BFI

शुक्राणू निवडीची प्रगत तंत्रे

बाविशी फर्टिलिटी इंस्टिट्यूटमधील सर्व आयव्हीएफ सायकल्स ह्या आयसीएसआय सायकल्स आहेत. यामुळे आमच्या तज्ज्ञ भ्रुणशास्त्रज्ञांना हालचाल व संरचनेच्या आधारावर सर्वोत्तम शुक्राणू निवडण्यास मदत होते. 

तरीही, सूक्ष्मदर्शीच्या खाली चांगले दिसणाऱ्या शुक्राणूंच्या डीएनएमध्ये बिघाड असून शकते किंवा त्यांची फलनक्षमता कमी झालेली असू शकते. वैद्यकीय आजार जसे मधुमेह, यांमुळेही शुक्राणूंची फलनक्षमता कमी होऊ शकते. अशाप्रकारचे संशयास्पद रुग्ण किंवा पूर्वी आयव्हीएफ किंवा आयसीएसआयमध्ये वाईट फलन दर्शवले असेल असेल रुग्ण शुक्राणूच्या प्रगत निवड तंत्रासाठी योग्य असतात. 

अनेक तंत्रांमध्ये शुक्राणूंच्या विविध कार्यात्मक वैशिष्ट्यांच्या आधारावर शुक्राणूंची निवड केली जाते. अशा वैशिष्ट्यांमध्ये ऊसाईटसारख्या आवरणाला जुळण्याची क्षमता, अपोप्टोटीक मार्कर (पेशीच्या मृत्यूला दर्शवणारे मार्कर) किंवा संरचनेचे अधिक विस्तृत मुल्यांकन आदींचा समावेश असू शकतो. 

सर्वोत्तम शुक्राणूची निवड करण्यासाठी शुक्राणूच्या डीएनएची स्थिती, शुक्राणूची ऊसाईटसारख्या आवरणाला जुळण्याची क्षमता, विशिष्ट अपोप्टोटीक मार्कर्सची आवरणातील उपस्थिती आणि शुक्राणूच्या परिपक्वतेचे संकेत, आणि आयएमएसआयद्वारे शुक्राणूचे अधिक विस्तृत मुल्यांकनाचा वापर केला जाऊ शकतो. 

पीआयसीएसआय (फिजियॉलॉजिकल इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन) 

पीआयसीएसआय (फिजियॉलॉजिकल इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन) तंत्र गर्भधारणेच्या शक्यता वाढवते आणि गर्भपाताच्या जोखीमला कमी करते. या तंत्राचा फायदा म्हणजे, यामध्ये कार्यात्मक गुणवत्तेवरून शुक्राणूंची निवड करण्यात येते. 

या तंत्राचे कार्यात्मक तत्व काय आहे? 

हायअॅलुरोनिक आम्ल अंड्याच्या आवरणाचे महत्वाचे नैसर्गिक घटक आहे. परिपक्व शुक्राणूच्या डोक्यात विशिष्ट रिसेप्टर असते, जे त्या शुक्राणूला हायअॅलुरोनिक आम्ल जुळण्याची परवानगी देते. हीच प्रक्रिया निसर्गात नैसर्गिकरित्या घडत असते. म्हणून, फलनासाठी पीआयसीएसआय पद्धती वापरताना भ्रुणशास्त्रज्ञ हायअॅलुरोनिक आम्लातील जेलसोबत सकारात्मक बंध तयार करणाऱ्या शुक्राणूची निवड करतात. निवड केलेले शुक्राणू आयसीएसआय पद्धतीच्या साहाय्याने फलनासाठी वापरले जाते.

फक्त हायअॅलुरोनिक आम्लाशी जुळण्याची जैवरासायनिक क्षमता असलेले परिपक्व शुक्राणूच अशी परस्पर क्रिया करू शकतात. हायअॅलुरोनिक आम्लाशी जुळणाऱ्या शुक्राणूची स्वरूप संरचना चांगली असते, त्यात गुणसुत्रांतील अपसामान्यतेची टक्केवारी कमी असते आणि डीएनए एकात्मकता चांगली असते, असे वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

पीआयसीएसआयची शिफारस कधी केली जाते? 

खालील प्रकरणांत पीआयसीएसआयची शिफारस केली जाते : 

  • तुटलेले डीएनए असलेल्या पुरुष जनजपेशींची उच्च टक्केवारी 
  • ३८ वर्षांपुढील स्त्री 
  • पूर्वी आयसीएसआयचे वापर करून अपयशी ठरलेले फलन चक्र 
  • निम्न दर्जाच्या भ्रुणांचा विकास  
  • एकाधिक गर्भपात केलेले जोडपे 

इंट्रासायटोप्लाझ्मिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन (आयएमएसआय)

सहसा वापरल्या जाणाऱ्या आकारापेक्षा शुक्राणूचे आकार कितीतरी पटीने वाढवण्यासाठी आयएमएसआयमध्ये विशेषीकृत भिंगांचा आणि आज्ञावलींचा वापर केला जातो. स्वरूप संरचनेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणातील शुक्राणूची निवड केल्याने प्रत्यक्ष वेळी सर्वोत्तम शुक्राणू निवडण्यासाठी व आयसीएसआयमध्ये थेट वापरण्यासाठी मदत होते.  

प्रथम पायरी म्हणून ज्याप्रकारे मानक आयसीएसआयमध्ये केली जाते, तशीच प्राथमिक शुक्राणू निवड पक्रिया इथेही पार पाडली जाते. गरजेपेक्षा थोडे जास्त शुक्राणू निवडले जातात.

आयएमएसआय तंत्र हे एक व्यक्तीनिष्ठ विश्लेषण आहे; त्यामुळे या पद्धतीच्या यशस्वी होण्यात आमच्या तज्ज्ञ भ्रुणशास्त्रज्ञांची मोलाची भूमिका असते. 

मॅग्नेटिकअॅक्टिव्हेटेड सेल सॉर्टींग (एमएसीएस)

एमएसीएस तंत्राद्वारे मृत (अपोप्टोटीक) शुक्राणू पेशींना सामान्य शुक्राणू पेशींपासून वेगळे केले जाते. पेशीमृत्यू (अपोप्टोसीस) ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये पेशी आयुष्याच्या शेवटी स्वतःच स्वतःला नष्ट करून टाकते. एमएसीएस पद्धतीत असे खराब झालेले अपोप्टोटीक शुक्राणू चुंबकीय सूक्ष्मपदार्थांद्वारे दर्शवले जाते आणि जिथून ते अपोप्टोटीक शुक्राणू प्राप्त झाले होते, त्याच एका उभ्या रकान्यात त्यांना ठेवले जाते.

जुळून असलेले जिवंत शुक्राणू त्या रकान्यातून प्रवाहित होतात आणि ऊसाइट्सचे फलन करण्यासाठी संकलित केले जातात.  

अलीकडील बृहत विश्लेषणाच्या संशोधनातील निष्कर्षानुसार असे माहित झाले आहे, की एमएसीएस भ्रुण रोपणाला वृद्धिंगत करीत नाही.

सूक्ष्मद्रव्यशास्त्र

नैसर्गिकरित्या फलन प्रक्रियेत स्त्रीबीजांडाचे फलन करण्यासाठी शुक्राणू योनीतून स्त्रीबीजवाहक नलिकेपर्यंत प्रवास करतो. तर आयव्हीएफमध्ये ते स्त्रीबीजांडाशी थेट संपर्कात येतात. स्त्रीच्या प्रजनन मार्गाला उत्तेजना देण्यासाठी सूक्ष्म-माध्यम तयार करणे हे सूक्ष्मद्रव्यशास्त्राचे तत्त्व आहे.  

पोलस्कोप

शुक्राणू हे संहत डीएनए असलेल्या अतिशय संघनित पेशी असतात. जेव्हा त्यांची ध्रुवीकरण केलेल्या प्रकाशासोबत टक्कर होते, तेव्हा ते उच्च द्वि-अपवर्तन दर्शवतात.

रिक्तिका असलेल्या तसेच डोके, मध्यभाग व कशाभिका यांच्या स्वरूपरचनेत बदल झालेल्या शुक्राणू पेशी अशाप्रकारचे अपवर्तनांक निर्माण करत नाही. उच्च द्वि-अपवर्तन दर्शवणारे निवडक शुक्राणू फलनासाठी वापरले जातात.

इष्टतम यशप्राप्तीसाठी अनुवांशिकरित्या सामान्य शुक्राणूची फलनसाठी निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. काहीवेळा हे अतिशय आव्हानात्मक असते, म्हणून अशावेळी अनुभवी भ्रुणतज्ज्ञांद्वारे योग्य तंत्रज्ञानाचा कायदेशीर वापर वरदान ठरते.

आमचे स्थान

    Book an Appointment

    Your family building is just your decision away. Reach us NOW, fill this form and we will respond ASAP, Together, we will succeed.