शुक्रपेशीहीनता म्हणजे स्खलित वीर्यात शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव असणे. अर्थातच, यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व येते, कारण शुक्राणूंच्या अभावामुळे फलन शक्य नसते. यामुळे, एका विश्वासार्ह प्रयोगशाळेत किमान तीन शुक्राणू चाचण्यांच्या साहाय्याने यासंबंधी तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
बीएफआयकडे शुक्रपेशीहीनता असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्याचा आणि त्यांच्या स्वतःच्या शुक्राणूंद्वारे त्यांना वडील होण्यासाठी मदत करण्याचा अतिशय व्यापक अनुभव आहे. या समस्येवरील उपचारात अगदी दुर्मिळातील दुर्मिळ व कठीण यशाच्या शक्यतांना प्राप्त करण्यासाठी अतिशय वैयक्तिकृत व गरजेनुसार उपचार प्रदान केले जाते. प्रत्येक रुग्णांसाठी त्याच्या उपचाराचे यश वाढावे म्हणून वैद्यकीय, शल्यचिकित्सात्मक, आयव्हीएफ आयसीएसआय किंवा संयुक्त उपचार अनुककुलित केले जातात.
पौरुषत्व, दाढीची सामान्य वाढ, मिश्या, अंगसंरचना, स्नायू इ. किंवा सामान्य लैंगिक कामगिरी – संभोग म्हणजे शुक्राणूंची संख्या सामान्य असेलच असे नाही. केवळ वीर्याची सूक्ष्म तपासणी केल्यानंतरच वीर्यामध्ये शुक्राणूंचे अस्तित्व आहे की नाही याचे निदान होऊ शकते.
शुक्रपेशीहीनता असलेले बरेच पुरुष त्यांच्या स्वतःच्या शुक्राणूंनी स्वत: च्या अपत्यांचे वडील बनतात. एकदा शुक्रपेशीहीनता असल्याचे निदर्शनास आले, की मग त्याची कारणे शोधून काढणे आणि औषधे, शस्त्रक्रिया किंवा एआरटी – आयव्हीएफ आणि आयसीएसआयद्वारे उपचाराच्या शक्यतांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी केंद्रात योग्य निदान आणि उपचार होणे महत्त्वपूर्ण आहे.
कौटुंबिक नियोजनासाठी स्वेच्छेने व जाणीवपूर्वक नसबंदी (व्हेसेक्टॉमी) केलेले पुरुषसुद्धा बंद झालेली शुक्रवाहिनी उघडून किंवा आयव्हीएफ व आयसीएसआयद्वारेही त्यांची जननक्षमता परत मिळवू शकतात.
दोन्ही अंडकोषांच्या बायोप्सीसह संपूर्ण निदान होईपर्यंत अझोस्पर्मियावर ‘उपचार शक्य नाही’ असे म्हटले जाऊ शकत नाही.
शुक्रपेशीहीनतेचे निदान वंध्यत्व समुपदेशनाच्या वेळी केले जाते, ज्यामध्ये स्पर्मोग्रॅमचा पद्धतशीर वापर केला जातो. या परीक्षणात स्खलित वीर्यात समाविष्ट घटकांचे विश्लेषण व विविध मापदंडांचे मुल्यांकन केले जाते आणि मिळालेल्या परिणामांची डब्ल्यूएचओद्वारे स्थापित मानकांशी तुलना केली जाते.
शुक्रपेशीहीनतेच्या संदर्भात संपूर्ण वीर्याचे अपकेंद्रण केल्यावर त्यात एकही शुक्राणू आढळत नाही. तरीही, निदान करण्यासाठी म्हणून प्रत्येक तीन महिन्याने अजून एक किंवा दोन स्पर्मोग्रॅम चाचण्या करणे आवश्यक असते, कारण शुक्रपेशीजननाचे चक्र जवळपास ७२ दिवसांचे असते. सलग २ ते ३ शुक्रपेशीजनन चक्रानंतर जर शुक्राणू तयार नाही झाले, तर मग शुक्रपेशीहीनतेचे निदान केले जाईल.
निदानाचे परिष्करण करण्यासाठी आणि अझोस्पर्मियाचे कारण ओळखण्याचे प्रयत्न करण्यासाठी विविध अतिरिक्त परीक्षा घेण्यात येतील :
सुदैवाने, आमच्याकडे औषधे म्हणून संप्रेरके उपलब्ध आहेत, जी संप्रेरकाच्या कमतरतेच्या वेळी प्रतिस्थापन करण्यासाठी किंवा पूरक म्हणून दिली जाऊ शकतात.
ते किमान ३ महिन्यांसाठी दिले जातात आणि त्यानंतर होणाऱ्या प्रगतीनुसार नंतरही दिले जाऊ शकतात.
योग्यरित्या निवडलेल्या रूग्णांमध्ये हे उत्कृष्ट परिणाम दर्शवतात.
यामुळे शुक्राणूंचे सामान्य व नैसर्गिक उत्पादन स्थापित केले जाते.
मनुष्य नैसर्गिक संभोगाद्वारे नैसर्गिकरित्या गर्भधारण करण्यास मदत करू शकतो.
जेव्हा उपचार थांबते, तेव्हा बाह्य संप्रेरकांवर आधारित शुक्राणू उत्पादनही थांबते.
वीर्य गोठवता येते. भविष्यात जेव्हाही विचार होईल, तेव्हा ह्या वीर्याचा वापर केला जाऊ शकतो.
जर आवश्यकता असली, तर उपचार परत केले जाऊ शकते.
बीएफआयने अशा अनेक रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत आणि अनेक वडिलांना नैसर्गिक पुत्रप्राप्तीसाठी मदत केली आहे.
उपचाराचा इतिहास, परीक्षण आणि सेमन कल्चर चाचणीद्वारे संसर्गाचे निदान केले जाऊ शकते.
संसर्गाच्या औषध संवेदनशीलतेचे निदान केले जाऊ शकते.
योग्य औषधाचा दीर्घकाळ प्रयोग केल्याने संसर्ग बरा होण्यास मदत होऊ शकतो.
शुक्रवाहिनी (वास डेफरन्स) एक खूप लांब आणि पातळ नळी असते, जी शुक्राणूंना अंडकोषांपासून वीर्यापर्यंत नेते.
शुक्रवाहिनी तिच्या संपूर्ण लांबीमध्ये कोठेही अवरोधित केली जाऊ शकते. म्हणूनच अवरोधाचे अचूक स्थान शोधणे फार अवघड आहे.
योग्य शस्त्रक्रियेसाठी शुक्रवाहिनीच्या बहुतेक भागात पोहोचणे देखील कठीण आणि धोकादायक असते.
शुक्रवाहिनी कदाचित उघडलीही गेली, तरी तिच्यातील नुकसान करणाऱ्या अवरोधामुळे चांगले परिणाम मिळत नाहीत.
ही एक मोठी सुव्यवस्थित शस्त्रक्रिया असून, तिच्यासाठी अपवादात्मक कौशल्य आणि अनुभव आवश्यक असते.
ही प्रक्रिया मायक्रोस्कोपच्या खाली सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या आधारे करावी लागते.
आयव्हीएफ आयसीएसआयच्या आगमनाने आणि उत्कृष्ट यशानंतर या प्रक्रियेला शल्यक्रिया सुधारण्यापेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते.
ज्या रुग्णांनी स्वैच्छिक नसबंदी (वेसॅक्टॉमी) केली आहे, तेसुद्धा या प्रक्रियेचा लाभ घेऊ शकतात आणि चांगल्या शस्त्रक्रियेसह उत्कृष्ट परिणाम मिळवू शकतात.
अंडकोषातील नसांच्या विस्फारणाला (फुटण्याला) ‘व्हॅरिकोसेल’ असे म्हणतात. व्हॅरिकोसेलमुळे क्वचितच शुक्रपेशीहीनता होते. तरीही, योग्यरित्या निवडलेल्या रूग्णांमधील स्थूल व्हॅरिकोसेलची शल्यक्रियेद्वारे सुधारणा केल्यास शुक्राणूच्या पुनर्प्राप्तीची शक्यता वाढू शकते.
काही पुरुषांमध्ये अंडकोष त्यांच्या अंतिम स्थानावर म्हणेज वृषणकोश पोहोचलेले नसतात. ते वंक्षण नलिकेत किंवा किंवा उदरात कुठेतरी वरच अडकले असतात. अंडकोषांचे वृषणकोशात वेळेवर स्थिरण केल्याने त्याचे कार्य वाचू शकते. तारुण्यानंतर स्थिरण केल्याने क्वचितच मदत होते.
जर पुरुषाच्या अंडकोषात शुक्राणू असतील, पण ते त्याच्या वीर्यात आढळत नसतील, तर अशावेळी त्या शुक्राणूंना बाहेर काढून आपण त्यांना फर्टिलिटीसाठी वापरू शकतो. अधिवृषण किंवा अंडकोषांतून शुक्राणू मिळवण्याच्या प्रक्रियेला ‘शुक्राणू पुनर्प्राप्ती’ म्हणतात.
जर अंडकोषाच्या उतीमध्ये शुक्राणू आढळत असतील, तर अशावेळी त्यांना एकाधिक उपचारांत वापरण्यासाठी म्हणून अंडकोषाच्या उतीला ताबडतोब गोठवले जाते. यामुळे वारंवार कराव्या लागणाऱ्या बायोप्सीला टाळण्यास आम्हाला मदत करते. अधिवृषण किंवा अंडकोषांतून प्राप्त झालेल्या शुक्राणूंचा नंतर आयसीएसआय किंवा आयएमएसआय तंत्राद्वारे आयव्हीएफमध्ये फलनासाठी उपयोग केला जाऊ शकतो. या स्खलन न झालेल्या शुक्राणूद्वारे फलन अधिक यशस्वी करण्यासाठी विविध प्रगत शुक्राणू निवड व फलन तंत्र वापरले जाऊ शकतात.
हे एक सुलभ ऑपरेशन असून, आमच्या फर्टिलिटी तज्ञांकडून बाह्यरुग्ण तत्वावर स्थानिक भूल देऊन हे प्रक्रिया पार पाडली जाते.
शस्त्रक्रियेच्या दरम्यान अंडकोषांतून प्राप्त झालेल्या उतींच्या तुकड्यांवर आमच्या फर्टिलिटी केंद्रात प्रक्रिया केली जाते आणि शुक्राणूंच्या उपस्थितीसाठी त्यांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते. जर शुक्राणू आढळले, तर आमच्या फर्टिलिटी केंद्रामध्ये ऊतींचे सर्व तुकडे गोठलेले (क्रायोप्रिझर्वेशन) आणि तिथेच साठवले जातात. शुक्राणू प्राप्त झाले की नाही याविषयी आमच्या रुग्णाला त्वरित कळवले जाते.
अंडी पुनर्प्राप्तीच्या दिवशी गोठवलेल्या अंडकोषातील एक नमुना प्रयोगशाळेत वितळविला जातो. यावेळी, उपलब्ध असलेल्यांपैकी सर्वोत्कृष्ट अंडकोष निवडण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून जेवढ्या अंड्यांच्या पेशी बाहेर पडतात, तेवढे शुक्राणू ऊतींच्या तुकड्यातून प्राप्त व्हायला हवे. न वापरलेले सर्व अंडकोष नमुने तसेच गोठलेल्या स्वरुपात ठेवले जातात आणि पुढील फर्टिलिटी उपचारासाठी वापरण्यात येतात.
जर अझोस्पर्मिया पेशंटच्या अंडकोषात एकही शुक्राणू आढळले नाही, तर दुर्दैवाने, त्या पुरुषाला अनुवांशिकरित्या स्वत:चे मूल होण्याची आशा नसते. अशा जोडप्यांना आम्ही आमच्या प्रजनन केंद्रामध्ये दात्याच्या शुक्राणूचे वीर्यसेचन करून (डोनर इन्सेमिनेशन) गर्भाधान घालू शकतो.
बीएफआय तिच्या ‘संतान एआरटी बँक”च्या माध्यमातून संपूर्ण चाचणी केलेल्या, उत्कृष्ट गुणवत्तेच्या शुक्राणू दात्यांचे विस्तृत पर्याय उपलब्ध करून देते
जर अंडकोष नमुन्यात शुक्राणू आढळत असेल आणि अंड्याच्या पेशींचे यशस्वीरित्या फलन होत असेल, तर तेव्हा तुमच्या बाबतीत आयसीएसआय उपचाराच्या यशस्वीतेचा दर हा जवळपास सामान्य स्खलित शुक्राणू इतकाच असतो; प्रत्येक उपचार चक्रात यशस्वी गर्भधारणेचे प्रमाण सुमारे 55 ते 60 टक्के असते, परंतु इतर प्रजनन घटकांनुसार ते बदलू शकते.
बीएफआय तुम्हाला शक्य तितके उत्कृष्ट यश प्रदान करते. यासाठी टेस्टिक्युलर शुक्राणूंना हाताळण्याचा विस्तृत अनुभव असलेल्या आमच्या उत्कृष्ट भ्रूणशास्त्र संघाचे आम्ही आभारी आहोत.
शुक्राणूंच्या पुनर्प्राप्तीच्या अपेक्षित जागेनुसार शुक्राणू पुनर्प्राप्तीसाठी विविध प्रक्रिया वापरल्या जातात.
बीएफआयचे फर्टिलिटी तज्ज्ञ कमीत कमी शस्त्रक्रिया करून जास्तीत जास्त शुक्राणू मिळविण्यासाठी शुक्राणू पुनर्प्राप्तीच्या सर्व प्रक्रिया करतात. सुरुवातीला एका बाजूची तपासणी करूनजर ऊतींचे परीक्षण केले जाते. जेव्हा आपल्याला एका बाजूला शुक्राणू मिळत नाहीत, केवळ तेव्हाच दुसरी बाजू तपासली जाते. समस्येच्या अनुकूलतेनुसार प्रथम सर्वात कमी जोखीम असलेली पद्धतच निवडली जाते.
एक छोटी सुई अधिवृषणात ठेवली जाते. तिच्यावर हळूवार दाब दिला जातो आणि अधिवृषणातून द्रव बाहेर काढले जाते. जर त्यात आपल्याला शुक्राणू मिळाले असतील आणि आवश्यक प्रमाणात शुक्राणूंची पुनर्प्राप्ती करायची असेल, तर त्याचवेळी एकाधिक अॅस्पीरेशन केले जाऊ शकतात.
तिथे कोणत्याही प्रकारे कापण्याची, टाक्यांची किंवा ड्रेसिंगची देखील आवश्यकता नाही.
तुम्ही ताबडतोब तुमच्या सामान्य कामांसाठी परतू शकता.
एक छोटी सुई अंडकोषात टाकली जाते. एक हळूवार दाब दिला जातो. शुक्राणूंनी युक्त अशा छोट्या पाईपसारखी रचना असलेल्या काही नळी गोळा केल्या जातात.
जर त्यात आपल्याला शुक्राणू मिळाले असतील आणि आवश्यक प्रमाणात शुक्राणूंची पुनर्प्राप्ती करायची असेल, तर त्याचवेळी एकाधिक अॅस्पीरेशन केले जाऊ शकतात.
तिथे कोणत्याही प्रकारे कापण्याची, टाक्यांची किंवा ड्रेसिंगची देखील आवश्यकता नाही.
तुम्ही ताबडतोब तुमच्या सामान्य कामांसाठी परतू शकता.
अंडकोषावर एक छोटासा काप दिला जातो. फोरसेप्सच्या सहाय्याने आवश्यक तेवढ्या नळी गोळा केल्या जातात. उतींचे काढलेले तुकडे फारच लहान असल्याने, त्यानंतरच्या नुकसानाचा धोका खूपच कमी असतो.
तिथे एक अतिशय लहान कापचा आणि एक टाक्याचा समावेश असतो. ते स्वतःच विरघळते.
दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या नेहमीच्या कामांसाठी परतू शकता.
ही प्रक्रिया स्पायनल किंवा सामान्य भूल देऊन केली जाते. अंडकोष कापून खुले केले जाते. नळी मायक्रोस्कोपखाली तपासल्या जातात. शुक्राणूजन्य दिसणाऱ्या नळी काढून त्यांची तपासणी केली जाते. अशा प्रकारच्या ‘पूर्ण’ नलिकांसाठी जवळजवळ संपूर्ण अंडकोष तपासले जाते.
तुम्हाला किमान आघातासह यशस्वी उपचाराच्या जास्तीत जास्त संधी देण्यासाठी बीएफआयकडे उत्कृष्ट मायक्रोस्कोप, तज्ज्ञ आणि अनुभवी मायक्रोसर्जन आहे.
WhatsApp us