आयव्हीएफच्या यशातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे सामान्य गर्भधारणेसाठी सर्वोत्तम भ्रुण निवडणे. भ्रूण रोपण न होण्याचे सर्वसामान्य कारण म्हणजे भ्रुणांमधील अनुवांशिक विकृती असते.
कोणते भ्रुण योग्य आहे याचा अंदाज लावण्यासाठी खूप चांगले देखरेख मापदंड उपलब्ध आहेत. या मापदंडांमध्ये भ्रुण गुणवत्ता, भ्रुण विकासाची गती, अंड्यांची गुणवत्ता इत्यादींचा समावेश होतो. तरीही, यासाठी चांगल्या तंत्रांची आवश्यकता आहे.
ब्लास्टोसिस्टच्या टप्प्यापर्यंत आयव्हीएफ प्रयोगशाळेत भ्रुणांचे संवर्धन करणे – ब्लास्टोसिस्ट संवर्धन आणि रोपणपूर्व अनुवांशिक चाचणी – पीजीएस- पीजीटी – ए, हे दोन सर्वोत्तम पर्याय आहेत. पीजीएसपेक्षा ब्लास्टोसिस्ट कल्चरचे बरेच फायदे आहेत. ते भ्रुणांसाठी कमी घातक, सोपे आणि सोबतच कमी खर्चिक आहे. भ्रुणांच्या वास्तविक अनुवांशिक संरचनेबद्दल ते काही सांगू शकत नाही, हीच एक मर्यादा आहे.
जेव्हा भ्रुण ५ ते ६ दिवसांचे होते, तेव्हा ते विकासाच्या त्या टप्प्यावर पोहचते, ज्यास ‘ब्लास्टोसिस्ट’ असे म्हणतात. नैसर्गिक गर्भधारणेच्या वेळी शुक्राणू स्त्रीबीजवाहक नलिकेत अंड्याचे फलन करतो. त्यानंतर त्या नलिकेतच भ्रुण विकसित होतो आणि मग हळूहळू गर्भाशयाकडे वळतो. फलनाच्या ४ ते ६ दिवसांनी भ्रुण ब्लास्टोसिस्ट टप्प्यातच असताना गर्भाशयमध्ये – एंडोमेट्रियममध्ये पोहचते.
विकासाच्या 2 किंवा 3 ऱ्या दिवसाला चांगले दिसणारे सर्व भ्रुण नंतर पुढे विकसित होऊ शकत नाहीत. जर आपण त्यांना अजून काही दिवस संवर्धित केले, तर त्यांपैकी केवळ चांगल्या प्रतीचे गर्भच अधिक विकसित होऊ शकतात आणि यशस्वीपणे ब्लास्टोसिस्ट टप्प्यापर्यंत पोहोचू शकतात. उरलेले भ्रुण दरम्यानच्या काळात विविध टप्प्यावर विकसित होण्यापासून थांबतात. ब्लास्टोसिस्ट टप्प्यात कोणते भ्रुण पोहोचतील हे माहित करणे अशक्य आहे.
आपण एक किंवा दोन ब्लास्टोसिस्ट निवडू शकतो आणि हस्तांतरित करू शकतो आणि तरीही, आपण चांगली गर्भधारणा साध्य करू शकतो. याला ब्लास्टोसिस्ट संवर्ध (कल्चर) असे म्हणतात.
प्रत्येक उपचार चक्रात इष्टतम परिणाम मिळवण्यासाठी आम्ही “बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूट” मध्ये ‘ब्लास्टोसिस्ट संवर्ध’ ला प्रोत्साहित करतो.
WhatsApp us