अनुवांशिक स्त्रोतालाही महत्त्व प्रदान करते.
सर्वात मोठी नुकसानकारक बाब म्हणजे पुरुष जनजपेशीचे बाह्य अनुवांशिक स्त्रोत. दात्याच्या उपचारासाठी अतिरिक्त खर्च येऊ शकतो.
आमचा व्यापक शुक्राणूदान कार्यक्रम आणि आमची एआरटी बँक प्रत्येक जोडप्याला त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम दाता मिळवून देण्यात मदत करतो आणि यासाठी कोणतीही वाट बघावी लागत नाही. आमच्याकडे गोठलेल्या वीर्याचा तयार साठाही उपलब्ध आहे.
भारतातील शुक्राणूदान उपचाराच्या आमच्या व्यापक अनुभवामुळे आम्हाला सर्वोत्तम यश आणि अंतिम समाधान प्रदान करण्यास मदत मिळते. विविध किमतींच्या पॅकेजेसमधून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता.
या आणि पालकत्वाच्या आनंदाला शोधा. बीएफआयमध्ये पालकत्व साधे, सुरक्षित, स्मार्ट आणि यशस्वी आहे.
जेव्हा स्त्रीचे गर्भाशय आणि आरोग्य सामान्य असते आणि ती यशस्वी गर्भधारणा करण्यास सक्षम असते, पण तिच्याकडे योग्य दर्ज्याची अंडी नसतात, तेव्हा तिला अंडदान/स्त्रीबीजांड दान उपचाराची गरज असते.
अशा जोडप्यामध्ये कधी कधी पुरुष जोडीदारालाही शुक्राणूदान किंवा वीर्य दानाची आवश्यकता पडते. जेव्हा अंडी आणि शुक्राणू अशा दोन्ही गोष्टी दात्याकडून घेतल्या जातात, प्रत्येक आयव्हीएफ प्रयोगशाळेत भ्रुण निर्मिती केली जाते आणि स्त्री जोडीदाराच्या गर्भाशयात हस्तांतरित केली जाते, तेव्हा अशा प्रक्रियेला भ्रुणदान उपचार म्हटले जाते. येथील आयव्हीएफ प्रक्रिया अंडदान प्रक्रीयेसारखीच अआहे.
तरून आणि चाचणीत सामान्य असलेल्या दात्यांची निवड केली जाते.
सर्व अंड दाते विवाहित असावेत आणि त्यांना किमान एक जिवंत बाळ असावे. त्यांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
आम्ही दात्याचा वैद्यकीय, कौटुंबिक व वैयक्तिक इतिहास तपासतो. आम्ही तिचे वजन, उंची आणि रक्तदाब सामान्य आहे की नाही हेही तपासतो.
दात्याचे सर्वांगीण आरोग्य तपासण्यासाठी आमचे डॉक्टर पुरेपूर वैद्यकीय तपासणी करतात. डिंबग्रंथी साठा, इतर काही प्रजननात्मक अथवा स्त्रीआरोग्यविषयक समस्या तपासण्यासाठी आमचे फर्टिलिटी तज्ज्ञ थ्री-डी अल्ट्रासाऊंड करतात.
पात्र दात्यांना ब्लड काउंट आणि ब्लड शुगर मोजण्यासाठी रक्त चाचण्यातून तसेच लिव्हर, किडनी व सामान्य तब्येतीचे परीक्षण करण्यासाठी तपासणीतून जावे लागते.
एसटीडींचा धोका टाळण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.
सामान्य अनुवांशिक दोष तपासण्यासाठी दात्याची चाचणी होते.
आमची स्वतःची टीम दात्याची सखोल वैयक्तिक मुलाखत घेते. दात्याला संपूर्ण प्रक्रिया कळलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुल्यांकन करतो. दात्याची समजून घेण्याची व संतुलित निर्णय घेण्याची क्षमता समजून घेण्यासाठी आम्ही मूल्यमापन करतो.
आमची टीम दात्याच्या कौटुंबिक इतिहासाचा सखोल अवलोकन करते.
दात्यात सामान्य अनुवांशिक परिस्थिती तपासण्यासाठी परीक्षण केले जाते; जोडप्याच्या इच्छेनुसार काही अतिरिक्त चाचण्या करणेही आम्हाला शक्य आहे.
बाविशी फर्टिलिटी इन्स्टिट्यूटमध्ये भ्रुण दानाची प्रक्रिया सहसा दात्याच्या ताज्या अंड्यांच्या व ताज्या/गोठलेल्या शुक्राणूंद्वारे पार पाडली जाते.
जर रुग्णाला तातडीची गरज असली किंवा भ्रुण निवडीचे विस्तृत पर्याय हवे असले, तर अशावेळी योग्य सोय म्हणून आमच्याकडे गोठवलेले भ्रुणही संग्रहित असतात.
WhatsApp us